कुलदैवत - आम्हा संबाचं ध्यान
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
शिव माझा बापमाय
शिव वंदीन तुझे पाय
शिव कृपाळू म्हणती
शिव भोळा चक्रवर्ती
शिव शास्त्री सरस्वती
शिव कैवल्याच्या थडी
शिव प्रेमरसाची गोडी
शिव बुडतीया सांगाडी
शिव येतोया धावत
शिव माझा गणगोत
शिवानं कैलास स्थापिले
शिवाने भक्त रक्षियेले
शिव आहे जळी स्थळी
शिव आहे काष्टी पाषाणी
शिवाचं स्मशानी राहाणं
शिवा हाती त्रिशूळ घेणं
बेलपत्री बेलाचं पान
आम्हा संबाचं ध्यान
पाटण्याच्या ध्वजा लावू
विष्णू घरी बिर्हाड नेवू
शंभू कैलासीचा राजा
त्यांना दंडवत माझा
गिरजा शोभे मांडीवरी
गंगा वाहतसे शिरी
अंगी इब्धाचं भूषाणं
गळा रुद्राक्षाचं लेणं
शिव शिव शंकर भोळा
त्याच्या गळ्यात रुद्रमाळा
N/A
References :
संग्राहक: श्री. ना. ना. शिंदे
Last Updated : October 17, 2012
TOP