क्षेत्रपाल बलिदान
हे बलिदान यजमानाने स्वतः करावयाचे असते. आपल्या ऐपतीप्रमाणे जास्तीत जास्त सव्वा किलोचा भात करुन त्याची मूदकरावी. ती मूद राहील एवढी जुनी टोपली घेऊन त्यात तळाला पत्रावळ, किंवा पाने ठेवून त्यावर मूद ठेवावी. त्यावर दही, उडीद, व गुलाल टाकावा. मुदीच्या मधोमध दीप ठेवावा ( समिधेलाकाळी चिंधी गुंडाळून, चिंधी गुंडाळलेला भाग वर राहील अशा रीतीने ती समिधा भाताच्या मुदीत खोचावी हाच दीप होय. किंवा पिठाचा दिवा करुन त्यात काळया चिंधीची वात ठेवावी ते न जमले तर सोईप्रमाणे दीप वापरावा. ) कापूर लावावा. ह्या टोपलीतच जागा असेल तेथे सोईप्रमाणे एक सुपारी ठेवावी. ( नंतर याच सुपारीवर क्षेत्रपाल देवतेचे आवाहन पूजन करावयाचे आहे. ) पूजेसाठी साहित्य जवळ घेऊन घराच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख यजमानाने सपत्नीक बसावे. ( क्षेत्रपालासाठी विडा, जानवे, नारळ, काळे, कापड दक्षिणा, व फळ घ्यावे. )
संकल्प व पूजन
यजमानाने आचमन प्राणायाम करावा.
हाती अक्षता घेऊन संकल्प करावा.
अद्यपूर्वोच्चरित ०..... मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्तर्थं सर्वारिष्ट शांत्यार्थं, इतिभय, मारीभय, कृत्याभय दिव्यभौम, अंतरिक्ष त्रिविध उत्पातशमनार्थं सपरिवार क्षेत्रपाल देवताप्रीत्यर्थं सार्वभौतिक बलिप्रदानं, आदौ क्षेत्रपाल पूजनंच करिष्ये । टोपलीतील दीप लावावा.
ॐ क्षेत्रस्यपतिना ०...ती दृशे ।
ॐ भूर्भुवः सुवः । अस्मिन् पूगीफले, क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालं सारां सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि ।
त्यानंतर बलिच्या सभोवती पूर्वादि दिशांच्या क्रमाने आठ दिशांना अक्षता वाहून क्षेत्रपालाच्या परिवार देवतांचे आवाहन करावे.
ॐ चरक्यै नमः । चरकीं आवाहयामि
ॐ विदार्यै नमः । विदारीं आवाहयामि ॥
ॐ पूतनायै नमः । पूतनां आवाहयामि ॥
ॐ पापराक्षस्यै नमः । पापरक्षसीं आवाहयामि ॥
ॐ भूतजृंभाय नमः । भूतजृंभं आवाहयामि ॥
ॐ विरुपाक्षाय नमः । विरुपाक्षं आवाहयामि ॥
ॐ धूम्रजिह्वाय नमः । धूम्रजिह्वम् आवाहयामि ॥
ॐ महोरगाय नमः । महोरगं आवाहयामि ॥
सर्वाः देवताः सुप्रतिष्ठिताः संतु । सर्व देवतांचे गंधादिउपचारांनी पूजन करावे. नैवेद्याचे वेळी भाताच्या मुदीभोवती पाणी फिरवून त्याचा नैवेद्य अर्पण करावा क्षेत्र पालादि आवाहित देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे दूध्योदन ( दंही + भात ) नैवेद्यं समर्प ० पूगीफल तांबूल, दक्षिणा फलंच समर्प ०
क्षेत्रस्य पतिना ० इति मंत्रेण प्रार्थना.
ॐ भूर्भुवः सुवः । क्षेत्रपालाद्यावाहितदेवताभ्यः सांगाभ्यः सपरिवाराभ्यः सायुधाभ्यः सशक्तिकाब्य; भूत प्रेत, पिशाच ब्रह्मराक्षस, शाकिनी, डाकिनी, वेतलादि परिवारयुताभ्यः अमुं सदीपमाषभक्तबलिं, समर्पयानि ।
भो, भो, क्षेत्रपालाद्यावहितदेवताः, अमुं, बलिं, गृहणीत, मम सहकुटुंबस्य, सपरिवारस्य, आयुः कर्त्र्यः, क्षेमकर्त्र्यः, शांतिकर्त्र्यः, पुष्टिकर्त्र्यः, तुष्टिकर्त्र्यः, कल्याणकर्त्र्यः, वरदाः भवत । उदक सोडावे अनेन बलिदानेन क्षेत्रपालादि आवाहितदेवताः प्रीयंतां न मम । हात जोडून प्रार्थना करावी.
बलिदानांग आवाहित देवतांची प्रार्थना -
बलिंगृह्णंत्विमेदेवा, आदित्यासवस्तथा । मरुतश्चाश्विनौरुद्राः सुपर्णाः पन्नगागृहाः ॥
असुरायातुधानाश्च, पिशाचोरगराक्षसाः । शाकिन्योयक्षवेताला, योगिन्यः पूतनाः शिवाः ॥
जृंभकाः सिद्धगंधर्वा, नागविद्याधरास्तथा । दिकपाला लोकपालाश्च, येच विघ्नविनायकाः ॥
जगतांशांतिकर्तारो, ब्रह्माद्याश्चमहर्षयः । माविघ्नं, माच, मे पापं, मा सुंतु परिपंथिनः ॥
सौम्याभवंतुतृप्ताश्च, देवाभूतगणास्तथा । चरकीच विदारी, चपूतना पापराक्षसी ॥
भूतजृंभो विरुपाक्षो, धूम्रजिह्वोमहोरगः । एते रक्षंतु भवनं, नगरं ग्राममेवच ॥
येकेच, इह यज्ञेस्मिन्, आगता बलिकांक्षिणः । तेभ्यो बलिंप्रयच्छामि, नमस्कृत्वा पुनः पुनः ॥
भूतानियानीह वसंतितानि, बलिंगृहीत्वाविधिवत् प्रयुक्तं । अन्यत्रवासंपरिकल्पयंतु, क्षमंतु तान्यत्र नमोऽस्तु तेभ्यः ।
क्षेत्रपालाची पूजा केलेल्या सुपारी वर मोहरी वाहून विर्सजन करावे. तसेच आठदिशांना मोहरी वाहून क्षेत्रपाल परिवार देवतांचे विसर्जन करावे.
ॐ अद्योरेभ्योथघोरेभ्योघोर घोरतरेभ्यः ।
सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तुरुद्ररुपेभ्यः ।
बलिची टोपली किंचीत पुढे सरकवावी.
गडयाला बोलावून त्याला यजमानाने गंध लावावे, क्षेत्रपालासाठी ठेवलेला विडा, नारळ, कापड, त्याला द्यावे. ( ह्या वस्तु त्याने नंतर घेऊन जाव्या. ) गडयाने ती टोपली आपल्या दोन्ही हातांनी धरुन, सपत्नीक यजमानाभोवती ३ वेळा ओवाळून ) मागे न पाहता घराच्या / सोसायटीच्या बाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला ठेवावी. नंतर यजमानाने मोहरी टाकत पत्नीने पाणी टाकत घराच्या बाहेर जाऊन स्वतःचे हातपाय धुऊन घरात यावे. बलिबाहेर घेऊन गेल्यावर ब्राह्मणांनी शांतिमंत्र म्हणावेत.
ॐ शांतापृथिवी शिवमंतरिक्षंद्यौर्नो देव्यभयंनोअस्तु । शिवादिशः प्रदिश उद्दिशोन आपोविद्युतः परिपांतुसर्वतः शांतिः शांतिः शांतिः । ( ऋ )
ॐ पृथिवी शांतासाग्निनाशांता सामेशांताशुच शमयतु ।
अंतरिक्ष शांतंतदवायुनाशांतं, तन्मेशांत शुच शमयतु ॥
द्यौः शांता, सादित्येनशांता, सामेशांता, शुच शमयतु ।
पृथिवीशांति, रंतरिक्ष शांति, द्यौः शांतिर्दिशः शांति, रवांतरदिशाः शांति, रग्निः शांतिर्वांयुः शांतिरादित्यः शांतिश्चद्रमाः शांतिर्नक्षत्राणिशांतिरापः शांति, रोषधयः शांतिर्वनस्पतयः शांतिर्गौः शांति रजाशांतिरश्चः शांतिः पुरुषः शांतिब्रह्मशांति र्ब्राह्मणः शांतिः, शांतिरेवशांतिः, शांतिर्मे अस्तु शांतिः ॥
तयाह शांत्या, सर्वशांत्या, मह्यंद्विपदेचतुष्पदेच शांतिकरोमि शांतिर्मे अस्तुशांतिः । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥ ( हि.)
सर्वारिष्टशांतिरस्तु ।