मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १७१ ते १८०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १७१ ते १८०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


सप्तकोटि-महामन्त्र-मन्त्रत-अवयव-द्युति: ।
त्रयस्त्रिंशत्‌-कोटि-सुरश्रेणी-प्रणत-पादुक: ॥१७१॥
९९६) सप्तकोटिमहामन्त्रमन्त्रितावयवद्युति---सात कोटी महामन्त्रांच्या योगाने, मन्त्रित अवयवांनी युक्त कांतीने प्रकाशमान्‌ असा.
९९७) त्रयस्त्रिंशत्‌कोटिसुरक्षेणीप्रणतपादुक---तेहतीस कोटी येथे कोटीचा अर्थ संख्यात्मक नसून विभाग, प्रकार, गट असा आहे. (८वसू-११ रुद्र-१२ आदित्य-१ इन्द्र-१ प्रजापती मिळून ३३ देवता) देव ज्याच्या चरणपादुकांना नमन करतात असा.
अनन्तनामा अनन्तश्री: अनन्तानन्त-सौख्यद: ।
इति वैनायकं नाम्नां सहस्रम्‌ इदम्‌ ईरितम्‌ ॥१७२॥
९९८) अनन्तनामा---अनन्त नामे असलेला.
९९९) अनन्तश्री---अपार विद्या, संपत्ती, कीर्ती असणारा.
१०००) अनन्तानन्तसौख्यद---अपार अपार सौख्य देणारा. असे हे विनायकाच्या नावाचे सहस्रक सांगितलेले आहे.
फलश्रुति: ।
इदं ब्राह्ये मुहूर्ते वै य: पठेत्‌ प्रत्यहं नर: ।
करस्थं तस्य सकलम्‌ ऐहिक-आमुष्मिकं सुखम्‌ ॥१७३॥
जो मनुष्य दररोज ब्राह्य-मुहूर्तावर या गणेशसहस्रनामाचे पठन करतो. त्याच्या हातातच ऐहिक आणि (आमुष्मिक) पारलौकिक सुख असते.
आयु:---आरोग्यम्‌-ऐश्वर्यं धैर्यं शौर्यं बलं यश:।
मेधा प्रज्ञा धृति: कान्ति: सौभाग्यम्‌ अतिरूपता ॥१७४॥
सत्यं दया क्षमा शान्ति: दाक्षिण्यं धर्मशीलता ।
जगत्‌ संयमनं विश्वसंवाद: वादपाटवम्‌ ॥१७५॥
सभापाण्डित्यम्‌ औदार्यं गाम्भीर्यं ब्रह्मवर्चसम्‌ ।
औन्नत्यं च कुलं शीलं प्रताप: वैर्यम्‌ आर्यता ॥१७६॥
ज्ञानं विज्ञानम्‌ आस्तिक्यं स्थैर्यं विश्वातिशायिता ।
धनधान्य-अभिवृद्धि: च सकृत्‌ अस्य जपात्‌ भवेत्‌  ॥१७७॥
आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धैर्य, शौउ बल, कीर्ति (यश:), धारणशक्ति (मेधा), आकलनशक्ती (प्रज्ञा), स्थैर्य (धृति:), कान्ती, सौभाग्य, सौंदर्य ॥१७४॥
सत्य, दया, क्षमा, शान्ती, उदारता, धर्मशीलतां जगद्‌वशीकरण, सर्वानुकूलता (विश्वभाव), शास्त्रार्थपटुता ॥१७५॥
सभापाण्डित्य, औदार्य, गांभीर्य, ब्रह्मतेज, उन्नती, उत्तमकुल, चारित्र्य, प्रताप, वीर्य आणि सभ्यता ॥१७६॥
ज्ञान, विज्ञान, आस्तिकता, स्थिरता, जगामध्ये श्रेष्ठत्व, धनधान्यसमृद्धि इत्यादी सर्व केवळ या नामांचा एकदा जप केल्याने प्राप्त होते. ॥१७७॥
वश्यं चतुर्विधं नृणां जपात्‌ अस्य प्रजायते ।
राज्ञ: राजकलत्रस्य राजपुत्रस्य मन्त्रिण: ॥१७८॥
जप्यते यस्य वश्यार्थं स: दास: तस्य जायते ।
धर्मार्थकाममोक्षाणां अनायासेन साधनम्‌ ॥१७९॥
या जपाने राजा, राजपत्नी, राजपुत्र व मंत्री या चार प्रकारची माणसे वश होतात. ॥१७८॥
ज्याला वश करण्यासाठी हे सहस्रनाम घेतले जाते तो त्याचा दास बनतो. फार सायास (कष्ट) न करता धर्म-अर्थ-काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ साधता येतात. ॥१७९॥
शाक्तिनी डाकिनी रक्ष: यक्ष: उरग-भय़-अपहम्‌ ।
साम्राज्यसुखदं च एव समस्तरिपुमर्दनम्‌ ॥१८०॥
हे गणेशसहस्रनामस्तोत्र शाकिनी, डाकिनी (पिशाची), राक्षस (पिशाच), यक्ष तसेच सर्प (उरग) या सर्वांपासूनचे भय नाहीसे करते.

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP