मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला| नामावली श्री गणेश स्तोत्र माला मंगलाचरण गणराज समर्थ नमनाष्टकस्तोत्र न्यास श्रीगणेशसहस्रनाम ध्यान श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक ८१ ते ९० श्लोक ९१ ते १०० श्लोक १०१ ते ११० श्लोक १११ ते १२० श्लोक १२१ ते १३० श्लोक १३१ ते १४० श्लोक १४१ ते १५० श्लोक १५१ ते १६० श्लोक १६१ ते १७० श्लोक १७१ ते १८० श्लोक १८१ ते १८९ श्लोक १९० ते २०३ श्लोक २०४ ते २१५ नामावली गकारादिगणेशसहस्रनामस्तोत्रम् मार्कण्डेय पुराण वक्रतुण्डसहस्रनामस्तोत्रम् गुहय-सहस्रनाम-स्तोत्रम् महत्व उच्छिष्टगणेशसहस्रनामस्तोत्रम् महासिद्धिसहस्रनामस्तोत्रम् श्री सिद्धि विनायक नामावलि श्रीऋण-हरण-कर्तृ-गणपति-स्तोत्र-मन्त्र श्री विनायक अष्टोत्तरशत नामावली श्रीगणेशसहस्त्रनाम - नामावली विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्या अशा गणेशाला मी वंदन करितो. Tags : ganapatiganeshastotreगणपतीगणेशस्तोत्र नामावली Translation - भाषांतर गणंजय-गणपती-हेरंब-धरणीधर-महागणपति-लक्षप्रद-क्षिप्रप्रसादन-अमोघसिद्धी-अमित-मन्त्र-चिन्तामणी-निधि-सुमंगल-बीज-आशापूरक-वरद-शिव-काश्यप-नन्दन-वाचासिद्ध आणि ढुण्ढिविनायक ही एकवीस नामे म्हणजे एकवीस मोदक होत. या मोदकस्वरूप एकवीस नामांनी जो पुरूष माझ्या आराधनेत तत्पर राहून, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून माझे स्तवन करतो त्याला माझ्या सहस्रनामपठनाचे श्रेय मिळते यात संशय नाही.देवश्रेष्ठही ज्याच्या चरणकमळांची पूजा करतात अशा गजाननाला आमचा नमस्कार असो. अनुपम मंगलस्वरूपा गणेशा तुला नमस्कार असो. विपुलपद सिद्धिदात्या गणेशा तुला नमस्कार असो. गजशावकाप्रमाणे मुख असलेल्या गजानना तुला नमस्कार असो.किंकिणी-गण-रचित-चरण: ।प्रकटित-गुरुमित-चारुकरण: ।मदजललहरी-कलितकपोल:शमयतु दुरितं गणपति: नृप नाम्ना ॥ज्याच्या पायात घुंगरू असलेले पैंजण आहेत, नृत्याच्या सुंदर आविर्भावात जो प्रकट झालेला आहे, ज्याचे गाल मदस्रावाने भिजले आहेत असा तो गणराज आमचे संकट दूर करो.ह्याप्रमाणे गणेशपुराणाच्या उपासनाखण्डातील महागणपतीने सांगितलेले गणेशसहस्रनामस्तोत्र सूंपर्ण झाले.शुभं भवतु। शुभं भवतु। शुभं भवतु ।याच गणेशसहस्रनामाच्या अंतर्गत गणेशाच्या एकवीस नामांचा उल्लेख असलेले छोटेसे स्तोत्र आहे ते असे-लघुसहस्रनामस्तोत्रम् ॐ गणञ्जयो गणपतिर्हेरम्बो धरणीधर: ।महागणपतिर्लक्षप्रद: क्षिप्रप्रसादन: ।अमोघसिद्धिरमितो मन्त्रश्चिन्तामणिर्निधि: ।सुमङ्गलो बीजमाशापूरको वरद: शिव: ।काश्यपो नन्दनो वाचासिद्धो ढुण्ढिर्विनायक: ।मोदकैरेभिरत्रैकविंशत्या नामभि: पुमान् ।उपायनं ददेत् भक्त्या मत् प्रसादे चिकीर्षिते ।वत्सरं विघ्नराजस्य तथ्यमिष्टार्थसिद्धये ।य: स्तौति मदगतमना ममाराधनतत्पर: ।स्तुतो नाम्नां सहस्रेण तेनाहं नात्र संशय: ।-गणेशपुराण-उपासनाखण्ड-४६ वा अध्यायया स्तोत्राचे वैशिष्टय हे की स्वत: गणेशाने आपल्या निस्सीम भक्तासाठी सहस्त्रनामाला सुचविलेला हा पर्याय आहे. वेळेअभावी ज्याला संपूर्ण गणेशसहस्रनाम म्हणणे शक्य नाही आणि ‘जो भक्त माझ्या प्रसन्नतेची इच्छा करीत असेल, पाहिजे असलेली गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा करीत असेल त्याने अत्यंत भक्तिभावाने, संपूर्ण चित्त माझ्यावर एकाग्र करीत, वर्षभर एकवीस मोदक मला अर्पण करीत हे लघुसहस्रनामस्तोत्र म्हटले तर, संपूर्ण गणेशसहस्रनाम पठन केल्याचे श्रेय लाभते,’ या स्तोत्रात गणेशाची एकवीस नामे ग्रथित केली आहेत ती खालीलप्रमाणे -१. गणञ्जय २.गणपति ३.हेरम्ब ४.धरणीधर ५.महागणपती ६.लक्षप्रद ७.क्षिप्रप्रसादन ८. अमोघसिद्धि ९.अमित १०.मन्त्र ११.चिन्तामणि १२.निधि १३.सुमङ्गल १४.बीज १५.आशापूरक १६.वरद १७.शिव १८.काश्यप १९.नन्दन २०.वाचासिद्ध आणि २१.ढुण्ढिविनायकगणेशाच्या कोणत्याही नामोच्चाराबरोबर आठवते ती दूर्वा. गणपति आणि दूर्वा हे जणू काही अलिखित समीकरणच ! गणेशाला दूर्वा अतिशय प्रिय. त्यासंबंधी गणेशपुराणाच्या उपासनाखण्डात तिचे माहात्म्य वर्णन करणारे तीन अध्याय आहेत. त्यात ती गणेशाला इतकी प्रिय का यासंबंधी सुंदर कथा येतात.गणेशपूजनविधिमध्ये ‘दूर्वार्चन’ हे झालेच पाहिजे असा नियम आहे. उपासनाखण्डाच्या दूर्वोपाख्यानविषयक बासष्टाव्या अध्यायात श्रीगजानन म्हणतात - ‘भाद्रपद शुक्ल चतुर्थीस एखाद्या दुष्टाने जरी मला केवळ एक दूर्वा समर्पण केली तरी तो मला मान्य आणि पूज्य होतो.’ एका दूर्वांकुराने एवढी किमया होऊ शकते !६४ व्या अध्यायात श्रीगजानन देव आणि मुनि यांना म्हणतात - ‘मत्पूजा भक्तिनिर्मिता । महती स्वल्पिका वा अपि वृथा दूर्वाङ्कुरैर्विना । विना दूर्वाङ्कुरै: पूजाफलं केनापि नाप्यते । भक्त्या समर्पिता दूर्वा ददाति यत्फलं महत् । न तत् क्रतुशतै: दानै: व्रत-अनुष्ठानसंचयै: । तपोभि: उग्रै: नियमै: कोटिजन्मार्जितै: अपि । प्राप्यते मुनयो देवा यद् दूर्वाभि: अवाप्यते ।’ (माझी भक्तीने केलेली मोठी किंवा लहान पूजा एका दूर्वांकुरावाचून व्यर्थ आहे. दूर्वांकुरावाचून माझ्या पूजेचे फल कोणालाही मिळत नाही. माझ्या भक्तांनी भक्तीने अर्पण केलेली एक दूर्वा जे फल देते ते शतयज्ञ, दाने, अनेक व्रतानुष्ठाने, उग्र तपश्चर्या व कोटि जन्मांमध्ये केलेल्या नियमांनीही प्राप्त होत नाही.)६६ व्या अध्यायात कौण्डिन्यमुनि म्हणतात - ‘गणपति हा देव असा आहे की जो असंख्य पदार्थ खाऊनही तृप्त होत नाही तोच एका दूर्वांकुरानेही तृप्त होतो.’ एका दूर्वांकुराचे मोल त्रैलोक्यालाही नाही. दूर्वेचे नुसते स्मरण करताच त्रिविध ताप नाहीसे होतात कारण तिचे स्मरण होताच श्रीगजाननाचेही स्मरण होते. दूर्वेच्या केवळ गंधामुळेही श्रीगजानन संतुष्ट होतात. पुष्कळ दूर्वा न मिळाल्यास एकाच दूर्वेने गणेशपूजन केले तरी कोटिपट पूजा केल्याचे श्रेय प्राप्त होते. असे उल्लेख या उपासना खण्डात वारंवार आढळतात. अंगारक चतुर्थीस दूर्वांबरोबरच पांढर्या दूर्वा वाहण्यासंबंधीचाही येथे उल्लेख येतो.‘दूर्वार्चन’ म्हणजे प्रत्येक नाम, सप्रणव (यथाधिकार बीजमंत्रासह) उच्चारून ‘नम:’ म्हणत बरोबर एक एक अथवा दूर्वायुग्म (दोन दूर्वा एकदम) गणेशमूर्तीवर वाहणे. ‘दूर्वार्चने तु नियमो धर्मो गाणपतस्य च ।’ असे शास्त्रवचन आहे. गणेशभक्तिसिद्धीचे ते एक मुख्य़ व अवश्यकर्तव्य साधनच होय.गणेशसहस्रनामार्चनामध्ये मुख्यत्वे दूर्वेचे ग्रहण झाले आहे. गणेशपूजाद्रव्यांमध्ये दूर्वा अत्यंत श्रेष्ठ व गणेशप्रिय! दूर्वेवाचून गणेशपूजा पूर्ण होऊच शकत नाही.गणेशस्य प्रिया दूर्वा परमा तस्य पूजने ।विनादूर्वां निराहारो गणेश: अत:समर्चने ॥१॥मुख्या दूर्वा वृथा पूजा कृता चेत् दूर्वया विना ।अलाभे बहुदूर्वाणाम् एकया एव अपि पूजयेत् ॥२॥शुष्कया वा अथ निर्माल्यदूर्वया अपि समर्चयेत् ।न कदापि गणेशस्य पूजा स्याद् दूर्वया विना ॥३॥या श्लोकांमधून गणेशपूजेत दूर्वेशिवाय पर्याय नाही हेच दिसून येते. दूर्वेशिवाय गणपति उपाशी राहतो. खूप दूर्वा मिळाल्या नाहीत तरी एक दूर्वा तरी वाहावीच मग ती सुकलेली किंवा निर्माल्य असली तरी चालेल. असे यात म्हटले आहे. दूर्वेशिवाय गणेशाची पूजा पूर्णच होऊअ शकत नाही.दूर्वार्चन विधि---नित्यपूजा पुष्पोपचारापर्यंत येऊन नानाविध पुष्पे, शमी, श्वेतार्क-मंदारपुष्पादी अर्पण झाल्यावर करावयाचा व नंतर धूपदीपनैवेद्यादी करून पूजा संपवायची.सहस्रार्चनाचे शेवटी ‘श्रीमद्गणेश-एकविंशति-नामावली’ व ‘सिद्धि-बुद्धि पंचविशी’ अवश्य वाहावी. ती खालीलप्रमाणे -॥ श्रीमद्गणेश-एकविंशति-नामावलि: ॥१. गणंजयाय नम: ।२. गणपतये नम: ।३. हेरस्वाय नम: ।४. धरणीधराय नम: ।५. महागणपतये नम: ।६. बुद्धिप्रियाय नम: ।७. क्षिप्रप्रसादनाय नम: ।८. अमोघसिद्धये नम: ।९. अमितमन्त्राय नम: ।१०. चिन्तामणये नम: ।११. निधये नम: ।१२. सुमंगलाय नम: ।१३. बीजाय नम: ।१४. आशापूरकाय नम: ।१५. वरदाय नम: ।१६. कवये नम: ।१७. काश्यपाय नम: ।१८. नन्दनाय नम: ।१९. वाचासिद्धाय नम: ।२०. ढुण्ढये नम: ।२१. विनायकाय नम: ।श्री स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नम: । श्रीमहासिद्धयै नम: । श्री महाबुद्धयै नम: । श्रीमहालक्षाय नम: । श्रीमहालाभाय नम: ।श्रीमद्गुणेशाय युवराज्ञे नम: । श्रीमहामूषकायनग्नभैरवाय च नम: । श्रीगणकादि गुरुभ्यो नम: । श्रीगुरुपादुकाभ्यां नम: ।॥ श्रीमहाबुद्धि-पोञ्चविंशतिनामावलि: ॥१. वागीश्वर्यैं नम: ।२. महाविद्यायै नम: ।३. महाबुद्धयै नम: ।४. सरस्वत्यै नम: ।५. धिये नम: ।६. धारणावत्यै नम: ।७. मेधायै नम: ।८. ब्रह्मानन्दस्वरूपिण्यै नम: ।९. पञ्चचित्तवृत्तिमय्यै नम: ।१०. ब्रह्मविद्यास्वरूपिण्यै नम: ।११. ब्रह्यज्ञानमय्यै नम: ।१२. वाण्यै नम: ।१३. निजलोकनिवासिन्यै नम: ।१४. प्रज्ञायै नम: ।१५. निरुपाधिमायायै नम: ।१६. बुद्धयै नम: ।१७.विद्यायै नम: ।१८. विरिञ्चिजायै नम: ।१९. वैनायक्यै नम: ।२०. महावाण्यै नम: ।२१. शारदायै नम: ।२२. विश्वरूपिण्यै नम: ।२३. सहस्राराम्बुजगतायै नम: ।२४. मत्यै नम: ।२५. देव्यै नम: ।। इति श्रीमहाबुद्धि-पंचविंशति नामावलि: ।॥ श्रीमहासिद्धि-पञ्चविंशति नामावलि: ॥१. महालक्ष्म्यै नम: ।२. महासिद्धयै नम: ।३. मूलप्रकृत्यै नम: ।४. अव्ययायै नम: ।५. ओंकाररूपिण्यै नम: ।६. महामायायै नम: ।७. कमलायै नम: ।८. सुंदर्यै नम: ।४९. रमायै नम: ।१०. अजायै नम: ।११. एकायै नम: ।१२. केशवमात्रे नम: ।१३. योगानन्दस्वरूपिण्यै नम: ।१४. वल्लभायै नम: ।१५. ब्रह्यतनयायै नम: ।१६. सृष्टिस्थित्यन्तरकारिण्यै नम: ।१७. लक्ष्म्यै नम: ।१८. ब्रह्मभावसिद्धयै नम: ।१९. सिद्धयै नम: ।२०. श्रियै नम: ।२१. विघ्ननाशिन्यै नम: ।२२. सहस्रदलपद्यस्थायै नम: ॥२३. स्वानन्दलोकवासिन्यै नम: ।२४. मुक्त्यै नम: ।२५. चिन्तितदायै नम: ।॥ इति श्रीमहासिद्धि पञ्चविंशतिनामावलि: ॥ N/A References : N/A Last Updated : April 16, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP