मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य| सुंदरकांड श्री रामदासस्वामींचे साहित्य स्फुट अभंग पंचक पंचीकरण षड्रिपुविवेचन प्रासंगिक कविता मानपंचक पंचमान स्फुट श्लोक युद्धकान्ड अन्वयव्यतिरेक नित्यनैमित्तिक विधिसंग्रहसोपान मानसपूजा अंतर्भाव आत्माराम पंचसमासी करुणाष्टकें निरनिराळ्या वारांची गीतें लळित प्रासंगिक कविता रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें पंचीकरणादी अभंग श्री रामदासांचे अभंग श्री स्वामी समर्थ सप्तशती श्रीवनभुवनी सुकृत-योग किष्किन्धा कांड गोसावी अभंग भाग १ अभंग भाग २ अभंग भाग ३ दिवटा पिंगळा राममंत्राचे श्लोक सुंदरकांड श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना रामदासांची आरती सुंदरकांड समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ सुंदरकांड Translation - भाषांतर नमूं सर्वकर्ताचि तो विश्वभर्ता । गुणी शोकहर्ताचि हर्ता विवर्ता । परेहूनि परर्ताचि पर्ता विवर्ता । भुतें भूतधर्ताचि धर्ता उधर्ता ॥१॥महीमंडळींचे कपी रीसराचे । तयां मध्यभागीं महावीर साजे । महारुद आज्ञेप्रमाणें निघाला । सिताशुद्धि आणावया सिद्ध जाला ॥२॥सवें मंडळी चालिल्या वानरांच्या । नभोमंडळामाजिं फौजा विरांच्या । गिरीकंदरें देश नानापरींचे । तटाकें नद्या ओघ जाती नदींचे ॥३॥पुरें पट्टणें अट्टणें धुंडिताती । कपी वीर दाही दिशा हिंडताती । सिता शोधितां शुद्धि कोठें न लागे । बळें धुंडितां ते विरें वीरु भागे ॥४॥वनें भूवनएं रम्य नानापरींची । बरीं शोधिलीं तीं गिरीकंदरींचीं । दरें शृंग पाठार मैदान दारी । कपाटें गव्या वीवरें तीं भुयारीं ॥५॥कपी शोधितां शोधितां सुस्त जाले । नव्हे कार्य तैं दैन्यवाणे मिळाळे । समुद्रातिरीं ते उदासीन जाती । गळाल्या तनू थोर उद्वेश चित्तीं ॥६॥कपी बोलती काय आतां करावें । न लागे सिताशुद्धि तेव्हाम मरावें । म्हणे मारुती वीर हो स्थीर बैसा । तिन्ही लोक पाहून येतों तमासा ॥७॥भयासूर तो भीम सिंधू उडाला । त्रिकूटाचळाहून पैलाड गेला । पुढें सर्वही पाणजंजाळ पाहे । हनूमंत विस्मीत होऊनि राहे ॥८॥समुद्रामध्यें भेटला तो अतीतू । म्हणे रे अरे अ रे अरे कोण रे तूं । हनूमंत घाली नमस्कार त्याला । मनामाजिं तो थोर संतुष्ट जाला ॥९॥मुनी तो त्रिकूटाचळीं शुद्धि सांगे । किराणें उडे तो कपी वीर मागें । अकल्पीत लंकापुरी कांचनारी । पुढें देखिली सौख्यदाती मनाची ॥१०॥गुढ्या गोपुरें देउळें तीं अपारें । हुडे कोठ जाळांधरें थोरथोरें । सुवर्णाचळामाजिं तें तेज फांके । तया पाहतां कीरणीं दृष्टि झांके ॥११॥कपाटें लोहोअर्गळ पंथ मोठे । बळी बैसले थोर आश्चर्य वाटे । बहूसाल वाद्यें उडाडां धडाडं । खुसीहाल आवाज होती भडाडां ॥१२॥पुढें पाहतां जावया रीग नाहीं । न सूचे मनीं मानसीं यत्न कांहीं । पुढें भीम तो अंतराळें उडाला । लघूरूप लंकेत होऊनि गेला ॥१३॥गृहा गोपुरांचा बहू दाट खोटा । सदा सर्वदा वाहती सर्व वाटा । बिदी हाट बाजार कुंचे दुकानें । सदा मस्त ते हस्ति जाती गुमानें ॥१४॥सिलेभार सज्जीत ते राउतांचे । बरें फार संगीत होती विरांचे । दिसेना तयांलगिं झुंजार कोणी । बळें जिंकिले पीडिले लोक तीन्ही ॥१५॥बहू सज्ज तें राज्य लंकापुरीचें । पुरीमाजिं ते सैन्य मोठया बळाचें । उफाळेंचि जाती भुजा फूर्फुरीती । तयां देखतां देव ते थर्थरीती ॥१६॥त्रिकूटाचळीं ख्याति केली भीमानें । लघूरूप तो हिंडताहे धिरानें । गृहेम गोपुरें पाहिल्या धर्मशाळा । अकस्मात त्या देखिल्या बंदिशाळा ॥१७॥हिनासारिखें देव ते दीन झाले । नसे शक्ति ना युक्ति पोटीं गळाले । भयामीत ते कांपती दीनवाणे । बहू गांजिलें दु:ख तें कोण जाणे ॥१८॥सुरांकारणें कोप भीमासि आला । मनामाजिं आवेश तो थर्थरीला । रुपें भर्भरील तमें गर्गरीला । प्रसंगीं तये मारुती गुप्त जाला ॥१९॥मनमाजिं आवांकिलें सर्व कांहीं । सिता सांडिली तूळणा त्यासि नाहीं । बहू मातले गर्व मोठया बळाचा । तया झोडिता दास मी राघवाचा ॥२०॥त्रिकूटाचळीं ख्याति केली भीमानें । पुढें पत्रिका धाडिली ब्रह्मयानें । तिये वाचितम वाचितं राम हांसे । क्रिडाकौतुकें अंतरामाजिं तोषे ॥२१॥नटे नाटकू त्रीकुटामाजिं कैसा । महा कांड सुंदर्य जाला तमासा । देहे आपुलें सर्वही गुप्त केलें । प्रसंगीं तयें पुच्छ तें वाढवीलें ॥२२॥बहू व्यापिला वेढिली सर्व लंका । कितेकां मनीं वाटली थोर शंका । गृहांतूनि अंतर्गृहीं पुच्छ घाली । बहू पाडिता फोडितां हांक जाली ॥२३॥बळें लांगुलें रूधिल्या सर्व वाटा । बहू तुंबला लोक तो दाट खेटा । तयाभोंवतें पुच्छ बांधोनि भारें । नभीं पोकळीं माजिं नेटें उभारें ॥२४॥बहू भार ते स्वारे मध्येंचि खंडी । महामस्त । महामस्त ते हस्ति नेटें उलंटी । गुरें शाकटें राक्षसालगिं पाडी । पदीं पुच्च बांधोनि पाडी पछाडी ॥२५॥पडों लागले दैत्य नेटें बदादां । कितीएक ते दीर्घदेहीं भदादां । बळाची दळें पाडिलीं पुच्छमारें । दिसेना परी गर्जतो भूभुकारें ॥२६॥धरी पंथ कोणासही जाउं देना । पुरीमाजिं पापी कदा येऊं देना । चुली पेटल्या वन्हि तेथें विदारी । बळी धांवती त्यांसि तेथेंचि मारी ॥२७॥गळे पाय बांधी किती हात बांधे । पुरीमाजिं हांकेस ते हांक सांधे । महावीर चौताळले तें धरेना । बळें वावरे पुच्छ तें आदरेना ॥२८॥जना ओढितां पाडितां आपटीतां । समस्तां जनांलगिं पाडूनि जातां । पशूराक्षसीं सर्वही हांक केली । कितीएक तीं चिर्डचिर्डोनि मेलीं ॥२९॥कितीएक तीं राक्षसें हाकलीती । कितीएक तीं राक्षरे वोंबलीती । कितीएक तीं थोर जाली रुदंती । कितीएक तीं राक्षसें चर्फडीसी ॥३०॥असंभाव्य तें पुच्छ झाडी उलंडी । कडाफोदि होतांचि येतांचि झोडी । पुरीमाजिं सर्वांसही आट केला । विरें वीर राक्षेस सर्वै बुडाला ॥३१॥नसे अन्नपानी मुखामाजिं घाणी । कितीएक ते जाहले दैन्यवाणी । पुरीमांजि नानापरी घोळ केला । पुढें अस्तमानासि तो दीन गेला ॥३२॥उदासें घरें मंदिरें थोरथोरें । महापुच्छ तें वावरे अंधकारें । भुजंगापरी सर्व वेंटाळिताहे । विरें वीर चाकाटला सर्व पाहे ॥३३॥मुलां लेंकुरांमाजिं तें खेळताहे । निजेल्यांमधें पुच्छ तें लोळताहे । कुमारीकुमारां गळां हार घाली । भयाभीत अंत:पुरीं हांक जाली ॥३४॥त्रिकूटाचळीं सर्व ऊदंड आले । भयाभीत ते सर्वही लोक जाले । कळेना बरें सर्व कीं काय आहे । करी तें महामार त्याचा न साहे ॥३५॥अकस्मात तें काय होतें कळेना । वळेना कदा आकळेना । सभेमाजिं रायापुढें हांक गेली । अहो पाहतां काय लंका बुडाली ॥३६॥उगा लोळसा घोळ मोठा करितो । करारूनि बांधोनि सर्वां धरीतो । बहूतापरी सांगती रावणाला । बहूतां जणांता घरीं कोंड जाला ॥३७॥नव्हे जी नव्हे सर्व सामान्य मातू । महाघोर हा थोरला पुच्छकेतू । सभामंडपीं कोप रायासि आला । म्हने सांगती त्यामस मारून घाला ॥३८॥तयां मारितां पुच्च तेथेंचि आलें । सभामंडपामाजिं नेटें निघालें । दिवे पाडिले दीवटे आपटीले । अकस्मात हीलाल हीरोनि नेले ॥३९॥मुखें बोलती दीप रे दीप आणा । दिवे आणितां मूकती दैत्य प्राणां । असंभाव्य त्या दीवढया दीप थावे । बळें लागवेगें समूदाय धांवे ॥४०॥पुन्हां मागुती दीप घेऊनि आले । बळें धांवतां पुच्छमारें विझाले । तया लांगेलें रुंधिलीं सर्व दारें । कपी वीर तो वावरे अंधकारें ॥४१॥सभांमंडपीं गुद्गुल्या तो करीतो । मुखें नासिकें कर्ण छेदून नेतो । बळें गाल सर्वांग हीं बर्बडीतो । चिरें फाडितो ओढितो गुर्गुरीतो ॥४२॥बळचे महावीर तेथें मिळाले । परी अंधकारेंचि कांही न चाले । किती लोटिले कूटिले चूर केले । भयाभीत कोणास कोणी न बोले ॥४३॥कपी वीर तो थोर लाहान होतो । धरीतां बळें हात मोडोनि जातो । बुक्या मारितो पांपरीं वज्रथापा । असंभाव्य तो कोपला राव कोपा ॥४४॥म्हणे वीर हो काय रे काय जालें । कळेना मुखें बोलती काय आलें । भयासूर तें गुर्गुरीतें कळेना । करूं काय आम्हांसि तें आकळेना ॥४५॥कपी वीर रायाकडे शीघ्र गेला । बळें थाप मारून मूगूट नेला । बरें ठोंसरे मारिले रावणाला । म्हणे मारितों रे तुझ्या आखयाला ॥४६॥चिरें सुंदरें फाडिलीं रावणाचीं । करी भूषणें चूर मुक्ताफळाचीं । कपीनें सभा सर्वही नग्न केली । त्रिकूटाचळीं ख्याति ऊदंड जाली ॥४७॥हाहाकार जाला सभेमाजिं मोठा । बळें मारुती मारिताहे चपेटा । सभामंडपीं फार आकांत झाला । कपीनें पुढें मोकळा मार्ग केला ॥