मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|

श्रीवनभुवनी

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


( अनुष्ठुभ् छंद )
जन्मदु:खें जरादुखें । नित्य दु:खें पुन्हपुन्हा ।
संसार त्यागणें जाणें । आनंदवनभुवना ॥१॥
वेधलें चीत्त जाणावें । रामवेधीं निरंतरीं ।
रागें हो वीतरागें हो । आनंदवनभुवना ॥२॥
संसार वोढितां दु:खें । ज्याचें न्यासीच ठाउकं ।
परंतु येकदां जावें । आनंदवनभुवना ॥३॥
न सोसे दुख तें होतें । दुख शोक परोपरीं ।
येकाकी येकदां जावें । आनंदवनभुवना ॥४॥
कष्टलों कष्टलों देवा । पुरे संसार जाहाला ।
देहेत्यागासी येणें हो । आनंदवनभुवना ॥५॥
जन्म ते सोसिले मोठे । आपाय बहुतांपरीं ।
उपायें धाडिलें देवें । आनंदवनभुवना ॥६॥
स्वप्रीं जें देखिले रात्रीं । तें ते तैसेंची होतसे
हिंडता फिरतां गेलो । आनंदवनभुवना ॥७॥
हे साक्ष देखिली दृष्टी । किती कंल्लोळ उठीले ।
विघ्रघ्रा प्रार्थिलें गेलों ।  आनंदवनभुवना ॥८॥
स्वधर्माआड जें विघ्रें । तें तें सर्वत्र उठीलीं ।
लटिलीं कुटिलीं देवें । दापिलीं कापिलीं बहु ॥९॥
विघ्राच्या उठील्या फौजा । भीम त्यावरी लोटला ।
घर्डिलीं चिर्डिलीं रागें । रडविलीं बडविलीं बळें ॥१०॥
हाकिलीं टांकिलीं तेणें । आनंदवनभुवनीं ।
हांक बोंब बहु जाली । पुढें खेतल्ल मांडिलें ॥११॥
खौळके लोक देवाचे । मुख्य देव ची उठीला ।
कळेना काय रे होतें  आनंदवनभुवनीं ॥१२॥
स्वर्गींची लोटली जेथें । रामगंगा माहां नदी ।
तीर्थासी तुळणा नाहिं आनंदवनभुवनीं ॥१३॥
ग्रंथीं जे वर्णिली मागें । गुप्तगंगा माहां नदी ।
जळांत रोकडें प्राणी आनंदवनभुवनीं ॥१४॥
सकळ देवांची साक्षी । गुप्त उदंड भूवनें ।
सौख्य च पावणें जाणें आनंदवनभुवनीं ॥१५॥
त्रैलोक्य चालिलें तेथे। देव गंधर्व मानवी ।
ऋषी मुनी माहां योगी आनंदवनभुवनीं ॥१६॥
आक्ता आक्ता बहु आक्ता । काये आक्रा कळेचिना ।
गुप्त तें गुप्त जाणावें । आनंदवनभुवनीं ॥१७॥
त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्य बंदविमोचने ।
मोहीम मांडली मोठी । आनंदवनभुवनीं ॥१८॥
सुरेश उठिला आंगें । सुरसेना परोपरी ।
विकटें कर्कशें यानें । शस्रपाणी माहां बळी ॥१९॥
देव देव बहु देव । नाना देव परोपरीं ।
दाटणी जाहाली मोठी । आनंदवनभुवनीं ॥२०॥
दिग्पती चालिले सर्वै । नाना सेना परोपरीं ।
वेष्टीत चालिल सकळै । आनंदवनभुवनीं ॥२१॥
मंगळें वाजती वाद्यें । माहांगणासमागमें ।
आरंभीं चालिला पुढें  । आनंदवनभुवनीं ॥२२॥
राशभें राखिलीं मागें । तेणें रागेची चालिला ।
सर्वत्र पाठीसीं फौजा । आनंदवनभुवनीं ॥२३॥
आनेक वाजती वाद्यें । ध्वनीकल्लोळ उठीला ।
छेबीनें डोलती ढाला । आनंदवनभुवनीं ॥२४॥
विजई देस जो आहे । ते दीसीं सर्व उठती ।
आनर्थ मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥२५॥
देवची तुष्टला होता । त्याचे भक्तीस भुलला ।
मागुता क्षोमला दुखें । आनंदवनभुवनीं ॥२६॥
कल्पांत मांडला मोठा । म्लेंचदैत्य बुडावया ।
कपक्ष घेतला देवीं । आनंदवनभुवनीं ॥२७॥
बुडाले सर्व ही पापी । हिंदुस्थान बळावलें ।
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनीं ॥२८॥
पूर्वीं जे मारिले होते । ते ची आतां बळावले ।
कोपला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ॥२९॥
त्रैलोक्य गांजिलें मागें । ठाउकें विवेकीं जना ।
कैपक्ष घेतला रामें । आनंदवनभुवनीं ॥३०॥
भीम ची धाडिला देवे । वैभवें धांव घेतली ।
लांगूळ चालिलें पुढें । आनंदवनभुवनीं ॥३१॥
येथून वाढला धर्मु । रमाधर्म समागमें ।
संतोष मांडला मोठा । आनंदवनभुवनीं ॥३२॥
बुडाला औरंग्या पापी । म्लेंचसंव्हार जाहाला ।
मोदलीं मांडलीं छेत्रें । आनंदवनभुवनीं ॥३३॥
बुडाले भेदवाही ते । नष्ट चांडाळ पातकी ।
ताडिले पाडिले देवें । आनंदवनभुवनीं ॥३४॥
गळाले पळाले मेले । जाले देशधडी पुढें ।
निर्मळ जाहाली पृथ्वी । आनंदवनभुवनीं ॥३५॥
उदंड जाहालें पाणी । स्नान संध्या करावया ।
जप तप अनुष्ठाने । आनंदवनभुवनीं ॥३६॥
नाना तपें पुन्हश्चणें । नाना धर्म परोपरी ।
गाजली भक्ती हे मोठी । आनंदवनभुवनीं ॥३७॥
लीहीला प्रत्ययो आला । मोठा आनंद जाहाला ।
चढता वाढता प्रेमा । आनंदवनभुवनीं ॥३८॥
वंड पाषांड उडालें । शुध आध्यात्म वाढलें ।
राम कर्ता राम भोक्ता  । आनंदवनभुवनीं ॥३९॥
देवाळयें दीपमाळा । रंगमाळा बहुविधा ।
पुजीला देव देवांचा । आनंदवनभुवनीं ॥४०॥
रामवरदायनी माता । गर्द घेउनी उठीली ।
मर्दिले पुर्वींचे पापी । आनंदवनभुवनीं ॥४१॥
प्रत्यक्ष चालिली राया । मूळमाया समागमे ।
नष्ट चांडाळ ते खाया । आनंदवनभुवनीं ॥४२॥
भक्तांसी रक्षिलें मागें । आतां ही रक्षिते पाहा ।
भक्तांसी दीधलें सर्वै । आनंदवनभुवनीं ॥४३
आरोग्य जाहाली काया । वैभवें सांडिली सीमा ।
सार सर्वस्व देवाचें । आनंदवनभुवनीं ॥४४॥
देव सर्वस्व भक्तांचा । देव भक्त दुजें नसे ।
संदेह तुटला मोठा । आनंदवनभुवनीं ॥४५॥
देव भक्त येक जाले । मिळाले जीव सर्व हि ।
संतोष पावले तेथें । आनंदवनभुवनीं ॥४६॥
सामर्थ्यें येशकीर्तीची । प्रतापे सांडिली सीमा ।
ब्रीदेंची दीधलीं सर्वै । आनंदवनभुवनीं ॥४७॥
राम कर्ता राम भोक्ता । रामराज्य भुमंडळीं ।
सर्वस्व मीच देवाचा । माझा देव कसा म्हणों ॥४८॥
हेंची शोधुनी पाहावें । राहावें निश्चळीं सदा ।
सार्थक श्रवणें होतें । आनंदवनभुवनीं ॥४९॥
वेद शास्र धर्मचर्चा । पुराणें माहात्में किती ।
कवित्वें नूतनें जीर्णें । आनंदवनभुवनीं ॥५०॥
गीत संगीत सामर्थ्यें । वाद्यकल्लोळ उठीला ।
मिळाले सर्व आर्थार्थी । आनंदवनभुवनीं ॥५१॥
वेद तो मंद जाणावा । सीद्ध आनंदभूवनीं ।
आतुळ महिमा तेथें । आनंदवनभुवनीं ॥५२॥
मनासी प्रचीत आली । शब्दी विश्वास वाटला ।
कामना पुरती सवैं  । आनंदवनभुवनीं ॥५३॥
तेथुनी वांचती सर्वै । ते ते सर्वत्र देखती ।
सामर्थ्य काये बोलावें । आनंदवनभुवनीं ॥५४॥
उदंड ठेविलीं नामें । आपस्तुतीच मांडिली ।
ऐसें हें बोलणेम नाहिं । आनंदवनभुवनीं ॥५५॥
बोलणें वाउगें होतें । चालणें पाहिजे बरें ।
पुढें घडेल तें खरें । आनंदवनभुवनीं ॥५६॥
स्मरलें लिहिलें आहे । बोलता चालता हरी ।
काये होईल पाहावें । आनंदवनभुवनीं ॥५७॥
महिमा तो वर्णवेना । विशेष बहुतांपरीं ।
विद्यआपीठ तें आहे । आनंदवनभुवनीं ॥५८॥
सवसद्या कळा विद्या । न भूतो न भविष्यति ।
वैराम्य जाहालें सर्वैं । आनंदवनभुवनीं ॥५९॥

॥ इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP