पूर्णाहुति
कार्य समाप्ती पर्यंत यजनान ( सपत्नीक ) येथेच असणे आवश्यक आहे.
आचार्यांनी स्थंडिलाजवळ बसावे. त्यांच्या उजव्याहाताकडे यजमानांनी सपत्नीक बसावे. पूर्णाहुतिसाठी यजमानाने संकल्प करावा.
यजमानः उदकेन स्वनेत्रस्पर्शः आचम्य देशकालौसंकीर्त्य मया कृतेन आचार्यादि ब्राह्मणद्वारा सग्रहमख वास्तुशांत्यंगभूतं सर्वकर्मप्रपूरणीं भद्रद्रव्यदां, द्वादश गृहीतेनाज्येन पूर्णाहुतिंहोष्ये ।
पूर्णाहुतीच्या निमित्ताने आवाहित अग्नीचे ठिकाणी " इड " नावाच्या अग्नीचे आवाहन करावे ( कल्पना करावी ) अग्निं इड नामानं भावयामि ।
( आकृती पाहा अक्षता वाहून आवाहन करुन अग्नीचे ध्यान करावे -
ॐ चत्वारिशृंगात् ०...ममसंमुखो वरदोभव ।
नंतर दर्वीने १२ वेळा तूप स्वतंत्र पात्रात घ्यावे. ( हे पात्र असे असावे की, ज्याने अग्नीमध्येतुपाची धार पडू शकेल. )
यजमानांनी पूर्णाहुतीसाठी खालील वस्तु ताम्हनात घेऊन ते ताम्हन दोन्ही हातांनी धरुन उभे रहावे. ( पूर्णाहुतीसाठी - विडा ( दोन पाने ) सुपारी, खारीक, बदाम, केळे, ( नारळ ) गंध अक्षता. फूल, हळद, कुंकू अन्य उपलब्धवस्तु, इच्छेनुसार घ्याव्यात. )
आचार्यांच्या उजव्या हाताजवळ यजमान, व त्याच्या उजव्या हाताजवळ यजमानपत्नीने उभे राहून पत्नीनें यजमानाला हस्तस्पर्श करावा.
पूर्णाहुति मंत्र
ॐ सप्ततेअग्नेसमिधः सप्तजिह्वाः सप्तर्षयः सप्तधामप्रियाणि । सप्तहोत्राः सप्तधात्वायजंतिसप्तयोनीरापृणस्वाघृतेन स्वाहा । सप्तवते, अग्नय इदं न मम ।
( ताम्हनातील सर्व वस्तु अग्नीला अर्पण कराव्या )
ताम्हनातील सर्व वस्तु अग्नीला अर्पण करीत म्हणावे
पूर्णाहुतिमुत्तमांजुहोति । सर्वं वैपूर्णाहुतिः । सर्वमेवाप्नोति । अथो इयं वै पूर्णाहुतिः । अस्यामेव प्रतितिष्ठति । पूर्णाहुतिमुत्तमांजुहोति
प्रत्त्युत्तब्ध्यै सयत्वाय ।
तुपाची धार धरावी. त्यावेळी रुद्रातील चमकाचा ३ रा अनुवाक म्हणावा - पूर्णाहुति झाल्यावर उदक सोडावे.
सांगतासिद्ध्यर्थं सर्वप्रायश्चित्तं करिष्ये ।
ॐ भूर्भुवः सुवः स्वाहा । प्रजापतय इदं न मम । ॐ वसुभ्योरुद्रेभ्य आदित्येभ्यः स्वाहा ।
वसुभ्योरुद्रेभ्य आदित्येभ्यःस स्त्रावभागभ्य इदं न मम ।
अन्य ऋत्विजांनी ग्रहदेवता ( वास्तुमंडलातील देवतांचे ) गंधादि उपचारांनी पंचोपचार पूजन करावे.
संकल्प
अद्यपूर्वोच्चरित ०....स्थापितदेवतानांपंचोपचारैः उत्तर पूजनं करिष्ये ।
आचार्यांनी बर्हीवर ठेवलेले आज्यपात्र आपल्या डाव्या बाजूला सरकवून ठेवावे. नंतर आज्यपात्राच्या जागेवर अग्नीच्या उत्तर दिशेकडे ठेवलेले प्रोक्षणीपत्र दर्भासह आणून ठेवावे. त्या दर्भांनी पात्रातील पाणी सर्व दिशांना शिंपडावे ( पूर्वादि क्रमाने )
ॐ सदसिसन्मेभूयाः सर्वमासिसर्वंमेभूयाः पूर्णमसिपूर्णंमेभूया अक्षितमसिमामेक्षेष्ठाः ।
पूर्वेकडे पाणी शिंपडावे.
प्राच्यांदिशिदेवाऋत्विजोमर्जयंता ।
दक्षिणेकडे शिंपडावे. नंतर दर्भासह हात धुवावा.
दक्षिणायां दिशिमासाः पितरोमार्जयंतां ( अप उपस्पृश्य )
पश्चिमेकडे शिंपडावे.
प्रतीच्यां दिशिगृहाः पशवोमार्जयंतां ।
उत्तरेकडे शिंपडावे.
उदींच्या दिश्यापओषधयो वनस्पतयोमार्जयंतां ।
आकाशाकडे शिंपडावे.
ऊर्ध्वायां दिशियज्ञः संवत्सरो यज्ञपतिर्माजयंता ।
आपल्या व सपत्नीक यजमानाच्या शरीरावर दर्भाग्रानी प्रोक्षण करावे.
ॐ समुद्रंवः प्रहिणोम्यक्षिताः स्वांयोनिमपिगच्छत ।
अच्छिद्रः प्रजयाभूयासंमापरासेचिमत्पयः ।
यदप्सुतेसरस्वति गोष्वश्वेषुयन्मधु । तेन मे वाजिनीवतिमुखमडधिसरस्वति ।
प्रोक्षणीपात्रातील थोडे पाणी स्थंडिलाजवळ नैऋत्यदिशेकडे ओतून, आपल्या उजव्या हाताच्या अंगठयाचा मूलप्रदेश त्यात भिजवून ते पाणी आचार्यांनी आपल्या खालच्या ओठाला लावावे. मुखंविमुष्टे । नंतर उदक सोडून, स्थंडिला जवळ ब्रह्म्याचे आवाहन केले आहे. तेथे दक्षिणा ठेवून त्यावर उदक सोडून ब्रह्म्याचे अक्षता वाहून विसर्जन करावे.
कृतस्य कर्मणः सांगतासिद्ध्यर्थं ब्रह्मणे पूर्णपात्र प्रतिनिधिभूतां ब्रह्मणे यथाशक्ति दक्षिणाप्रदानं करिष्ये । तेन श्री ब्रह्मादेवता प्रीयतां न मम । अक्षता वाहून विसर्जन करावे.
ब्रह्माणं विसर्जयामि ।
सर्व परिस्तरण गोळा करुन उत्तर दिशेकडे ठेवावीत. परिस्तरणान्युत्तरे विसृजेत् । पूर्वी सांगितल्याप्रमाणे स्थंडिला भोवती पाण्याच्या रेषा माराव्यात ( पाणी फिरवावे. )
ॐ अदितेन्वम स्थाः । ॐ अनुमतेन्वम स्थाः । ॐ सरस्वतेन्वम स्थाः । ॐ देवसवितः प्रासावीः ।
हातजोडून म्हणावे.
ॐ यज्ञनमस्ते यज्ञ । नमोनमश्चतेयज्ञ । शिवेनमे संतिष्ठस्व । स्योनेनमेसंतिष्ठस्व । सुभूतेनमेसंतिष्ठस्व । ब्रह्मवर्चसेनमे संतिष्ठस्व । यज्ञस्यर्धिमनुसंतिष्ठस्व । उपतेयज्ञनमः । उपतेनमः । उपतेनमः । गंधादिउपचारांनी अग्नीची पूजा करावी.
यजमान व पत्नी, तसेच आचार्य यांनी अग्नीची पूजा करावयाची आहे.
ॐ अग्नेयसुपथाराये अस्मान्विश्वानिदेव वयुनानिविदवान् । युयोध्यस्मज्जुहुराणमेनोभूयिष्ठांतेनम उक्तिं विधेम ॥
ॐ भूर्भुवः सुवः । अग्नयेनमः । सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि । धूपदीपौसमर्पयामि । स्वाहायैनमः । स्वधायै नमः । हरिद्रां कुंकुमं समर्प ० ॥
नैवेद्यार्थे घृतशेष नैवेद्यं समर्पयामि ।
( आज्यास्थालीतील तुपाच्या ६ आहुती दर्वीने अग्नीला अर्पण कराव्यात. )
ॐ प्राणायस्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
( उदक सोडावे ).
मध्येपानीयंसमर्पयामि ।
पुनः ६ वेळा तुपाच्या आहुती अर्पण कराव्यात.
ॐ प्राणाय स्वाहा....।
उदक सोडावे
उत्तरापोशनं, हस्त प्रक्षालनं, मुख प्रक्षालनं, आचमनीयं, समर्पयामि । करोदवर्तनार्थे चंदनं, समर्पयामि ।
मुखववासार्थे पूगीफल तांबूलं, नारिकेलफलं समर्पयामि । कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।
यजमान सपत्नीक घरातील कुटुंबीय व आचार्य यांनी स्थंडिलातील भस्म ( अंगारा ) लावून घ्यावा.
त्र्यायुषंजमदग्नेः कश्यपस्यत्र्यायुषं । यद्देवानांत्र्यायुषं तन्मे अस्तुत्र्यायुषं ।
यजमानांनी अग्नीची प्रार्थना करावी.
ॐ स्वस्ति ।
श्रद्धांमेधांयशः, प्रज्ञां, विद्यां, बुद्धिं, श्रियं, बलं । आयुष्यं, तेज, आरोग्यं, देहिमे हव्य वाहन ॥
प्रमादात् कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत् । स्मरणादेवतद्विष्णोः संपूर्णंस्या दितिश्रुतिः ॥
प्रायश्चित्तान्यशेषाणि तपः कर्मात्मकानि वै । यानितेषामशेषाणां कृष्णानुस्मरणं परम् ॥
कांडदवयोपपाद्याय, कर्मब्रह्मस्वरुपिणे । स्वर्गापवर्गदात्रेच, यज्ञेशाय नमो नमः । ॐ भूर्भुवः सुवः अग्नेय नमः प्रार्थनां समर्पयामि ।
यानंतर सपत्नीकयजमान व कुटुंबीय यांचेवर अभिषेक करावयाचा आहे. ग्रहपीठ व वास्तुपीठ यांचेजवळ ठेवलेल्या वरुणातील ( कलशातील ) पाणी ताम्हनात घेऊन गुरुजींनी आभिषेक करावा पत्नीने पतीच्या डाव्याहाताकडे बसावे.
अभिषेकाचे वेळी ब्राह्मणांनी उत्तराभिमुख असावे. खालील मंत्रोच्चारपूर्वक अभिषेक करावा.
१) नवग्रह मंत्र, त्र्यंबकं यजामहे ०, अग्निंदूतं ० गणानांत्वा ० त्रातारमिद्र ० ( प्रतिनिधकमंत्र ) तत्त्वायामि ०
हे मंत्र म्हणून झाल्यावर वास्तुदेवतेचे ४ मंत्र म्हणावेत.