वास्तुशांती - संकल्प

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.

While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu doshas.


आता पुढीलप्रमाणे देशकालादिकांचा उच्चार करावा.

देशकालोच्चारण -
श्रीमदभगवतो, महापुरुषस्य, विष्णोराज्ञया, प्रवर्तमानस्य, अद्य ब्रह्मणो, द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वतमन्वन्तरे, कलियुगे, प्रथमचरणे, भरतवर्षे, भरतखण्डे, जम्बुद्वीपे, दण्डकारण्ये देशे, गोदावर्याः, दक्षिणे तीरे, शालिवाहनशके, अमुकनामसंवत्सरे, अमुक अयने, अमुकऋतौ, अमुकमासे, अमुकपक्षे, अमुकतिथौ, अमुकवासरे, अमुकनक्षत्रे, अमुकस्थिते वर्तमान चन्द्रे, अमुकस्थिते श्रीसूर्ये, अमुकस्थिते देवगुरौ, शेषेषु ग्रहेषु, शुभपुण्यतिथौ

( १ पंचांगाप्रमाणे अयनादिकांचा उच्चार गुरुजींनी करावा. )

एवढे म्हणून झाल्यावर डाव्या हाताने अक्षता असलेल्या उजव्या हातात पळीने पाणी घ्यावे आणि पुढील संकल्प म्हणावा. संकल्प पूर्ण झाल्यावर हातातील पाणी अक्षतांसह ताम्हनात सोडावे.

कर्त्याने - अमुक गोत्रोत्पन्नः अमुक शर्मा अहं ( स्वतःच्या गोत्राचा व स्वतःच्या नावाचा उच्चार करावा. )

संकल्प - मम आत्मनः, श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं, श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं, अस्माकं, सकलकुटुंबानां, क्षेम, स्थैर्य, आयुः -, आरोग्यादि, अभिवृद्धयर्थं, समस्तानां, अभ्युदयार्थं, ( द्विपद, चतुष्पद, सहितानां ) शांत्यर्थं, पुष्टयर्थं, तुष्टयर्थं, सकलानां गृह्यकर्म आचराणसमये, निर्विघ्नता प्राप्तिपूर्वक, धनधान्यादि, अभिवृद्धयर्थं, कायिक, वाचिक, मानासिक, पीडापरिहारार्थं, तथाच, भवन निर्माणकाले, सूचित, संभाव्य, सकल अरिष्टानां, परिहारपूर्वक, गुल्मलतादि छेदन, कृमि, कीटक, जलचर - प्राणिघातादि, दोष परिहारार्थं, भूत, प्रेत, पिशाच यक्ष, राक्षसादि, जनित, विविधविघ्न, निवारणार्थं, अमेध्य ( घाणेरडे ) कर्मवशात्, जातदोष परिहारार्थं, तथाच, अस्मिन् क्षेत्रमध्ये, चोर, पाखंड, पतित, म्लेंच्छ, शूद्रादीनां, प्रवेशेन, सूचित, विविध दोषाणां, निरसनपूर्वक, तथाच तेषां, मूत्रपुरीषादि, अश्रुपात, जातदोषाणां, निरसनार्थं, तथाच क्षुद्रजनानां दृष्टिदोषबाधा निवारणार्थं, अस्मिन् वास्तौ मम सपरिवारस्य चिरकाल सुखनिवास सिद्धिपूर्वकं, सर्वसंकट, नानाविध, रोग, क्लेश, स्वजनवियोग, धनक्षयादि दुःखानां निरसनार्थं, सर्वविधसंपदः, प्राप्तिपूर्वक, पुत्रपौत्रादि धनधान्यसमृद्धिपूर्वक, अस्य वास्तोः शुभता प्राप्त्यर्थं, श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं, देशकालादि अनुसारतः, यथा संभवद्रव्यैः, यथाशक्ति, कल्पोक्त विधिना, ब्राह्मणदवारा अद्य गृहप्रवेशांगभूतां, सग्रहमखां, वास्तुशांतिं करिष्ये ।

( पुनः हातात पाणी घ्यावे. )

निर्विघ्नार्थं महागणपतिपूजनं, मंगलार्थं स्वस्तिपुण्याहवाचनं, हिंसानिवारणार्थं, मातृकापूजनं, कर्मसमृद्धयर्थं, नांदीश्राद्धं, याग निष्पत्त्यर्थं आचार्यादि वरणं च करिष्ये ।

( हातात पाणी ताम्हनात समोर सोडावे )

ततः यजमानद्वारानांदीश्राद्धांतंकर्मसमापयेत् ।

निर्विघ्नार्थं गणपतिपूजन
तांदुळाच्या राशीवर गणपति - पूजनासाठी पद्धतीनुसार सुपारी किंवा नारळ ठेवावा. नारळाची शेंडी पूजा करणार्‍याकडे असावी. त्यावर गणपतीचे आवाहन करावे. हातात अक्षता घ्याव्यात.

ॐ गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं ।

ॐ भूर्भुवःसुवः । अस्मिन् पूगीफले ( नारिकेलफले ) महा गणपतिं सांगं, सपरिवारं, सायुधं, सशक्तिकं, आवाहयामि ।

( प्रत्येक वेळी देवतेच्या नावापूर्वी ॐ भूर्भुव: सुव: असे म्हणावे. )

अक्षता घेऊन देवाचे ध्यान ( स्मरण ) करुन अक्षता वाहाव्यात.

महागणपतये नमः । ( ध्यायेत् ) ध्यनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

आसनासाठी देवाला अक्षता वाहाव्यात.

महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन, ते पाणी फुलाने किंवा दूर्वेने देवावर ( गणपतीवर ) शिंपडावे.

महागणपतये नमः ।  पादयोः पाद्यं समर्पयामि ।

अर्घ्यपात्रातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते अर्घ्य फुलाने देवावर शिंपडावे.

महागणपतये नमः ।  हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ।

पुनः साधे पाणी देवावर शिंपडावे.

महागणपतये नमः ।  आचमनीयं समर्पयामि ।

स्नानासाठी देवावर पुनः पाणी शिंपडावे.

महागणपतये नमः ।  स्नानं समर्पयामि ।

देवाला कापासाची २ वस्त्रे वाहावीत. नसल्यास अक्षता वाहाव्यात.

महागणपतये नमः ।
वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं, अक्षतान् वा समर्पयामि ।

देवाला जानवे वाहावे. नसल्यास अक्षता वाहाव्यात.

महागणपतये नमः ।
उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं, अक्षतान् वा समर्पयामि ।

देवाला करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.

महागणपतये नमः ।  विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।

देवाला अलंकारासाठी अक्षता वाहाव्यात.

महागणपतये नमः ।  अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।

देवाच्या अंगभूत असणार्‍या ऋद्धिसिद्धींना अगोदर हळद व नंतर कुंकू वाहावे.

ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां - कुडकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।

देवाला शेंदूर, अष्टगंध, इत्यादी वाहावे.

महागणपतये नमः ।  परिमलद्रव्यं समर्पयामि ।

दूर्वांची जुडी सोडून गंध - अक्षता - हळद - कुंकू यांच्यासह आपल्याकडे दूर्वाग्र करुन वाहावी.

महागणपतये नमः ।  दूर्वांकुरान् समर्पयामि ।

देवाला लाल फूल वाहावे. ( फुलाचे डेख देवाकडे करावे. )

महागणपतये नमः । पूजार्थे कालोद्भव - पुष्पं समर्पयामि ।

उजव्या हाताने अगोदर उदबत्ती व नंतर नीराजन ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी.

महागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।

देवाच्या समोर पाण्याने चौकोन करुन त्यावर गूळ, खोबरे, पेढे ठेवावे. उजव्या हातात पाणी घेऊन ते नैवेद्याभोवती एकदा फिरवावे व हात जोडावेत.

सत्यंत्वर्तेन परिषिंचामि । अमृतोपस्तरणमसि । ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।

नैवेद्याभोवती पुनः एकदा पाणी फिरवून हात जोडावेत.

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।

उजव्या हातावरुन चार वेळा ताम्हनात पाणी सोडावे. नंतर देवाला गंध फूल वाहावे.

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालन समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । आचमनीयं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।

सोइस्कर जागी विडा, दक्षिणा, खारीक, बदाम व उपलब्ध असलेले फळ व दक्षिणा ठेवून त्यांवर डाव्या हातातील पळीने उजव्या हातावरुन पाणी सोडावे.

महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल - तांबूलं, खर्जुरी फलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित - कालोद्भव - फलं समर्पयामि । तथा अ सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि ।

देवाला गंध - फूल वाहून नमस्कार करावा.

महागणपतये नमः । मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि । नमस्करोमि ।

हातात अक्षता घेऊन प्रार्थना करुन झाल्यावर हातातील अक्षता देवाला वाहाव्यात.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।
महागणपतये नमः । प्रार्थनां समर्पयामि ।

उजव्या हातावरुन ताम्हनात पाणी सोडावे.

अनेन कृतपूजनेन महागणपतिः प्रीयताम् ।

यानंतर कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP