काव्यलिंग अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
हे काव्यलिंग प्रथम दोन प्रकारचें, (१) सुबंत अर्थ (म्ह० नामानें प्रतिपादित अर्थ) उपपादक असतांना होणारा एक प्रकार व (२) तिंडत अर्थ (म्ह० क्रियापदानें सांगितलेला अर्थ) उपपादक असतांना होणारा दुसरा प्रकार. यांपैकीं पहिल्याचे पुन्हां दोन पोटप्रकार (म्ह० यांपैकीं पहिल्या सुबन्तार्थ उपपादकाचे पुन्हां दोन प्रकार ) :--- (१) ज्यांत सुबंतार्थाच्या म्ह० नामार्थाच्या जोडीला त्या नामार्थाचे विशेषण होऊन आलेले दुसरे (सुबन्तार्थ वगैरे पदार्थ) उपपादक असतात तो पहिला प्रकार व (२) शुद्ध सुबन्तार्थ म्ह० केवळ नामार्थ उपपादक असणें हा दुसरा प्रकार. पुन्हां य पोटप्रकारांपैकीं पहिल्या (दुसर्या म्ह० सुबन्तार्थानें विशेषित असा सुबन्तार्थ उपपादक असणार्या) पोटप्रकाराचे पुन्हां दोन भेद :-- (१) साक्षात अथवा परंपरेनें ज्यांत वाक्यार्थ हें विशेषण झालें आहे, असा एक पोटप्रकार व (२) ज्यांत सुबंत अर्थच फक्त विशेषण झाला आहे, असा आहे असा दुसरा प्रकार. आतां तिडन्त अर्थ उपपादक असणारा प्रकारही पुन्हां वरीलप्रमाणेंच दोन प्रकारचा. (१) साक्षात अथवा परंपरेनें ज्यांत दुसरा वाक्यार्थ विशेषण झाला आहे असा तिडतार्थ व (२) केवळ सुबंत अर्थच ज्यांत विशेषण झालें आहे, असा तिडतार्थ उपपादक, हा दुसरा प्रकार. केवळ तिडंतार्थ उपपादक, असा शुद्ध प्रकार संभवतच नाहीं, कारण क्रियेला कारक हें विशेषण असणें आवश्यकच असतें (म्ह० स्वत: क्रिया ही कुणाचीच विशेषण होत नाहीं; उलट सर्व कारकें तिच्याशीं विशेषणें म्हणून अन्वित होतात.) बाकीचे प्रकार आम्ही पुढें सांगून.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP