मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|

किष्किन्धा कांड

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


गणेशा इशा हा परेशा उदारा । सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा । सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा । मनीं चिंतितां कामना पूरताती । असे सत्य नेमस्त माझी प्रचीती ॥१॥
नमो शारदा सर्वसंगीतमूर्ती । महा हसलीला कळा सर्व कतीं । जयाला दया देंतसे स्फूर्ति फूते । बहू घोर संसारिंचें मूळ तूटे ॥२॥
नमो साधुसंतां महंतां महंतां । सदा निश्चयो वीतरागी सतंता । भवीं बूडतां दीन तात्काळ काढी । तया वर्णवेना मला बुद्धि थोडी ॥३॥
अनिर्वाच्य वाचेसि कैसें वदावें । अतर्क्यासि तर्कें कसें आकळावें । अवीनाश कोंदाटलें सर्वठायीं । मुढा ज्ञान होतांचि त्या स्वामिपायीं ॥४॥
नमो रामराया कथारंग राया । बहू वर्णितां स्फूर्ति दे देवराया । मुनीकाव्य हें भव्यशोकापहारी । हरा मानसीं ध्यास हा सौख्यकारी ॥५॥
चरित्रें रघूनाथजीचीं अपारें । मनोरम्य विस्तारलीं सौख्यकारें । तयांमाजिं तूं एक एकाक्षरासी । वदे पार नाहीं तया सुकृतासी ॥६॥
जगन्नाथ हा राम कैवल्यदाता । घडे वीघडे सर्व याचीच सत्ता । जनाचे मनीं हति तें हेतु जाणे । परी वर्तवीतो भवीं थोर मानें ॥७॥
रघुनाथ लक्षूमणू आणि सीता । वनीं वास तीघांस नि:शेष होता । पुढें जानकी चोरिली रावणानें । बहू शोक केला रघूनायकानें ॥८॥
वनीं रामलक्षूमणू हिंडताती । सिता रावणें चोरिली धुंडिताती । अकस्मात तेव्हां सुचे राघवासी । विचारूं म्हणे आदरें सुग्रिवासी ॥९॥
ऋषीमूख माहागिरी पैल पाहे । कपीराज नीळांगि तेथेंचि आहे । कदाचीत त्या पूस आसेल ठावें । सुमित्रा तयालागीं वातू पुसावें ॥१०॥
चलावें समर्था म्हणे ब्रह्मचारी । महावीर जाताति ते पंथहारी । बहू झाडखंडें प्रचंडें उदंडें । अखंडें अखंडेंचि बंडें उदंडें ॥११॥
बहू थोर झाडी तयामाजिं आले । त्वरें सर्व लंघूनि पंपेसि गेले । तरू सुंदरू रम्य छाया बसाया । म्हणे शेष यातेचि या देवराया ॥१२॥
सुकूमार पाथीं कदाही न चाले । बहू हिंडतां हिंडतां कष्ट जाले । अशा कारणें राम पंथीं निजेले । अकस्मात ते सुग्रिवें देखियेले ॥१३॥
रुपें योगाधारी मना सौखकारी । महावीर हा कोण कामाधिकारी ।मनीं वाटतें वाळिनें धाडिले हे । भयाभीत होऊनि चक्कीत पाहे ॥१४॥
हनूमंत बोले तया सुग्रिवासी । नव्हे हो तसे साक्ष येते मनासी । कळेना लिळा दीसती सौख्यवासी । असें वाटतें साह्य आलें तुम्हांसी ॥१५॥
तैं सुग्रीव बोले तरी जाय आतां । मनांतील घेऊनियां बुद्धि आतां । तया धाडिलें राम सौमित्र जेथें । स्वयें चालिला शीघ्र तो दूरि पंथे ॥१६॥
हनूमंत दूरूनि येऊनि पाहे । सुमित्रासुतू सिद्ध तो बैसलाहे । रघूराय मांडीवरी सौख्यकारी । पुढें बोलतां जाहला तो वनारी ॥१७॥
रुपें योगमूर्ती धनुर्बान हातीं । वयें बाळलीला फिरा कां दिगंतीं । पुढें कोठपर्यंत जाणें तुम्हांसी । अहां कोण ऐसें वदां निश्चयेंसीं ॥१८॥
कपी कोण तूं पूससी कासया रे । मला सांग साकल्य तूं सर्व सारें । प्रसंगीं फणी बोलतो तो स्वभावें । प्रिती मारुती जाणवी सर्व भावें ॥१९॥
प्रभू अंजनीमाय बा बा कपीची । पिता तत्त्वतां वायु माझा तसाची । पुसाया तुम्हां सुग्रिवें पाठवीलें । समर्थाप्रती सर्व म्यां जाणवीलें ॥२०॥
प्रतीउत्तरें बोलता शेष जाला । कपी ऐक रे सांगतों सर्व तूला । जनीं सूर्यवंशीं नृपाधीक राजे । बहू कीर्तिचा घोष अद्भूत गाजे ॥२१॥
तया वंशिंचे दोन हे बंधु पाहे । रघुनाथ लक्षूमणू नांव आहे । पिता धाडिता जाहल्या त्यां वनासी । निघालों जनीं पंथिं या सौख्यरासी ॥२२॥
सदा सर्वदा संतसेवा घडावी । अखंडीत वृत्ती पदीं या जडावी । सवें चालिलों आवडी राम जातां । जगन्माथ ही जानकी विश्वमाता ॥२३॥
वनीं वास तीघांस कीतेक काळीं । सिता रावणें चोरिली भूमिबाळी । तयेकारणें धुंडितों लागवेगें । किती फीरतों शुद्धि कोठें न लागे ॥२४॥
महावीर तुम्ही धनुर्बाणधारी । करूं दीधली रावणा केविं चोरी । तयालगिं तो शेष साकल्य बोले । न चालेचि येऊनि कापटय केलें ॥२५॥
सुवर्णाचिया त्या मृगालगिं तेणें । चरायासि तैं धाडिलें रावणानें । जगन्माय ती बोलली राघवासी । दिजे कंचुकी स्वामिनें आपणासी ॥२६॥
उठे शीघ्र धांवे मृगाच्याच पाठीं । शरें मारि त्या राम कंदर्पकोटी । अकस्मात जाला ध्वनीघोष तेथें । मला धाडि श्रीजानकी त्याच पंथें ॥२७॥
महाथोर गुंफा तयेमाजिं सीता । त्वरें भींवतीं घातली रेघ जातां । पुढें रावणें याचकीं वेष केला । तिथें भीक मागावया शीघ्र आला ॥२८॥
न चालेचि कांहीं पुढे जाववेना । तया जानकीतें कदा नेववेना । करुणास्वरें उत्तरें फार बोले । दयें घालितां भीक तत्काळ नेलें ॥२९॥
मृगा मारिलें राघवें बाणघातें । गृहामाजिं येतां न देखे सितेतें । जरी भेटता रावणू पापरूपी । नसे प्राप्ति ब्रह्मादिकां गोष्टि सोपी ॥३०॥
महा विक्रमू राघवाचा कळेना । रणमाजिं हो ठाण ज्याचें चळेना । पुरुषार्थ सांगीतला सर्व कांहीं । वदे मागुती देखिलें त्यासि नाहीं ॥३१॥
जयें सर्व क्षत्रांस निधूत केलें । धरित्रीवरी नांव तेंही न चाले । तया भागवा राघवें जिंकियेलें । कळेना तुला नेणती तूं कपी रे ॥३२॥
हनूमंत वीचारितो अंतरेसीं । वयें बाळलीला वदे विक्रमासी । तरी यावरी वृक्ष घालूनि पाहूं । असे भाउनी झेलिला ऊर्व्व बाहु ॥३३॥
बहू थोर झाडें झुबाडेंचि खोडें । कपी मोडता जाहला तैं कडाडें । अकस्मात टाकी रघूनाथ जेथें । शरें शीघ्र वारी सुमित्रू तयांतें ॥३४॥
कपी मागुता मागुता थोरथोरें । बळें वृक्ष घेऊनियां भूभुकारें । वरी टाकितां शेष वारी तयांतें । विचारी मनीं काय कीजे अशातें ॥३५॥
रघूनायकाला बहू झोंप आली । कपी मागुता मागुता वृक्ष घाली । जया हालतां बोलतां चालताही । करी प्रेत्न नाना न चालेचि कांहीं ॥३६॥
खुणावी दटावी तयातें उठावी । पुढें मागुता वृक्ष पून्हां उठावी । धबाबां बहूसाल पाषाण टाकी । वरीच्यावरी वीर बाणेंचि झोंकी ॥३७॥
बहू वृक्षपाषाण नानापरींचे । कडे टाकिले मोठेमोठे गिरीचे । परी अल्प रामावरी येउं देना । महावीर हा शेष लक्षीं चुकेना ॥३८॥
बहू वारितां वारितां ढीग झाले । गिरीचेपरी दूर होऊनि ठेले । मनामाजिं चक्कीत जाला वनारी । पुरावा करी तीतुकाही निवारी ॥३९॥
बहू घोष वीशेष कित्येक केले । कडाडां तरू मोडिले चूर केले । न चाले कपीचें नसे वृक्ष माथा । नसे तूळणा तूळ्णा तूळितां तया समर्था ॥४०॥
बहूसाल म्यां मानसीं गर्व केला । भला वीर सौमित्र तो देखियेला । पहा एक तो धाकुटा वीर्यसिंधू । प्रभू रामनिद्रिस्त हा दीनबंधू ॥४१॥
कपीही उगा बैसला स्थीर राहे । महावीर लक्षूमणू त्यासि पाहे । दिनोद्धारणें सांग विश्रांति केली । प्रसंगीं उठाया तया वेळ आली ॥४२॥
रघूनायकालगिं जार्गित जाली । कपीवृक्षमाथ्यावरी दृष्टि गेली । सुवर्णें कसी कांस वीराजताहे । सुमित्रा म्हणे राम आश्चर्य पाहे ॥४३॥
हनूमंत ऐकूनि विस्मीत ठेला । वदे अंजनी तोचि हा स्वामि आला । मनामाजिं वीचारिलें आदरेंशीं । नमस्कार साष्टांग केला प्रभूसी ॥४४॥
पदीं मस्तकू ठेविला शीघ्र भावें । वरू दीधला स्वामिदेवाधिदेवें । कृपाळूपणें राम बोले तयासी । कपी वज्रदेही चिरंजीव होसी ॥४५॥
महामस्तकीं हस्त सीतापतीचा । जयाच्या वारा यत्न नाहीं विधीचा । शशी सूर्य तारागणू सृष्टि आहे । चिरंजीव केलें सदा वज्रदेहें ॥४६॥
कपीमानसीं सूख ऊदंड जालें । दयासागर राघवें थोर केलें । बहूसाल आनंदला राम तोषें । कपी लाधला भाव त्याचा विशेषें ॥४७॥
पुढें मारुती स्तूति उदंड बोले । म्हणे धन्य कीं भाग्य हे दीन आले । परी हीन जे दीन त्या उद्धरीलें । रघूनायका ब्रीद साचार केलें ॥४८॥
दयाळा तुझीये दयेवीन कांहीं । महायत्न केले तुझी भेट नाहीं । परी स्वप्रसें भासतें या मनाला । नसे पुण्य कीं सौख्य जालें दिनाला ॥४९॥
प्रभू अंजनीला पुसे लागवेगें । पुढें अंजनी सर्वहि खूण सांगे । तुझी कास जाणेल तो स्वामि तूझा । तयारंभिं ऊतावळा प्राण माझा ॥५०॥
गिरीशीखरें थोरथोरें अपारें । वनें भूवनें पावनें सौख्यकारें । बहू हिंडलों धुंडिलें ओळखाया । परी दीससी तूं न गा देवराया ॥५१॥
बहू आवदी तांतडी लोचनांला । वदे कार्य कांहीं कळेना जनाला । अवस्था मनीं आसतां प्राप्ति नाहीं । न वाटे समर्था प्रभू गोड कांहीं ॥५२॥
अकस्मात ते मात कित्येक काळीं । प्रभू राम आला ऋषीराजमेळीं । अहल्या पदीं दिव्य होऊनि गेली । समर्था बहू कीर्ति विख्यात नाली ॥५३॥
अहा सत्य हें वाटलें सौख्य जीवा । उभा राहुं पाहें अतां पूर्व ठेवा । परी अंतरीं धीर केला धरेना । बहूसाल वीयोग पापी सरेना ॥५४॥
पहाया समर्था बहू यत्न केला । नव्हे साध्यता सर्वही व्यर्थ गेला । अतां पूर आला कृपेचा दयाळा । तरी प्राण हा सर्वहि तृप्त झाला ॥५५॥
यथार्थेचि वाक्या वदे तो वनारी । कृपाउत्तरें सौख्य दे रावणारी । बहू गोड वाणीं समाधान केलें । प्रसंगी कपीला सुधापान झालें ॥५६॥
पुढें शेष पायांवरी शीघ्र माथा । त्वरें ठेवितां ऊठवी रामभ्राता । बहुतांपरी उत्तरें गौरवीला । कपी मानसीं हर्ष ऊदंड जाला ॥५७॥
पुंढें राघवालगिं सौभित्र सांगे । कपी सुग्रिवाचा गिरी पैल शृंगें । तयें धाडिलें यासि शुद्धीस आहे । पुसाया तयालागीं तो राम बाहे ॥५८॥
कसा गा कपी तो कपीराज कोठें । कसा शीघ्र आम्हांसि येऊनि भेटे । सिता ठाउकी कीं तयालगिं नाही । प्रतीउत्तरू बोलतो भीमदेही ॥५९॥
हनूमंत बोले पुसावें तयाला । श्रुता ती मला नाही वार्ता दयाळा । परी वर्तमानासि तो दीनबंधू । म्हणे काय रे काय रे सौख्यसिंधू ॥६०॥
महाभीम बोले रघूनायकासी । करा सौख्य तें आदरें सुग्रिवासी । करी सर्वही साह्यता तो स्वभावें । परी साह्य आधीं तयाचें करावें ॥६१॥
त्वरें जाय घेऊनि ये त्यांसि आतां । भयाभीत होऊं नको सोडि चिंता । म्हणावें तुझें ऊसणे सर्व घेतो । पुढें राज्य कांता तुझी तूज देतों ॥६२॥
उडाला कपी साक्षपें भीमरूपी । त्वरें सुग्रिवा सर्व वार्ता समर्पी । बरा काळ आला तुझा भोग गला । भल सांगतों भेट त्या राघवाला ॥६३॥
महावीर हे धीर मोठे प्रतापी । रणीं भीडतां दीसती काळरूपी । तयाचे पुढें वाळि तो काय कीती । तुला साह्य होती पहावी प्रचीती ॥६४॥
महा विक्रम सांगती थोर त्यांचा । नसे अल्पही लेश तो दूरिताचा । तरी त्यांसि येथेचि घेऊनि यावें । मनांतील दीसेल सर्व स्वभावें ॥६५॥
पुन्हां अंजनीसूत येऊनि पाहे । रघूनाथ लक्षूमणू बैसलाहे । समर्था दिनालगिं ह्या थोर कीजे । उदासीन त्या सुग्रिवाला न कीजे ॥६६॥
दयाळू म्हणे गा बरें जाऊं आतां । त्वरें चालिला त्या गृहाच्यानि पंथा । हनूमंत जाऊनि साकल्य सांगे । त्वरें बाहिरा येतसे लागवेगें ॥६७॥
अलंकार भांगार त्या जानकीचा । बहू रम्य लावण्य नानापरीचा । दशग्रीव लंकेसि नेते प्रसंगीं । जगन्माउली भूषणें सर्व त्यागी ॥६८॥
अकस्मात्‍ ते सुग्रिवा प्राप्त झाले । गृहामाजिं पेटींत घालूनि ठेलें । प्रसंगीं रघूनाथमेटी निघाले । अलंकार घेऊनि सन्मूख आले ॥६९॥
अती आदरें भेटला राघवासी । नमस्कार साष्टांग केला प्रभूसी । कृपाळूपणें राघवें ऊठवीला । सुमित्रासुतेंहि बहू गौरवीला ॥७०॥
पुढें बैसले सर्वही स्वस्थ झाले । अती आदरें राम मंजूळ बोले । तुला आणि वाळीस वीराध जाला । कशा कारणें काय अन्याय केला ॥७१॥
कृपाळूपणें ऐक तूं रामराजा । कपीराज बोले यथार्थेंचि वोजा । बहू राक्षसू थोर मायावि आला । तयें वाळिशीं थोर संग्राम केला ॥७२॥
बहू झुंजतां झुंजतां तो पळाला । महा एक गूहेंमधें शीघ्र गेला । तया पाठिशीं धांवला शीघ्र वाळी । मला ठेविलें रक्षणा तेचि काळीं ॥७३॥
पुढें युद्ध दोघांसि ऊदंड झालें । बहू रक्त तें मांस बोहर आलें । प्रसंगीं तये घोष अद्भूत जाला । मला भासलें इंद्रसूतू निमाला ॥७४॥
तया ऊपरी कर्म म्यां सांग केलें । पुरीमाजिं सर्वांस हें जाणवीलें । प्रधानीं समस्तीं मला राय केला । पुढें एक संवत्सरें वाळि आला ॥७५॥
तयें देखिलें राज्यधारी प्रसंगें । बहू शोभला धांवला लागवेगें । मला शीघ्र ताडिन्नलें थोर हातें । पळालों त्वरें चालवेना जि वित्वें ॥७६॥
कृपाळूपणें पूसिलें राघवानें । तुला ये स्थळीं सोडिले कां तयानें । रवीसूत साकल्य सांगे प्रभूला । वरी त्याच रे तो ऋषीशाप जाला ॥७७॥
ऋषी कोण तो कां तये शापियेलें । कपी सुग्रिवातें रघूराज बोले । प्रसंगीं कथा मूळपासूनि सांगे । दिनानाथ साकल्य पूसे प्रसंगें ॥७८॥
महाराक्षसू स्थूळ अद्‍भूत होता । बहू थोर ह्मैसा सदा रूपवर्ता । तया दुंदुभी नाम तें देवराया । नसे तूळितां दो दूसरा त्या तुळाया ॥७९॥
अती मातला गर्व पोटीं न साहे । समुद्रासि जाऊनि युद्धासि बाहे । भयें भूलला सिंधु बाहेर आला । बहू रत्न देऊनि संतोषवीला ॥८०॥
म्हणों लागला सागरू पैल पाहे । महाचंड युद्धासि तो थोर आहे । तुवांही बहू मानसीं गर्व केला । तिथें लैकरी जाय झुंजेल तूला ॥८१॥
पुढें दुंदुभी पर्वतालगिं सांगे । महा थोर पाषाण लोटीत वेगें । गिरीही तया लीन होऊनि आला । बहू स्तूति बोलेनि आनंदवीला ॥८२॥
पहा पर्वतू राक्षसालगिं सांगे । बळी वाळि प्रख्यात हो पैल वागे । पुढें वीर किष्किंधपूरास आला । समाचार वीदीत जाला कपीला । रणा दारुणाभाजिं दोघे बळाचे । महाप्रौड युद्धीं तये दुंदुभीचे ॥८४॥
बळें भांडतां भांडतां थोर ह्मैसा । तया लाथ मारी कपी काळ जैसा । पदें हाणतां देह तो चूर जाला । अकरमात ऊडोनि येथेंचि आला ॥८५॥
तपस्वी मुनी बैसला ध्यानकर्ता । तदा एक नेमेंचि सामर्थ्यधर्ता । तयें देखिला पर्वतू रक्तमेदा । मतंगू मनीं पावला थोर खेदा ॥८६॥
असा तो कसा कोण तो मातलाहे । तयालगिं हा शाप माझाचि आहे । ऋषीपर्वतीं येतवेळे तयाला । क्षयो प्राप्त होईल नेमस्त त्याला ॥८७॥
म्हणोनी समर्था तया येववेना । किती जाहलेंची तरी मारवेना । कृपाळूपणें साह्य माझें करावें । दयासागरा दीन ते उद्धरावे ॥८८॥
निराधार आधार कांहींच नाहीं । बहू गांजलों पीडलों थोर पाही । नये बोलतां काय सांगूनि कोणा । वदों काय मूखें अती दैन्यवाणा ॥८९॥
जया सांगणें तो तया भीत आहे । महाक्रूर कोणीच तोही न राहे । प्रसंगें मला जोडले पाय तूझे । प्रभो पूरवावें तुवां कोद माझें ॥९०॥
तुझा पार आपार कोणा कळेना । कसा मी स्तवूं बुद्धि माझी वळेना । तरी सर्व जाणूनियां अंतरींचें । मनीं चिंतिलें पूरवावें दिनाचें ॥९१॥
दयासागरें राघवें धीर दीला । परी सर्वथा धीर येना कपीला । कपीचें महा थोर सामर्थ्य आहे । तयाचे पुढें काळ ऊभा न राहे ॥९२॥
तया दुंदुभीचें मढें पैल पाहे । समर्था गिरीतुल्य तें दसिताहे । असें झोंकि किष्किंधिहूनीच लातें । दुजा कोण द्याया तया साम्यतेतें ॥९३॥
दिसे कोटिकंदर्पलावण्य साजे । पुढें देखतां सौख्य ऊदंड माजे । जुना घोर कर्कोट तो वाळि आहे । तयालगिं जिंकावया कोण आहे ॥९४॥
पुढें राघवें दुंदुभीच्या मढयाला । पदें ताडिलें धाडिलें सागराला । तयीं जाहलें सौख्य तें सूग्रिवासी । वदे आदरें भागुतें या प्रभूसी ॥९५॥
तधीं रक्त मांसें बहू स्थूळ होतें । असां सूक्ष्मता प्राप्त झाली तयातें । अज्ञानें कदा वाळि तो जिंकवेना । समर्था प्रभू मानसीं धीर जेना ॥९६॥
प्रभू ताड हे सप्त वीतंड आहे । तया एक बाणेंचि भेदूनि पाहे । जरी भेदिले छेदिले ते प्रसंगीं । समर्था तरी वाळिसी जिंकिसी कीं ॥९७॥
पुढें ते कडोवीकडी ताड आहे । रघूनाथ लक्षूमणालगिं बाहे । पदें वाम अंगुष्ठ तो रेटियेला । तेणें सप्त मेळा बरा नीट जाला ॥९८॥
पुढें राघवें शीघ्र चंद्रार्धबाणें । बळें छेदिला ताड मांडूनि ठाणें । गिरीशृंग भेदृनि पृथ्वींत गेला । पुरें धांव पुरूनि भौंता निघाला ॥९९॥
रवीसूत आनंदला हो मनाला । अती निश्चयो वाटला त्या कपीला । कृपाळूपणें राम बोले तयासी । अतां जायगा झुंज तूं त्या कपीशीं ॥१००॥
पुढें वीर सुग्रीव युद्धासि गेला । कडाडीत तो ज्येष्ठ बाहेर आला । तुला काय कोठू नि सामर्थ्य आलें । परी पावसी मृत्यु वाईट केलें ॥१०१॥
अतां साह्य बोले विरें थाप मारी । तयालगिं सुग्रीव नेटें धिकारी । गिरी थोरला टाकिला वाळिमाथां । तयें वारिला शीघ्र हाणूनि लाता ॥१०२॥
पुढें पाडिला भूतळीं सुग्रिवासी । कठोरें करे ताडिलें बांधवासी । रवीसूत खालीं वरी वाळि आहे । रघूराज दूरूनि लक्षीत आहे ॥१०३॥
कळेना रिपू कोण त्याला वधावें । दिसे सारिखा सारिखा त्यासि भावें । रघूनंदनें धीर केला प्रसंगीं । विरू सुग्रिवू तो पळे लागवेगीं ॥१०४॥
वदें राघवालागीं हें काय केलें । दयासागरें कां मला मोकलीलें । तुम्हांलगिं सांगितलें सर्व होतें । तुम्हां देखतां ताडिलें मुष्टिघातें ॥१०५॥
वदे रामराजा विरा ऐक वोजा । कळेनाचि तो कोण शत्रूचि तूझा । अकस्मात तूलचि लागेल जेव्हां । न चाले पुढें सर्वथा यत्न तेव्हां ॥१०६॥
तयाकारणें धीर ऊदंड केला । रघूनायकें हार त्यालगिं दीला । गळां हार त्याला कपी खूण जाली । कपी जायगा मागुता धांव घाली ॥१०७॥
बहुतांपरी धाडिलें सुग्रिवासी । गिरीश्रृंग घेऊनि धांवे त्वरेंशीं । उठे शकसूतू तयालगिं तारा । न जावें म्हणे येत नाहीं विचार ॥१०८॥
प्रितीपात्र हा अंगदू सांगताहे । कपीलगिं तो जाहला राम साहे । समर्था तरी कासयालगिं जावें । असें जालियां येश नाहीं स्वभावें ॥१०९॥
रघूनाथ हा थोर माहाप्रतापी । अनाथासि देखूनि कृपा समपीं । तयाशीं कदा झुंजतां पूरवेना । पुढें देखतां धीर पोटीं धरेना ॥११०॥
न माने तया सांगतां गर्व केला । बहूसाल वाळीस तो क्रोध आला । म्हणे ऐक तो रे दशग्रीव आला । तयें चोरिलें कीं प्रिये जानकीला ॥१११॥
वधूकारणें सुग्रिवा मेळवीतो । तयाचें शरें आमुचा प्राण जातो । असें हें घडों पाहतें तेचि काळीं । गिरीशृंग ते राहती अंतराळीं ॥११२॥
अशी तूं कशी सांगशी या भयाला । कसा कोण मी दीसतों वाळि तूला । बळें पालयें या भुगोळास घाली । बरें पोकळीमाजिं ब्रह्मांड झेली ॥११३॥
निघाल बळी दीधली हाक मोठी । दिशा दिग्गजां जाहली थोर आटी । महा पुच्छ ऊभारिलें सव्य बाहो । बहूसाल कोपिन्नला तप्तदेहो ॥११४॥
अकत्मात तो वाळि सुग्रीव ताडी । बहूं कोपला थोर पोटीं कडाडी । गळां हार तो मार वेगीं चुकावी । तया शेष देखोनि माथा तुकावी ॥११५॥
बहू कोपला तापला थोर तापा । पुन्हां मागुता ताडिला वज्रथापा । तळीं घातलें शीघ्र त्या सुग्रिंवासी । रघूराज दूरूनि लक्षी तयासी ॥११६॥
पुढें सज्जिलें चाप चंद्रार्धबाणे । भले लक्षिले वक्ष तें वज्रठाणें । तया वाळिला मूर्छना थोर आली । निचेष्टीत भूमीवरी आंग घाली ॥११७॥
बहूसाल त्या सुग्रिवें शोक केला । सुकूमार कूमार तो शीघ्र आला । पुढें शीघ्र वार्ता पुरीमाजिं गेली । अकस्मात तारा भुमीं अंग घाली ॥११८॥
नव्हे धीर डोळां बहू नीर लोटे । पिटी भाळ हो आजि कल्पांत वाटे । सवरें धांव नारायणा भासि पाहें । महावीर तो वाळि मूर्च्छीत आहे ॥११९॥
समर्था मला कासया मोकलीलें । बहू सूख मागील तें आठवीलें । अहारे अहा हें असें काय झालें । कसें पूर्व संचीत ठाकूनि आलें ॥१२०॥
शिराखालिं घालेनियां वाम जानू । म्हणे गूण तूझे किती काय वंर्णू । बळी तूं बळाचा दुजा स्वामि कैंचा । वदे विक्रमू सत्य जो सत्यवाचा ॥१२१॥
तरी अंगदें सूचना सर्व केली । यथार्थै तरी मीं बहू जाणवीली । रघूनाथ विख्यात पूरुष ज्याचा । मरीचीसि तो घाय वारा जयाचा ॥१२२॥
सुबाहू रणीं पाडिला एक बाणें । अधीं ताटिका मारिली थोर त्राणें । शिवें चाप दीलें तया भागवाला । बळें भग्र केलें महा दर्प ज्याला ॥१२३॥
असा राम जो साह्य त्या सुग्रिवासी । बळें ताड छेदूनि छेदी गिरीसी । कशी वेळ आली अशा वाळिला हे । इयाऊपरी काळ तो क्षीण आहे ॥१२४॥
किती बोलिल्या कांहीं केल्या न राहे । वदे मागुता मागुता घोर आहे । तुजालगिं त्या राघवें मुक्त केलें । परी भाग्य सौभाग्य माझेंचि गेलें ॥१२५॥
बहू ताप संताप ऊदंड केला । रघूराज तो सन्मुखीं देखियेला । प्रभूशीं तशी बोलती शीघ्र जाली । असंभाव्य ते स्तूति ऊदंड केली ॥१२६॥
दिनोद्धारणा कारणा भक्तपाळा । रघूनायका दीनकारुण्यलीळा । तुझें नाम विश्राम लोकत्रयासी । निजध्यास विश्वास मोठा शिवासी ॥१२७॥
नव्हे न्याय अन्याय दीसूनि आला । कसा साह्य जालसि त्या सुग्रिवाला । तया रावणालगिं बांधोनि घाली । तशा वाळिशी मैत्रिकी कां न केली ॥१२८॥
अयोध्येसि तो भरतू राज्यकारी । सिता रावणें चोरिली दिव्य नारी । तुझा शत्रु जो सोडिलें कां तयाला । कपी वाळिनें काय अन्याय केला ॥१२९॥
पुढें वाळिची मूर्छना शांत जाली । रवीसूत ऊभा वरी दृष्टि गेली । बहूतांपरी सुग्रिवा हीत सांगे । झळंबे मनीं लोभ तेणें प्रसंगें ॥१३०॥
जगन्नाथ हा राम कारुण्यसिंधू । कृपाळूपणें भेटला दीनबंधू । महासुकृतें जोडले पाय तूझे । बहूतांपरी आदरें साह्य कीजे ॥१३१॥
कपी सर्व घेऊनि जा त्रीकुटासी । रघूनाथ मारील त्या रावणासी । सिते विश्वमातेसि आणूनि देई । तयाऊपरी तूं पुरीमाजिं जाई ॥१३२॥
पुढें सर्वदा सख्य त्याशीं करावें । कदाही अणूमात्र रीतीं नसावें । तुला थोर आधार हा जाण भावें । पुरीमाजिं त्वां राज्य सूखें करावें ॥१३३॥
महा थोर हें राज्य किष्किंधपूरीं । असावें बहू विक्रमें नामधारी । परी पाहतां सर्वही तूज आहे । परी युक्तिनें बुद्धिनें नीति राहे ॥१३४॥
अरे पद तें मंत्रिया अंगदाला । जसा मी तसा तूंचि आहेसि त्याला । किती सांगणें तूं भला दक्ष आहे । बरी कीर्ति जे तेचि ते ऊरताहे ॥१३५॥
अती नीखूं मी तुला काय कीं तें । असे मृत्यु त्याची तुवां पाळिजेतें । प्रवृत्तीजनामाजिं हे गोष्ट आहे । परी सांगतों जीव माझा न राहे ॥१३६॥
पुढें अंगदा देखतां कंठ दाटे । बहूसाल नेत्रोदकें पूर लोटे । प्रसंगीं महा मोह आला कपीसी । रुदे बोलतां अंगदा कूमरासी ॥१३७॥
अरे अंगदा अंतरीं फार होते । मज देखतां राज्य देईन तूते । परी कल्पिलें हें कदाही घडेना । विधीसूत्र निर्माण हे लोटवेना ॥१३८॥
बहूतांपरी बोलिला सुग्रिवासी । मशीं साम्य रे मानि तूं आदरेंशीं । महासुकृतें जोडली रामसेवा । अखंडीत हा भाव पायीं असावा ॥१३९॥
बहू शीकवीलें तया अंगदाला । पुढें लक्षिता जाहला राघवाला । म्हणे धन्य हें भाग्य ती भेटि जाली । करूनास्वरें स्तूति ऊदंड केली ॥१४०॥
किती साधनें साधिती योगधारी । गिरीकंदरीं उग्रता पूर्णहारी । तयालगिं तूं किंचिती भेट देसी । नसे तूळणा आमुच्या सुकृतासी ॥१४१॥
महापातकी घातकी थोर वाला । किती ब्रह्महत्या वदे कोण त्याला । असंख्यात नामें तया भेटलासी । नसे तूळणा आमुच्या सुकृतासी ॥१४२॥
अहल्या शिळा कष्टली त्या वनांतीं । सदा सर्वदा तूज चिंतीत होती । बहूतां दिनां दीन तूं उद्धरीसी । नसे तूळणा आमुच्या सुकृतासी ॥१४३॥
वनामाजिं भिल्ली महाभक्त होती । अखंडीत ते मानसीं पाय चिंती । उचिष्टें तरी सेविसी त्या फळांसी । नसे तूळणा आमच्या सुकृतासी ॥१४४॥
कळेना लिला राहिले वेद चारी । बहू शीणला वर्णितां सृष्टिधारी । अकस्मात पायींच धांवनि येसी । नसे तूळणा आमच्या सुकृतासी ॥१४५॥
नसे अल्पही स्वल्पही पुण्य कांहीं । बहू चंड ऊदंड पाखंड देही । महा सूख अद्भूत वालीस देसी । नसे तूळणा आमच्या सुकृतासी ॥१४६॥
तुझें नाम हेंची महा पुण्य भासे । तुझे दर्शनें हेतु तो सर्व नासे । करें बाण या हदयीं स्पर्शलासी । नसे तूळणा आमुच्या सुकृतासी ॥१४७॥
परी अल्पही होय देहासि वेथा । कृपासागरा सोडवावें समर्था । तुझा बाण निर्वाण जाला न सोडी । दयाळा तुझा तूंचि येऊनि काढी ॥१४८॥
प्रसंगें वदे वाळि हा दैन्यवाणा । कृपाळूपणें ऊठिला रामराणा । उरीं पाय देउनियां बाण काढी । मुखीं रामनामेंचि तो प्राण सोडी ॥१४९॥
सुरांचा नमीं सर्व मेळा मिळाला । बहू तोष तो पुष्पवर्षाव केला । आनंदें बहू गर्जना रामनामें । बळें वाजली टाळिलें विघ्र रामें ॥१५०॥
पुढें सर्व गंधर्व तेथें मिळाले । अकस्मात स्वगांर्गगनीं नृत्य केलें । मनोरम्य आंरभिलें गायनासी । आलापेंचि तो रोध सिंधूजळासी ॥१५१॥
दमानें बहू रंगसंगीतरंगे । फणी तो भ्रमें ऊर्ष्व धांवें प्रसंगें । स्वरांच्या स्वयें क्रोधल्या देवकोटी । झणीं जाणते त्या कळे स्वर्ग लोटी ॥१५२॥
पुढें नारदादीक कीतेक आले । समस्तां मनें सूख ऊदंड जालें । कथाभाग तो पाहिजे चालवीला । प्रसंग तया वाळिला मृत्यु जाला ॥१५३॥
अती लोळ कल्लोल कोल्हाळ जाला । महाशब्द नानापरी घोष जाला । बहू दु:ख जालें तया सुग्रिवाला । कृपाळुपणें राम बोले तयाला ॥१५४॥
उभा राम निष्काम लावण्यखाणी । मुनी देव गंधर्व गाती पुराणीं । धनुष्यासि टेंकोनियां वाम बाहें । कृपाळूपणें सुग्रिवालगिं बाहे ॥१५५॥
विचारें अवीचार कां प्राप्त जाला । उजेडासि अंधार जिंकोनि आला । महाज्ञानिया तो भवीं बूडवीला । असें दीसतें भासतें या मनाला ॥१५६॥
सुबुद्धा तुवां शीघ्र आतां उठावें । विधीयुक्त तें कर्म सर्वैं करावें । बहू शोक केल्या पुढें काय आहे । जनीं जाणता तूं विचारूनि पाहें ॥१५७॥
असंभाव्य दु:खानळे प्राण फूटे । प्रभू बोलतां वीर तात्काळ ऊठे । रवीसूनुच्या बोलिले हदयासी । विधीयुक्त आरंभिलें या विधीसी ॥१५८॥
महा पाप त्या नाम घेतां न राहे । असा राम विश्राम दृष्टीस पाहे । देहेवेशघातासि संपादियेलें । यथासांग जें कर्म तें सांग केलें ॥१५९॥
पुढें रामभेटी कपीराज गेले । डभे हात जोडोनि ऊदीत ठेले । रघूनायके सुग्रिवा बैसवीलें । प्रधानाप्रती आदरें वाक्य बोले ॥१६०॥
तुम्ही सर्व तात्काळ पूरीसि जावें । कपीलगिं भद्रासनीं बैसवावें । प्रधानीं तिहीं राम आज्ञेप्रमाणें । महावीर सुग्रीव नेला स्फुराणें ॥१६१॥
समस्तीं विधीयुक्त तो पट्ट दीला । कपीराज भद्रासनीं बैसवीला । रघूनाथनामेंचि निर्घोष केला । निशाणीं + बहू वाद्य कल्लोळ जाला ॥१६२॥
कपी अंगदालगिं प्राधान्य दीलें । समस्तां मनीं सूख ऊदंद जालें । पुरी सर्व श्रृंगारमंडीत केली । रघूनाथनामें गुढी ऊभवीली ॥१६३॥
प्रधानासि घेऊनि ये रामभेटी । त्वरें चालिला जाहली थोर दाटी । पुढें राम संनीध येऊनि ऊभा । वदे राम लक्षूनि कंदर्पगाभा ॥१६४॥
समर्थां तुवां दीन उद्धार केले । तयेंची प्रमाणें कृतकृत्य जाले । मनीं वाटतें हे जरी भक्तिभावें । दयाळा यथायुक्ति तूला पुजावें ॥१६५॥
अनूपम्य तो राम मंजूळ वाणी । कृपाळूपणें बोलिला चापपाणी । व्रतस्थी अम्हीम पट्टणातें न यावें । सदा दंडकारण्यवासी फिरावें ॥१६६॥
कपींद्रा तुवां शीघ्र पूरीस जावें । चतुर्मासपर्यंत सूखीं क्रमावें । अम्हीं या ऋषीपर्वती निश्चयेंशीं । प्रजन्यासि जातांचि यावें त्वरेंशीं ॥१६७॥
रघूनायका सख्य घेऊनि वेगीं । नमस्कार साष्टांग केला प्रसंगीं । कपीराज गेला निरोपें पुरीसी । रघूराज सौमित्र आरण्यवासी ॥१६८॥
बहू सूख जालें तया सुग्रिवासी । पुरी आणि तारा दिली आपणासी । प्रभू थोर सामर्थ्य याचें कळेना । श्रुती भांडती त्यां कदा आकळेना ॥१६९॥
चतुर्मास गेल्या कपी रीस येती । शिळासेतु बांधोनि लंकेस जाती । दशग्रीव मारूनि तेतीस कोडी । रघूराज हा आदरें देव सोडी
॥१७०॥
दिनानाथ हा दीन चिंता वहातो । जनीं भक्तिभावार्थ हाही पहा तो । मनीं दृढतां भक्ति केली जयानें । स्वयें घेतले जन्म सर्वोत्तमानें ॥१७१॥
दहाही बरे वेश सर्वोत्तमाचे । पहील्या प्रसंगींच शंखासुराचे । दुजा कूर्मरूपें धरी भारधारी । तिजाही जसा दाढ देऊनि वारी ॥१७२॥
चतुर्थामधें भक्त प्रर्‍हाद पाहे । धरी खूजटू पंचमामाजिं देहे । पुढें साहव्यामाजिं क्षत्रीच नाहीं । दिल राज्य विप्रासि सर्वत्र कांहीं ॥१७३॥
बळें सप्तमामाजिं तो देव सोडी । पुढे अष्टमा-कंस झाढूनि पाडी । प्रसंगी असे बौद्ध मौनावतारी । कलंकी मलेंच्छासि होतांचि मारी ॥१७४॥
दहा सार अव्तार सर्वोत्तमाचे । तयांमाजिं दोनी प्रसिद्धीस साचे । क्रिडा आथव्यामाजिं गोपाळपाळीं । रघूराज हा वानरीं रीसमेळीं ॥१७५॥
असे भिन्न नामें परी भक्त त्याचा । चिरंजीव हा दास विख्यात ज्याचा । कळेना मला अल्पही बुद्धि नाहीं । दयाळा कृपाळा कृपादृष्टि पाही ॥१७६॥
बहूसाल विस्तारली कीर्ति तूझी । कळेना बळें आकळे वाणि माझी । परी राहवेनाचि मी दीन तूझें । किजे हो क्षमा अल्प अन्याय माझे ॥१७७॥
किती पीडिलें वाळिनें सुग्रिवासी । बहुतांपरी राज्य दीलें तयासी । कृपाळूपणें पावला राम तेथें । दिलें राज्य कांता तयाची तयातें ॥१७८॥
अशी हे कथा ऐकतां सर्व भावें । तयाला रघूनाथ तात्काळ पावे । पुढेंही कदा दु:ख होणार नाहीं । सदा छंद आनंद ऊदंड देहीं ॥१७९॥
बहू पापतापासि हें नाम वारी । हरामानसीं गूज तें सौखकारी । म्हणोनी कथा राघवाची करावी । सदा सर्वदा सृष्टि सूखीं भरावी ॥१८०॥
सदा सर्वदा एकएकाचि श्लोकीं । अरे ऐकतां होइजे धन्य लोकीं । नसे हो नसे जन्ममाळा तयाला । पुढें संतसंगेंचि तो मुक्त जाला ॥१८१॥

॥ इति किष्किन्धा कांड समाप्त ॥ श्लोकसंख्या ॥१८१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP