अभिषेक मंत्र -
ॐ समुद्रज्येष्ठा सलिलस्यमध्यात्पुनानायंत्यनिवेशमानाः । इंद्रोयावज्रीवृषभोररादता आपोदेवीरिहमामवंतु ॥१॥
याआपोदिव्याउतवास्रवंतिखनित्रिमाउतवायाः स्वयंजाः । समुद्रार्थायाः शुचयः पावकास्ताआपोदेवीरिहमामवंतु ॥२॥
यासांराजावरुणोयातिमध्येसत्यानृते अवपश्यं जनानां । मधुश्चुतः शुचयोयाः पावकास्ताआपोदेवीरिहमामवंतु ॥३॥
यासुराजावरुणोयासुसोमोविश्वेदेवायासूर्जंमदंति । वैश्वानरोयास्वग्निः प्रविष्टस्ता आपोदेवी रिहमामवंतु ॥४॥
त्रायंतामिहदेवास्त्रायतांमरुतां गणः । त्रायंतां विश्वाभूतानि यथायमरपा असत ॥५॥
आप इदवाउभेषजीरापो अमीवचातनीः । आपः सर्वस्यभेषजीस्तास्तेकृण्वंतुभेषजं ॥६॥
हस्ताभ्यांदशशाखाभ्यांजिहवावाचः पुरोगवी । अनामयित्नुभ्यांत्वाताभ्यां त्वोपस्पृशामसि ॥७॥
इमाआपः शिवतमा इमाः सर्वस्य भेषजीः । इमाराष्ट्रस्यवर्धनीरिमाराष्ट्रभृतोमृताः ॥८॥
याभिरिंद्रमभ्याषिं चत्प्रजापतिः सोमंराजानंवरुणंयमंमनुं । ताभिरद्भिरभिषिंचामित्वा महंराज्ञांत्वमधिराजोभवेह ॥९॥
महांतत्वामहीनांसम्राजंचर्षणीनां देवी जनित्र्यजीजनदभद्राजनित्र्यजीजनत् ॥१०॥
अभिषेकाचे विशेष मंत्र -
विघ्नेशो क्षेत्रपो दुर्गा, लोकपाला नवग्रहः । सर्व दोष प्रशमनं, शीघ्रं कुर्वंतु शांतिदाः ॥१॥
ब्रह्मा सरस्वती विष्णु लक्ष्मीरपि शिवाश्रया । ताः सर्वा देवता नित्यं, भवंतु शिवदास्तव ॥२॥
ऋषयः सर्वशास्त्राणि, गायत्री च प्रजापतिः । श्रुतिस्मृति पुराणोक्त, सर्वारिष्टं हरंतु ते ॥३॥
मुहुर्त देवतालग्न, जन्मनक्षत्रदेवताः । पंचागदेवताः सर्वाः शांतिं कुर्वंतु ताःसदा ॥४॥
देवस्यत्वासवितुः प्रसवे । अश्विनोर्बाहुभ्यां । पुष्णोहस्ताभ्यां अश्विनौर्भैषज्येन । तेजसेब्रह्मवर्चसायाभिषिंचामि ॥
ॐ देवस्यत्वासवितुः प्रसवे । अश्विनोर्बाहुभ्यां । पूष्णोहस्ताभ्यां । सरस्वत्यैभैषज्येन । वीर्यायान्नाद्यायाभिषिंचामि ॥
ॐ देवस्यत्वासवितुः प्रसवे । अश्विनोर्बाहुभ्यां । पूष्णोहस्ताभ्यां । इंद्रस्येंद्रियेण । श्रियैयशसेबलायाभिषिंचामि ।
ॐ देवस्यत्वासवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यांपूष्णोहस्ताभ्या सरस्वत्यैवाचोयंतुर्यंत्रेणाग्नेस्त्वासाम्राज्येनाभिषिंचामींद्रस्यबृहस्पतेस्त्वासाम्राज्येनाभिषिंचामि ।
ॐ देवस्यत्वासवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यांपूष्णो हस्ताभ्या मग्नेस्तेजसा सूर्यस्यवर्चसेंद्रस्येंद्रियेणाभिषिंचामि ।
बलायश्रियै यशसेन्नाद्याय । ॐ भूर्भुवः सुवः अमृताभिषेकोऽस्तु । शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ॥
अभिषेका नंतर यजमानासह सर्व उपस्थित असणार्यांनी स्वतःच्या डोळयांना ( अभिषेकाच्या ताम्हनात असलेले ) पाणी लावून घ्यावे तसेच घरात सर्वत्र शिंपडावे. ( यानंतर सर्वांनी हात जोडून पूजा केलेल्या वास्तुदेवतेची प्रार्थना करावी. )
प्रार्थना मंत्र -
गुरुजींनी म्हणावेत ॐ नमो भगवते.
वास्तुपुरुषाय, महाबलपराक्रमाय, सर्वाधिवासशरीराय, ब्रह्मपुत्राय, सकलब्रह्मांडधारिणे, भूभारार्पितमस्तकाय, पुर, पुत्तन, प्रासादगृहवापी, सरः कूपादेः - संनिवेशसांन्निध्यकराय, सर्वसिद्धिप्रदाय, प्रसन्नवदनाय, विश्वंभराय, परमपुरुषाय, शक्रवरदाय वास्तोष्पते नमस्ते, नमस्ते ।
खालील २ श्लोक यजमानांनी म्हणावेत.
पूजितोऽसि मया वास्तो, होमाद्यैरर्चनैः शुभैः । प्रसीद पाहि विश्वेश, देहिमे गृहजं सुखम् ॥१॥
वास्तुपरुष नमस्तेऽस्तु, भूशय्याभिरत प्रभो । मदगृहं धनधान्यादि, समृद्धं कुरु सर्वदा ॥२॥
यथा मेरुगिरेः शृंगे देवानामालयः सदा । शिख्यादिदेवतासाकं अत्रभूमौस्थिरोभव ॥३॥
वास्तोष्पातिं महादेवं, सर्वसिद्धि विधायकम् । शांतिकर्तारमीशानं, तं वास्तुं प्रणतोऽस्म्यहम् ॥४॥
प्रार्थयामीत्यहं देव शालायाः अधिपस्तु यः । प्रायश्चित्त प्रसंगेन, गृहार्थे यन्मया कृतम् ॥५॥
मूलच्छेदं तृणच्छेदं, कृमिकीटनिपातनम् । हननं जलबीजानां, भूमौशस्त्रेणघातनम् ॥६॥
अनृतं भाषितं यच्च, किंचित् वृक्षस्य पातनम् । एतत् सर्वं क्षमस्वत्वं, यन्मयादुष्कृतं कृतम् ॥७॥
गृहार्थे यत्कृतं पापं, अज्ञानेनापिचेतसा । तत्सर्वं क्षम्यतां देव, गृहशालां शुभांकुरु ॥८॥
नमस्ते वास्तु पुरुष, सर्वविघ्न हरो भव । शांतिं कुरु, सुखं देहि, सर्वान् कामान्, प्रयच्छमे ॥९॥
सपरिवार वास्तुपुरुष देवताभ्यो नमः । प्रार्थनां समर्पयामि । नमस्करोमि ।
प्रार्थना झाल्यावर डबीत गंधाक्षतफूल ठेवून वास्तु प्रतिमा व ( पंचरत्नपुडी ) डबीत ठेवावी ती डबी ताम्हनात ठेवावी, यजमान पत्नीने वर्द्धीनी कलश घ्यावा. अन्यसुवासिनीने दीप ( नीरांजन घ्यावे ) ताम्हनात घ्यावा. ( सर्वात पुढे दीप मागे वर्द्धिनी कलश, त्याच्या मागे वास्तुप्रतिमा ( ताम्हन ) घेऊन यजमान, अशा सर्वांनी सोयीनुसार, संपूर्ण घराला प्रदक्षिणा घालावी. किंवा प्रत्येक खोलीत प्रदक्षिण क्रमाने फिरत, फिरत वास्तु प्रतिमा ठेवण्याच्या ठिकाणी यावे. प्रदक्षिणा घालताना, गुरुजींनी राक्षोघ्नसूक्त म्हणावे. घंटानाद करावा. सर्व घरात प्रदक्षिणा क्रमाने फिरत फिरत जेथे वास्तुप्रतिमा ठेवायची आहे तेथे ( आग्नेय दिशेस ) यावे. कर्त्याने आपल्या हातातील वस्तु खाली ठेवाव्यात.
जेथे वास्तु निक्षेप करायचा तेथे ( खडडयात ) धरा = पृथिवी तिचे पूजन करावे -
ॐ स्योना पृथिवीभवानृक्षरा निवेशनी । यच्छानः शर्म सप्रथाः । ॐ भूर्भुवः सुवः धरायै नमः
हा मंत्र म्हणून पृथ्वीला गंध, अक्षता, फूल. हळद कुंकू, धूप, दीप, नैवेद्य विडा दक्षिणा देऊन पूजा करावी. नमस्कार करावा व प्रार्थना करावी.
॥ सर्वदेवमयंवास्तु, वास्तु देवमयं परम् ॥
त्यानंतर - पद्धत असेल तर धरादेवीची ( पृथ्वीमातेची ) सौभाग्य बायनासह ओटी भरावी.
" स्योना पृथिवि भवा....हा मंत्र म्हणून " पृथिव्यै नमः "
असे म्हणून आग्नेय कोपर्यात खणलेल्या खडयात, पंचगव्य, दूध, व वर्द्धिनीकलशातील अर्धे पाणी ओतावे. डबीत वास्तु प्रतिमा ठेवून गंध, फूल, हळद कुंकू वाहून नमस्कार करुन " शिवं वास्तु " असे म्हणून डबी बंद करावी. वास्तु देवतेचे मस्तक ईशान्येकडे येईल अशा पद्धतीने, ती डबी खडयामध्ये पालथी ठेवावी पुनः गंध अक्षता फूल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर खडयात माती व वर्द्धिनी कलशातील पाणी ओतावे. सिमेंट लावावे फरशी बसवावी. " शिवम् वास्तु " असे ३ वेळा म्हणावे.
त्यानंतर स्थापना केली त्या भिंतीच्या पायथ्याशी " शिवम् वास्तु " असे लाल गंधाने लिहावे, व स्वस्तिक काढावे -
यजमानाने सपत्नीक अग्निकुंडाजवळ येऊन बसावे नंतर उदक सोडावे.
अनेन मयाकृतेन देशकालाद्यनुसारतः आचार्यादिव्दारा, संकल्पित सग्रहमख वास्तुशांतिकर्मणः सांगता सिद्धयर्थं, आचार्याय द्रव्यद्रारा गोप्रदानं, देय वस्तुसहितं, अदेयवस्तु रहितं, पीठद्वयदानं करिष्ये । तथाच आचार्य सहितनानानामगोत्रेभ्यो ब्राह्मणेभ्यः ( वस्त्रसहित ) ( फलसहित ) ( मार्गव्ययसहित ) तांबूलसहित, यथाशक्ति, व्यावहारिक - द्रव्य द्वारा, दक्षिणाप्रदानं करिष्ये । तेभ्यः ( गंधादिभिः ) अक्षतैः पूजयिष्ये । तथाच यथोपपन्नेन अन्नेन अद्यैव भोजयिष्ये ।
आचार्यादि सर्व गुरुजींना गंध अक्षता लावून, संकल्पानुसार दक्षिणा देऊन झाल्यावर, गुरुजींना व उपस्थित मोठयांना नमस्कार करावा.
गंधाः पांतु, अक्षताः पांतु. उमोऽस्त्वनंताय....
युगधारिणे नमः ।
एका ताटात घरातील देवांपुढे ठेवलेला विडा, नारळ, तसेच स्थापित देवतांसमोर, असलेल्या फळांपैकी कांही फळे, पेढे, अक्षता घ्याव्या, सर्वगुरुजींनी आशीर्वाद मंत्र म्हणावेत.
ग्रहांचे प्रतिनधिक मंत्र, तेजोसि, तत्ते प्रायच्छामि । शतायुधाय । वास्तु मंत्र । आयुर्यज्ञेन कल्पतां ० । आरोग्यं सविता ।
हे व याशिवाय अधिक मंत्र म्हणावेत, शेवटी खालील मंत्र म्हणावा.
स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु गो, वाजि, हस्ति, धन, धान्य, समृद्धिरस्तु । ऐश्वर्यमस्तु बलमस्तु रिपुक्षयोऽस्तु । वंशे सदैव भवतां हरिभक्तिस्तु ॥१॥
सर्व म्हणून झाल्यावर आचार्यांनी फळांसहित ताट व मंत्राक्षता यजमानांना द्याव्यात. ते ताट यजमानाने स्वमस्तकी लावून पत्नीला द्यावे. ताट खाली ठेवून दोघांनी सर्व गुरुजींना नमस्कार करावा. व प्रार्थना करावी.
भो आचार्यसहित ब्राह्मणाः अद्य मया भवतां साहाय्येन, यथा प्राप्तद्रव्यैः देवतानां आवाहन, पूजन, हवन सहित संकल्पित सग्रह, वास्तुशांति मध्ये ज्ञाताज्ञात कर्मणि, मंत्र, तंत्र, द्रव्य, श्रद्धा भक्तिषु यक्तिंचिदपि न्यूनं, तत् सर्वं आवाहित देवतानां, कृपाप्रसादात् ब्राह्मणवचनातच सर्वं परिपूर्ण मस्तु इति भवंतः ब्रुवंतु । ब्राह्मणाः - सर्वं परिपूर्णमस्तु ।
यजमानाने उदक सोडावेः -
अनेनमया कृतेन आचार्यादि ब्राह्मणद्वारा संकल्पित सग्रहमरववास्तुशांति कर्मणा, तत् तत् देवताः प्रीयंता न मम । आचार्यांनी उदक सोडावे. मया कृतेन यजमानानुज्ञया एभिः ब्राह्मणैः सह संकल्पित, सग्रहमख वास्तुशांति कर्मणा, आवाहित देवताः तथा अग्निनारायण प्रीयताम् । न मम, तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु । त्यानंतर अक्षता वाहून स्थापित देवता, व अग्निदेवतेचे विसर्जन करावे. देवता विसर्जनमंत्र देवतांसाठीयांतुदेवगणाः - गच्छगच्छसुरश्रेष्ठ...अग्नि विसर्जनमंत्र यजमान व आचार्यांनी दोन वेळा आचमन करुन ३ वेळा विष्णुचे स्मरण करावे, व नमस्कार करावा. दर्भपवित्रके विसर्जन करावीत. स्वैपाक झाल्यावर घरच्या देवांना, व वास्तुदेवता जेथे ठेवली तेथे नैवेद्य दाखवावा.
गुरुजींनी सूचना द्यावी -
उपस्थितांनी सपत्नीक यजमानांना आहेर करावा.
इति श्री गणपतिपूजनादारभ्य नांदीश्राद्धसहित सग्रहमख वास्तुशांति प्रयोगः समाप्तः ॥