४८॥लपाला कपी पुच्छ ओढूनि नेलें । लघू मश्यकाचे परी रूप केलें । असंभाव्य त्या दीवटया चंद्रज्योती । असंख्यात राक्षेस धांवूनि येती ॥४९॥सभामंडपामाजिं धांवोनि आले । तेणें नागवे लोक लज्जीत जाले । महावीर मागें पुढे हात देती । कपीनें बहूसाल केली फजीती ॥५०॥सभामंडपीं वस्त्र कोठें दिसेना । भूतांसारिखे नागवे लोक नाना । चिरें आणिलीं नेसले स्वस्थ जाले । मनामाजिं लज्जीत कोणी न बोले ॥५१॥कपीवीर तेथूनि वेगें उडाला । अशोकावनामाजिं वृक्षीं दडाला । अधोमूख तो जानकीलगिं पाहे । कपी राममुद्रा पुढें टाकिताहे ॥५२॥सितेनें पुढें मुद्रिक ओळखीली । बहूतांपरी शब्दकारुण्य बोली । पुढें मारुती भेटला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ॥५३॥क्षुधाक्रांत मी जाहलों फार माते । तनू चालतां चांचरी सर्व जाते । बहूतांपरी बोलिला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ॥५४॥अशोकीं बहू लागले वृक्ष नाना । पहातां असंख्यात संख्या असेना । नव्हाटें जुनाटें वनें दाट थाटे । वनें मोडिता जाहला कड्कडाटें ॥५५॥फळें भक्षिलीं सर्व नान परींचीं । बहू स्वाद वर्णू कळाकूसरीचीं । कपीवीर तो तृप्त जाला निवाला । पुढें वृक्ष मोडावया सिद्ध जाला ॥५६॥तरू मोडिले पाडिले ऊपटीले । किती झोडिले झाडिले चूर केले । गिरीसारिखे ढीग सांडूनि टाकी । तयाला असंभाव्य राक्षेस हांकी ॥५७॥वनें मोडितां मोडितां हांक जाली । कितीएक ते दैत्यमांदी मिळाली । गलोला कमाना करीं भिंडमाळा । बळें हांकितां नाद गेला भुगोळा ॥५८॥बहूतां बळाचे बहू लोक आले । कितीएक ते धिंग मोठे मिळाले । वनें वेढिलीं धांवले काळ जैसा । सेभुतां खेचरां थोर कल्पांत भासे ॥५९॥कपी वीर चौताळला वेग केला । कितीएक राक्षेस भंगोनि गेला । त्रिकूटाचळीं रावणा जाणवीलें । वनीं वानरें थोर अद्भूत केलें ॥६०॥बळें धांविला कूमरू रावणाचा । सदा अक्षयी वीर मोठया बळाचा । असंभाव्य राक्षेस धांवोनि आले । कपीलगिं मारावया सिद्ध जाले ॥६१॥बळें आगळा आखया लक्ष भेदी । चुकावी कपीवीर लागोंच नेदी । बहू लागले मारितां भग्न जाले । कितीएक ते दैत्य पोटीं गलले ॥६२॥पहा हो कपी धीट मोठा पळेना । सदा सर्वदा लक्ष याचें चळेना । पुन्हां मागुते वीर ते सिद्ध जाले । कितीएक ते पाश घेऊनि आले ॥६३॥मुखें बोलती मर्कटा बैसलेंसी । समारंगणामाजिं युद्धा न येसी । कपीवीर तो गर्जला भूभुकारें । समारंगणीं चालिला घोर मोरें ॥६४॥रिपू झोडिले पाडिले वृक्षघातें । भुमीं लोळती दैत्य होऊनि प्रेतें । पुढें देखिलें जंबुमाळ्या कुटीला । बळें आखया आपटीला पिटीला ॥६५॥पळाले कळी फूटली राक्षसांचो । पुढें हांक गेली तया आखयाची । त्रिकूटाचळी शोकआरंभ जाला । प्रितीचा बहु आखया तो निमाला ॥६६॥पुरीमाजिं अंत:पुरीं घोष जाले । सुखानंद मंदोनि गेले विझाले । बहू दु:ख जालेंच मंदोदरीला । तिनें कूमरालगिं आकांत केला ॥६७॥पुसे रावणू काय रे काय जालें । तुम्हांलगिं मारावया कोण आलें । कपी एकला बैसला तो पळेना । चळेना ढळेना कदा आकळेना ॥६८॥तया टाकितां पाश मोठाचि होतो । लघूरूप होऊनि नीवूनि जातो । कदाहा पडेना कदा सांपडेना । तेणें मारिली दैत्य ऊदडं सेन ॥६९॥विधीलगिं बोलविलें रवणानें । कठीणोत्तरीं गांजिलें दुर्जनानें । म्हणे जारे रे आणि वेगें कपीला । तया नाणितां शीघ्र ताडीन तूला ॥७०॥विरंची पुढें घातला चालवीला । असंभाव्य तो लोकमेळा मिळाला । वनामाजिं येतां नमस्कार घाली । तया मारुतीची बहू स्तूति केली ॥७१॥बहूतांपरी कीर्तीचें येश घ्यावें । दयाळा कपी ये घडी शांत व्हावें । न होतां मला मारिती ब्राह्मणाला । बहूसाल कल्याण व्हावें तुम्हांला ॥७२॥कपीवीर तो थोर कोपें कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाडी । परी सांकडीमाजिं कांहीं न चाले । मिळाले कपलिगिं घेऊनि आले ॥७३॥अरे मर्कटा थोर अन्याय केला । म्हणे रावणू मारितो शीघ्र तूला । तुझा मृत्यु कोठें खरें सांग आतां । मुढा कष्मळा मारितों जात जातां ॥७४॥म्हणे मारुती काळ मारू शकेना । कृपाळूपणें तोषला रामराणा । न वाटे खरें सांगतोआं रावणाला । म्हणे वानरूलांगुलीं अग्नि घाला ॥७५॥म्हणे रावणू पाहतां काय आतां । चिरे आणवा सांगताहे समस्तां । असंभाव्य ते वीर धांवोनि गेले । त्रिकूटाचळीं लोक ते नग्न केले ॥७६॥पुढें पुच्छ ओढोनि गुंडाळिताती । सिमा सांडिली वीर गुंडाळिताती । तया वेढितां तें असंभाव्य लांबे । विरें वीर त्या लांगुलालागिं झोंबे ॥७७॥कितीएक तीं आणिलीं आज्य तेलें । कितीएक तीं मोगरेलें फूलेलें । महापुच्छ तें सर्वही भीजवीलें । पहा हो कपी बापुडें व्यर्थ मेलें ॥७८॥तय लवितं वन्हि तेथें न लागे । बळें फुंकितां तो विरे वीरु भागे । तया देखतां रावणू शीघ्र आला । बळें फुंकितां फुंकितां तो गळाला ॥७९॥पुढें रावणू थोर कोपें कडाडी । बळें फुंअळतां जाळ नेटें धडाडी । जळालीं मुखें भस्मल्या खांड मीशा । बहूसाल लंबीत होत्या विशेषा ॥८०॥बळें चेतला वन्हि नेटें तडाडी । कडाडीत ज्वाला दडाडी धडाडी । कपीवीर तो वाड जाला उडाला । पुढें जाळिता जाहला त्रीकुटाला ॥८१॥गृहां गोपुरांमाजिं तें पुच्छ घाली । त्रिकूटाचळीं आगि नेटें निवाली । बिदी हाट चौबार कुंचे । बळें बोंबली नागवा लोक नाचे ॥८२॥बहूतांपरींची बहू हांक जाली । पळा रे पळा रे पळा आगि आली । गुरें वासुरें शिंगरे लेंकुरें तीं । शुनीं मार्जरें तैं खरें येसरें तीं ॥८३॥किती शेरडें मेंढरें तीं अचाटें । जळालीं किती राक्षसें कल्कलाटें । किती शाकटेम कुंजरें दिव्य घोडे । महीमंडळीं त्यांसि नाहींत जोडे ॥८४॥बहूतांपरींची बहू रम्य यानें । बहूसाल छत्रें विचित्रें निशाणें । बहूतांपरींच्या बहूसाल शाळा । जळाल्या विवीधा विचित्रा विशाला ॥८५॥बळें लोक तेथें बळें पुच्छ घाली । बहूतां विरांची बहू शांति जाली । महपुच्छ तें जाळ बंबाळ जाला । बहू साक्षपें वन्हि तो चेतवीला ॥८६॥पळले भयासूर ते दूरि थावे । कपीवीर लांगूल घेऊनि धांवे । बहू भोंवताहे बहू धांवताहे । उठे वन्हिचें चक्र लांगूल पाहे ॥८७॥फिरे गर्गराटें कपी चक्र जैसा । विधी शक्र अव्यग्र पाहे तमासा । बिरां खेचरां भूचरां अंत जाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ॥८८॥बहूसाल दारूमधें पुच्छ घाली । उसाळे नभामाजिं दारू निघाली । तडाडी थडाडी दडाडी धडाडी । शशी सूर्य नक्षत्रमाळा कडाडी ॥८९॥बहू धूम्र तेणें कदाही दिसेना । बहूसाल वढाणि ते सोसवेना । बहू घोष तो शब्द कानीं पडेना । कपी रोषला झाडतांही झडेना ॥९०॥पुढें धूत्रत्यागी धगागीत आगी । महावन्हि कोपोंचि जाला विभागी । त्रिकूटाचळू कांचेनाचा तखाकी । सतेजीक तेजें झकाकी लखाकी ॥९१॥महावज्र लांगूल कल्लोळ जाला । परी पाहंता रोम नाहीं जळाला । गदादीत काया समुद्रांत घाली । निवाला कपी पुच्छज्वाला विझाली ॥९२॥समुद्रीं शुचिष्मतं होऊनि आला । नमस्कार घाली तये जानकीला । म्हणे जानकी एकला तूं विदेशी । कपी रे बहूतांपरी कष्टलाशी ॥९३॥म्हणे मारुती धन्य हे दीस आले । तुम्हां देखतां सर्वही कष्ट गेले । प्रभू वाट पाहील तो रामराजा । निरूपाचि मो शीघ्र जाईन काजा ॥९४॥सिते मारुती योग वीयोग जाला । बहूसाल नेत्रोदकीं पूर आला । म्हणे मारुती लोभ आतां असावा । सुरांचा बळें राम येतो कुडावा ॥९५॥कपी मागुती मागुती वाट पाहे । उदासीन जातां गळां दाटताहे । विवेकें जिवामाजिं तो धीर केल । पुढें मारुती शीघ्र सिंधू उडाला ॥९६॥कपीलगिं सांगे सिताशुद्धि जाली । मुखें ऐकतां मंडळीं ते निवाली । समस्तं जनांलगिं आनंद जाला । कपी मारुती रामभेटी निघाला ॥९७॥दळेशीं बळें राहिला रामराजा । कपी रीस ते वीर वेष्टीत फौजा । स्फुरद्रूप ऊभारिला दिव्य बाहो । रघूनायकें देखिला भीमदेहो ॥९८॥कपी लागवेगें मुखें बोलताहे । अशोकीं जगन्माय कल्याण आहे । पुढें मारुती तो नमस्कार घाली । मनोवृत्ति ते राघवाची निघाली ॥९९॥समस्तांसि देखोनि आनंद जाला । सित शुद्धि घेऊनियां रुद्र आला । बहूतां बहू सांगती एकमेकां । सिता शोधितां सौख्य जालें अनेकां ॥१००॥सभामंडपीं राम सन्मूख पाहे । उभा दास साकल्य तो सांगताहे । महत्कृत्य व्हावें जनीं येश यावें । प्रभूसी समस्तांसि कल्याण व्हवें ॥१०१॥॥ श्रीसुंदरकांड श्लोकसंख्या ॥१०१॥ N/A References : N/A Last Updated : April 23, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP