मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नरहरि|गंगारत्नमाला| भाग ६ गंगारत्नमाला भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ गंगारत्नमाला - भाग ६ कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली. Tags : kavyanarahariramकाव्यनरहरिराम भाग ६ Translation - भाषांतर साकीम्हणे गाधि-सुत सुर-प्रयागापासुनि गंगा आली ॥उल्लंघोनी हिमालयाते पर्वत-राजाखाली ॥१०३॥तये ठिकाणी हरि-द्वार हे स्थान असे रघु-राया ॥स्वर्ग-द्वारचि जाण लक्ष्मणा विष्णु-दर्शना जाया ॥१०४॥शिव-द्वेष मनि धरुनि यज्ञ ते ठायी दक्षे केला ॥यज्ञ-पती शिव कोपे दक्षासह मख नाशा नेला ॥१०५॥स-भय सुरांनी स्मरता ते क्षणि श्री-हरि तेथे आला ॥शिवासि जाता शरण सुरांसह शिवही येता झाला ॥१०६॥शर्वाज्ञेने बस्त-मुखाते लावुनि गंगा-स्नाना ॥घालितांचि तो स-जिव दक्ष करि शिव-स्तुतीते नाना ॥१०७॥रुद्राते सुर भाग देउनि स्तविती जोडुनि पाणी ॥वर-द-राज तो संतोषे मग वदे सुरांते वाणी ॥१०८॥हरि-प्राप्तिचे द्वार म्हणोनी हरि-द्वार हे राहो ॥नाव पुरीला, एथे येता पतितहि मुक्ती पावो ॥१०९॥क्रतु-दर्भाने पूर्ण-गर्भ हे तीर्थ जाहले याला ॥कुशावर्त हे नाव जनाते ने स्नाने मोक्षाला ॥११०॥असे वदोनी शंभु राहिला बिल्वकेश या नावे ॥पश्चिम-भागी गंगा-तिरी पुरीत हरिही राहे ॥१११॥माया-नगरी तीच राघवा हरि-हर जेथे वसती ॥त्या गंगेला काय वर्णू मी सहस्त्र जिव्हा नसती ॥११२॥शर्व-जटोद्भव वीरभद्र जो दक्ष वधाया आला ॥हरि-द्वार या क्षेत्रामागे प्रेमे वसता झाला ॥११३॥क्षेत्रा जवळि पश्चिम-वाहिनि रामा गंगा झाली ॥पुढे अग्निच्या दिशे लक्षुनी वेगे सिंधु निघाली ॥११४॥गीतीआहे तदग्र-भागी जे निंदी दक्ष लोक-पा वाया ॥दावाया सु-पथ तया कनखल हे तीर्थ लोक पावाया ॥११५॥तत्त्री दक्षेश्वर पुण्य-क्षेत्र हि असे नरा ज्याचा ॥बा लभ सुख-द जैसा इंद्राच्याही तसा न राज्याचा ॥११६॥गीतिऐशी अनंत तीर्थे जीत मला वर्णवे न रामा ती ॥नेती विष्णु-पदाते यत्तीर-ज लागता नरा माती ॥११७॥सं-क्षेपे तुज कथितो गंगा-तीर्थासि राम राया गा ॥यत्स्नाने स्वर्ग मिळे जो न मिळे करुनि पामरा यागा ॥११८॥त्याच्या पुढे हि पश्चिम-भागी रानात गडमुनीसाठी ॥मुकी द्याया आला गडमुक्तेश्वर वसे धुनी-काठी ॥११९॥भु०प्र०तयाच्या पुढे हस्तिनापुर रामा ॥असे चंद्र-वंशात जो हस्ति-नामा ॥महा शूर तो भू-पति श्रेष्ठ झाला ॥सुरांच्या सभेमाजि गाताति ज्याला ॥१२०॥अ-पापी नि-रोगी चिरायू तसा ही ॥वसे लोक जेथे परोत्कर्ष-साही ॥अ-काली नसे मृत्यु राज्यांत याच्या ॥रिपु-त्रास स्वप्नी न राज्या तयाच्या ॥१२१॥करी यज्ञ भागीरथी-तीरि भारी ॥सुखे नांदती ज्या स्थळी मर्त्य नारी ॥प्र-तापी पुरा आपुले नाव ठेवी ॥प्रसन्ना जया सर्वदा सिंधु-देवी ॥१२२॥ N/A References : N/A Last Updated : April 10, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP