वास्तुशांतीसाठी लागणारे साहित्य : -
हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, उदबत्ती, नीरांजन ( तूप वातीसह ) समई ( तेल वातीसह ) ओवाळण्यासाठी दिवा, काडयापेटी, पाट, आसन, शाल, रुमाल, ताटे ४, तांबे ५ ( चांदीचे, तांब्याचे ), ताम्हने ४, वाटया १५, पळया, फुलपात्रे ५, चमचे, चौरंग, पंचामृत, ( दूध, दही, तूप, मध, साखर ) गोमूत्र, गोमय. कापूर, शेंदूर, अष्टगंध, चंदन पावडर, सुपार्या २०० नग, खोबर्याच्या वाटया, गूळ, खारीक, बदाम, आक्रोड, हळकुंड, विडयाची पाने, नारळ, जानवी, पेढे, पंचखाद्य. गहू, तांदूळ, पांढरे तीळ ( हवनासाठी ) तूप. बेलफळसमिधा. दर्भ उडीद. दूध, साखर, ३ वाटया तांदूळाचा भात, ब्ला. पीस, धोतर उपरणे. साडी ( सौभाग्यवायन ) सुटे पैसे, गुरुजींची दक्षिणा, ब्रा. दक्षिणा. देवापुढे दक्षिणा. विविध फळे ५ प्रकारची प्रत्येकी २, केळी १२.
पत्रावळी / केळीची पाने, द्रोण, लोखंडी खिळे ४ नवग्रह प्रतिमा, वास्तुप्रतिमा, सोन्याची तार, पंचरत्न, विविध फुले, तुळशी बेल, दूर्वा हार, तोरण, होमासाठी होमकुंड ( १८ x १८ इंच ) रेती १/२ घमेले. शेण्या/४ गोवर्या, इंधन ( ८ इंच लांबीचे ), होमकुंड नसल्यास विटा ४, घमेले १, त्यात रेती अर्धा घमेले.
॥ श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥
याज्ञिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनो!
यापूर्वी वेदोक्त, पुराणोक्त वास्तुशांतीची पुस्तके छापली होती. " जय हिंद " प्रकाशकांनी विनंती केल्यावरुन वेदोक्त वास्तुशांतीचा प्रयोग पुनश्च लिहिला. यामध्ये पंचगव्य मेलन, यज्ञोपवीत अभिमंत्रण यांचा समावेश केला आहे. तसेच गणपति पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध यांचा समावेश असून, अग्निमुखाचा अंतर्भाव यात आहे. म्हणून वास्तुशांतीसाठी हे पुस्तक परिपूर्ण आहे, तसेच म्हणावे लागेल. काही सूचना वारंवार आल्या आहेत, त्या जाणीवपूर्वक आहेत. हे पुस्तक शिक्षण घेणार्यांना उद्देशून लिहिले आहे.
इमारत बांधण्यापूर्वी भूमिपूजन केले आहे / नाही हे काहीवेळा माहीत नसते त्यामुळे अघोर होम घेतला आहे.
गृहप्रवेश वास्तुशांत्यंग असल्याने पुनःगृहप्रवेश वेगळा दिला नाही. इच्छा असल्यास वास्तुसह घरात प्रदक्षिण फिरण्यापूर्वी वास्तुसह गृहप्रवेश करावा.
वास्तुपीठाजवळील वरुणाला " वर्द्धिनी कलश " म्हणतात. म्हणून या प्रयोगात त्या वर्द्धिनी कलशाची पूजा घेतली आहे.
वास्तुशांतीसाठी लागणारे साहित्य ( यादी ) या पुस्तकात दिली आहे वस्तूंचे प्रमाण, यजमानाच्या इच्छाशक्ती प्रमाणे ठरवावे.
धरापूजन वास्तुमध्ये करावे हे उचित असले तरी जेथे वास्तुप्रतिमा ठेवायची तेथेच धरापूजन करणे, अधिक उचित होईल म्हणून धरापूजन तेथे घेतले आहे. पृथ्वीतत्वाची पूजा महत्त्वाची आहे. हे सूज्ञ जाणतील.
पुस्तकात उणीवा असतील तर सुचविणार्यांचा आदर करुन पुढील आवृत्तीत उणीवा दूर करता येतील. ज्या ज्या व्यक्तींचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साहाय्य झाले त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत.
श्रीगणेशाय नमः ।