मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत लोकगीते| शंकर-पार्वती कुलदैवत लोकगीते शंकर-पार्वती गिरजा शिव-गौरी हरहर महादेव शिवा शिवा महादेवा आम्हा संबाचं ध्यान शंकराचं लगीन शिव पार्वती प्रश्नोत्तरे भिल्लीण महादेव आरती आरती नमन घाणा गणेशस्थापना गौरीबाळा हरिजागर गण कुलदैवत - शंकर-पार्वती मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत शंकर-पार्वती Translation - भाषांतर पन्हाळ्याच्या दुर्गाला येळूसेन राजापुत्र नव्हता म्हणून बैरागी झालाआणि मग अरण्याच्या ठायी गेलादुपारच्या वेळी वृक्षाच्या छायेलातिथं जागा लोटायला लागलात्याला महादेवाची पिंडी लागली हातालात्या पिंडेची सेवा कराया लागलापिंडीवर टिपका झारी बांधलीअशी बारा वर्षे सेवा केलीइंद्रसभेला भोळ्या शंकराला कोडे पडलेशंकर इंद्र सोडून मानवखंडात आलेअरण्याच्या ठायाला बैरागी झालेपायात खडाव, अंगात जडावअंगात भगवे, तिरसूळ हातातजटा सोडल्या, शंख खांद्याला आणि देव निघून चाललायेळूसेन राजाच्या जवळ वृक्षाच्या छायेलात्यानं सांगितलं सेवा पुरं कर आताशिरी हात ठेवायला पाहिजेइमान भाग द्यायला पाहिजेशिरी हात ठेविला इमान भाग दिलाकाय पाहिजे ते मागून घे मलायेळूसेन राजाने पोटी संतान मागितलेदेवाने बेलाच्या झाडाचे बेलफळ तोडलेत्या बेलाच्या फळाचे दोन भंग केलेयेळूसेन राजाच्या हातात दोन भंग दिलेदेवाने सांगितले येळूसेन राजालातुझ्या अस्तुरीला उजवा भंग दे खायलाउजव्या हातचा भंग दिलास तर पोटी पुत्र होईल तुलाडाव्या हातचा भंग दिलास तर कन्यारत्न जन्मल तुलादोन्ही भंग घेऊन येळूसेन राजा निघून चाललागेला परत आपल्या वाड्यालाघरच्या अस्तुरीला सांगू लागलाउजव्या हातचं भंग खायला पाहिजे याच वेळेलाघरच्या अस्तुरीनं काय केले त्या वेळेलाफळ खाऊन मुलं होणार नाहीत मलाराणीनं रागाच्या भरात दोन्ही भंग घेतलेते दोन्ही भंग तुळशीवृंदावनात ठेविलेयेळूसेन राजा परत आपल्या नगरी आलाम्हणून नगरच्या नारी बघाया गेल्यात्या नारी राणीला विचारु लागल्याराजाने काय किमया आणिली दावाया पाहिजे आम्हांलाराणीने सांगितले त्यांना फळ खाऊन मूल व्हायचं नाही मलाबेलाचे दोन भंग आणले ते काय दावू तुम्हालानगरच्या नारी विचारती राणीलाते भंग कुठं आहेत दाखवा ते आम्हांलाराणीने सांगितले त्यासनी त्या वेळेलातुळशीवृंदावनात दोन्ही भंग आहेत ठेवलेलेनारीनी तुळशीवृंदावनातील दोन्ही भंग घेतलेराणीची समजूत घालून एक भंग खायला दिलाउजव्या हाताचा भंग राहिला गेलाडाव्या हाताचा भंग खाल्ला गेलातेथून संपूर्ण महिना राणीचा झालाएक महिना सरुन दुसरा महिना लागलाअसे नवमास पूर्ण झालेराणी प्रसूत झाली तिला कन्यारत्न जन्मलेपाचव्या दिवशी पाचवी पूजलीसातव्या दिवशी सातवी पूजलीनवव्या दिवशी नववी पूजली बाराव्या दिवशी बारशाचा आरंभ घातलाराणीच्या महालात पालक-पाळणा बांधलायेळूसेन राजाने नगरीतील ब्राह्मण बोलावलेब्राह्मण मुलीचे नाव पंचांगात बघू लागलेसकाळचा दिवस दोपारला आलामुलीचे नाव घावंना त्यांलाभोळ्या शंकराला कोडे पडले इंद्रसभेलाभावू सोडून ब्राह्मणाचं रुप धारण केलेएक सोवळे नेसून एक सोवळे काखेला लाविलेजानवे गळ्यात घालून हातात पंचांग घेतलेदेव इंद्रसभा सोडून मानवखंडात आलेयेळूसेन राजाच्या दरबारी गेलेयेळूसेन राजा सांगू लागलासकाळचा दिवस दोपारला आलामुलीचे नाव घावंना कुणालामुलीचे नाव ठेवायला पाहिजे या वेळेलाभोळ्या शंकराने पंचांग उघडले त्या वेळेलाचार पाने पालटली नाव घावले नाही त्यालापाचव्या पानाला नाव घावले त्याच वेळेलापार्वती नाव ठेवून देवशंकर निघून गेलेराजवाड्यात मुलीचे दिवस लोटाया लागलेमहिना नि महिना वर्षान वर्ष लोटत गेलेमुलगी पाच वर्षाच्या वयाची झालीपित्याला खेळ मागाया लागलीसुवर्णाची सुपली मोत्यानं गुंफलीसुवर्णाचे जाते रुप्याचा खुंटाएक प्रकारचा खेळ मुलीला दिलापार्वतीने खेळ वट्यात घेतलाचौकात खेळाचा पसारा टाकलाखेळत खेळत वर्षे लोटाया लागलीपार्वती उपवर बारा वर्षाची झालीमुलीच्या बापाला कोडे पडले जिवालाम्हणून बोलावून घेतले प्रधानालामंदीर महालात बसून सांगू लागलापार्वती लग्नाच्या वयाला आलीनवखंड पृथ्वी आणि दहावा खंड काशीदेश दुनिया बघून मुलीजोगा वर बघूनमोठा सोयरा जोडून दारी मांडव घालूनलगीन पार्वतीचे करायचे विचार चालविलापार्वतीच्या कानावर लग्नाचा उतार गेलापार्वतीने खेळता डाव बाजूला सारलापित्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केलासांगाया लागली कसला विचार चाललायपार्वती आजपर्यंत अज्ञान होतीसउपवर झालीस लग्नाच्या वयाला आलीसदेश-दुनिया फिरुन मोठा सोयरा जोडूनलग्न तुझे करायचे दारी मांडव घालूनपार्वतीने सांगितले मग आपल्या पित्यालालग्न माझे करायचे कसे माहिती नाही तुम्हांलामग पित्याने विचारले पार्वतीलालग्न कसे करायचे ते सांग मलामग पार्वती सांगते पित्यालाजन्माचा जोडा जन्माचा चुडाकधी नाही हालायचा कधी नाही डुलायचाबिनमरणाचा भरतार पाहिजे मलाअशी पार्वती बोलताना मोठे कोडे पडले पित्यालादेश दुनिया फिरले तरी असा वर मिळायचा नाही हिलामग येळूसेन राजा रागाच्या भरात बोलतो पार्वतीलातू लेक नव्हं वादीन आलीस माझ्या पोटालाजन्माची काळोखी देणार तू मलाअसे पिता बोलताना राग आला पार्वतीलापार्वती सांगते आपल्या पित्यालावाईट वंगाळ बोलू नका मलाजिकडे फुडा तिकडे मुलूख थोडा करीन या वेळेलापार्वती रागाच्या भरात निघून चालली त्या वेळेलाजाता जाताच हे वर्तमान कळले तिच्या मातेलामाता माऊली सुखाची सावली विचार केलापार्वती कुठे चालली बघाया पाहिजे या वेळेलामाता पार्वतीच्या आडवी गेलीजवळ जाऊन विचारु लागलीकुठे जातीस पार्वती सांग मलापार्वती म्हणते मातोश्री काय सांगू तुलापुढचे पाऊल मागे घेणार नाही ह्या वेळेलाजन्माचा जोडा नि जन्माचा चुडाकधी नाही हालणार कधी नाही डुलणारबिनमरणाचा भरतार मिळेल मलातर परत येईन तुझ्या नगरीलाअसा वर नाही मिळाला मलातर मी येणार नाही तुझ्या नगरीलाअसे त्या मातेने ऐकून मनाचा विचार केलापार्वतीचा हाट कशात पुरवावामातेनं पोटाशी धरलं पार्वतीलापार्वतीला धरुन चालली सराफकट्ट्यालासराफदादा जडावाचं दागिने द्या माझ्या लेकीलाभरपूर सुवर्णाचे दागिने घेतले पार्वतीलानिघून चालली शेट्याच्या दुकानालाशेटीदादा उंची पितांबर द्या लेकीलासगळा साज सिनगार घेऊन निघून चाललीआपल्या महालात जाऊन पार्वतीला समजाऊ लागलीपार्वती महालात जाऊन पितांबर नेसलीसुवर्णाचे दागिने अंगावर घातलेसाज सिनगार करुन हातात आयना घेतलाआणि रुप न्याहाळायला लागलीअंगावरचा साज सुना दिसायला लागलापार्बतीच्या वाईट वाटले मनालासाज सिनगार केला पण सुना दिसतोय मलादागिने काढून धरतीला ढीग लावलामाता सांगते पार्वतीलाआवसकून का केलास सांग मलाकोणती वस्तु मिळाली नाही तुलापैदा करुन देते ह्या वेळेलामग पार्वती सांगते मातेलाहे लेणं नव्हं माझं या वेळेलाकोणतं हाय पार्वती सांग मलापार्वती सांगते आपल्या मातेलापायातले बिरुदे हातातला चुडागळ्यातले डोरले कपाळाच कुंकूकधी नाही हालायचे कधी नाही डूलायाचेबिनमरणाचा भरतार कुठं भेटेल मलाअसा भ्रतार भेटला तर परत येईन नगरीलानाही भेटला तर येणार नाही तुझ्या नगरीलाअसे म्हणून पार्वती चालू लागलीजाता जाता हणमंताच्या राऊळा गेलीबाळ ब्रह्मचारीला नमस्कार केलाबाळ ब्रह्मचारीने विचारले पार्वतीलाका येणे केले सांग पार्वती मलादेवा सांगते तुला, पण इमानभाग द्यायला पाहिजे मलादेवाने इमानभाग दिलाकाय मागणी मागायची आहे तुलापार्वती सांगते बाळ ब्रह्मचारीलाजन्माचा जोडा आणि जन्माचा चुडाबिनमरणाचा भरतार कुठे भेटेल मलाबाळ ब्रह्मचारीला कोडे पडले जिवालानवखंड पृथ्वीत असा वर मिळायचा नाही तुलाअसे सांगताना पार्वती सांगते ब्रह्मचारीलाबिनमरणाचा भरतार दाखवा मलानाहीतर सत्व गेले म्हणून सांगासत्वाचं नाव घेताना सांगतो पार्वतीलाअंजनी मातोश्री तुळशीवृंदावनालातप धरले त्या जागेलामातेकडे जा पार्वती ह्या वेळेलापार्वती निघून चालली ऋषीमुख पर्वतालाअंजनी मातोश्री हात जोडून तुळशीवृंदावनालाअशा वेळेला पार्वती तिच्या जवळ जायालाअंजनी माता बोलली पार्वतीला का येणं केलं सांग मलापार्वती म्हणते मातोश्री काय सांगू तुलाशिरी हात ठेवा इमानभाग द्या मलामग सांगते संकट कोडे तुम्हालाअंजनी मातेने शिरी हात ठेविलाइमानभाग दिला सांगते पार्वतीलाकाय कोडे पडेल ते सांग मलापार्वती सांगते अंजनी मातोश्रीलाजन्माचा जोडा नि जन्माचा चुडाकधी नाही हालायचा कधी नाही डुलायचाअसा भरतार कुठं हाय ते सांग मलाअंजनी मातोश्री विचार करुन सांगते पार्वतीलाखुळी झालीया पार्वती का वेडी झालीया पार्वतीदेश दुनियात असा वर मिळणार नाही तुलामाझं मला पार्वती कोडं पडलंय जिवालाम्हणून तुळशीवृंदावनाला बसले या वेळेलापार्वती म्हणते मातोश्रीला कोणते कोडे पडलेय तुम्हांलाकाय सांगू पार्वती तुला तान्हा बाळ मी आडवा धरलापाणी पाजते बसले त्यालातान्ह्या बाळानं चमत्कार केलातान्ह्या बाळानं उड्डाण मारायला आणि वृक्षावर चढायलाझाड लागलाय येंगायला ह्या डहाळीवरुन त्या डहाळीलाउड्या घेत गेलाय कुणाच्या मुलखालाआहे कुणच्या खंडाला हे माहित नाही मलाम्हणून तप धरले आहे तुळशीवृंदावनालातू कोडे घातलेयस मलाबिनमरणाचा भरतार कुठं दाखवू तुलापार्वती बोलते मातोश्रीला सत्व गेले सांगा मलासत्वाचं नाव घेताना मातोश्री बोलते पार्वतीलाखुळी झालीस पार्वती का वेडी झालीस पार्वतीभरतार नाही सुखाचा, जीव जाईल लाखाचापार्वती सांगते मातेला भरताराच्या पायातजीव गेला तरी हरकत नाही या वेळेलापण बिनमरणाचा भरतार दाखवा मलामातोश्री सांगते पार्वतीला ऐक पार्वती ह्या वेळेलावनाच्या ठायाला किर्रर्र दाट अंधार झाडीलावनगाईच्या शेणानं सारवून सात सुयांची उतरंड लावूनसुईच्या टोकावर जिभीचा शेंडा ठेवूनउपारटे तप धरले पाहिजे त्या वनालाएवढे ऐकून पार्वती निघून चाललीभरतारासाठी वनाची वाट धरलीभयासूर वनात जाऊन वनगाईच्या शेणा सारवूनसात सुयांची उतरंड त्यावर जिभीचा शेंडा ठेवूनसर्व देह तोलून तप धरले वनाच्या ठायालापार्वतीच्या तपाला दिवस लागले लोटायालावनाच्या ठायाला पार्वतीच्या तपालावाळव्यानी तपाभोवतन वारुळ चढवायेलापार्वतीचं तप मुजीवलं बनाच्या ठायालापार्वतीच्या तपाला बारा वर्ष होयालापार्वतीचं तप अगळी होयलातपामुळे सूर्याचा रथ बंद पडायेलासूर्यदेवानं मनाचा विचार केलामधूनच रथ मागे वळवलाघेऊन गेला आपल्या तळालासूर्याची माता बोलते सूर्यालारथ का हो मागे आलासूर्य म्हणतो मातोश्रीला काय सांगू माते तुलामानवखंडात कोणी तप धरले त्या वनाच्या ठायालातप अगळी झाले वाट मिळेना मलाजिकडे रथ वळतील तिकडे तप वळते त्या वेळेलाम्हणून रथ घेऊन आलो तुमच्या तळालामाता सांगते सूर्याला कोणी तप धरले माहिती नाही तुलाबाळा तप धरले तुला जितायलासूर्यदेवानं रथाला वारु जोडीयलासूर्यदेव रथात बसायलारथ आकाशमाथी निघून चाललापार्वतीचे तप लागला शेंदायलासूर्याचा रथ खाली येईल त्या वेळेलातसे तप लागले धरतीला जिरायलासूर्याचा रथ आला धरतीला टेकायलातरी काय तप लागेना हातालासूर्यदेवाने रथ मागे वळविलाघेऊन गेला आपल्या तळालासूर्याची माता विचारते सूर्यालागेलेल्या कामाचे वर्तमान सांग मलासूर्य सांगतो मातेला तप गेलो शेंदायलापार्वतीचे तप लागले भूमीत जिरायलाम्हणून तेथूनच रथ मागे वळविलामाता सांगते सूर्याला ऐक या वेळेलानेमाप्रमाणे रथ घेऊन जा मध भागालाचौसष्ट झळा बावन्न कळा सोड त्या ठायालातुझ्या झळेनं तप जळून जाईल त्या वनालासूर्याचा रथ आकाशमाथी निघून चाललामध भागाला जाऊन दोपारच्या पारातचौसष्ट झळा सोडल्या त्या ठायालासूर्याच्या झळेनं झाडंझुडं उभी जळालीपाषाणाच्या लाह्या उडल्यासूर्याने विचार करुन रथ मागे घेऊन गेलारथ आलेला पाहून मातोश्रीने विचारले सूर्यालागेलेल्या कामाचं वर्तमान सांग मलासूर्य म्हणतो मातोश्री काय सांगू तुलामोठा अपराध झाला शिरी दोष राहिलासांगितल्याप्रमाणे झळा सोडून दिल्यावनातील ओली झाडे जळून गेलीकिती पशु पक्षी मरुन गेलीहा चमत्कार बघून रथ आणला तळालातपाच्या जोरानं काय प्रकार झालातपाच्या जोरानं नवलाखांचं तारांगण डुललंभोळ्या शंकराच्या गादीला धक्का बसलाखेळता डाव सोंगट्यांचा चुकलाशंकराला कोडे पडले जिवालातेहतीस कोटी देव बोलाविले सभेलाशंकराने पैजेचा विडा लावला सभेलासांगतो तेहतीस कोटी देवालापैजेचा विडा उचला या वेळेलातपाचा शोध लावा मानवखंडालातेहतीस कोटी देवांनी फरा धरायलादेव धुंडाळायला लागले त्या वनालाधुंडाळून कासावीस झाले त्या वनालातेहतीस कोटी त्या वनाच्या ठायालावृक्षाजवळ जमा झाले एका जागेलातेहतीस कोटी देवांनी विचार केलाहिंडून फिरुन तपाचा शोध नाही लागणार वनालाकिर्रर्र दाट अंधार झाडी या वनालातेहतीस कोटी देवांनी कुर्हाडी घ्यायलात्या वनाच्या ठायाला झाडी डंग तोडायलाअग्नि दिली त्याला धुराचा कोट उठलातेहतीस कोटी देवांनी फरा धरायला आणि वन लागले धुंडायलादेवांना मागचे काय दिसेना अन काय सुचेनाअन दिशाभूल झाले त्या वनालातेहतीस कोटी देव जमले त्या वेळेलाआणि विचार करु लागले त्या वनालातपाचा शोध लागेना आपणालाचला जाऊ या इंद्रसभेलाशरण जाऊ या भोळ्या शंकरालातेहतीस कोटी देव गेले शंकराच्या सभेलाभोळा शंकर विचारतो तेहतीस कोटी देवांनागेलेल्या कामाचे वर्तमान सांगा मलाकाय सांगू देवा तुम्हांलाआम्हांला जीवदान द्या या वेळेलातपाचा शोध लागत नाही आम्हांलातेहतीस कोटी देव शंकराला शरण जातानाशंकराच्या गादीला नंदी होता त्या वेळेलादेव शरण आलेले बघून हसू आले नंदीलातेहतीस कोटी देव सांगतात नंदीलानंदी हसलास ते सांग आम्हांलानंदी सांगतो त्या देवांलातेहतीस कोटी वीर गेलासा मानवखंडालातपाचा शोध नाही लागला तुम्हांला म्हणून हसू आले मलात्याच वेळी नंदीने विडा उचललासांगतो तेहतीस कोटी देवांनातपाचा शोध लागला तर येईन या इंद्रालानाही शोध लागला तर येणार नाही इंद्रालाअसा निर्धार करुन नंदी निघून गेलामानवखंडाला त्या त्या वनाच्या ठायालावन लागला सारे धुंडायलासकाळचा दिवस दोपारला आलाउन्हाने कंठ गेला सोकून नंदीचातपाचा शोध लागेना त्या वनालानंदीने शंकराचा धावा केलानंदीने मनाचा विचार केलावारुळ फोडावं या वेळेलानंदी वारुळाजवळ गेलावारुळाभोवती वेढा टाकलाडाव्या पायाचा खरका मारलाडावे शिंग लावले त्या वारुळालाएवड्यात पार्वती सांगते त्या नंदीलानंदी महाराज जरा दम धराराग थंड करुन थोडे मागे सरातुम्हाला सांगते ऐका या वेळेलामी एक मागणी मागते तुम्हांलानंदी सांगतो त्या पार्वतीलाकाय मागायचे ते माग मला निर्माण करुन देतो तुलापार्वती सांगते नंदीला धन द्रव्य नको मलाजन्माचा चुडा कधी नाही हालायचा कधी नाही डुलायचाबिनमरणाचा भरतार द्यायला पाहिजे मलाअशी पार्वती बोलताना कोडे पडले त्या नंदीलानंदी सांगतो पार्वतीलाअसा भरतार मिळणार नाही तुलापार्वती सांगते नंदीला सत्व गेले म्हणून सांगा मलाआल्या मार्गे निघून जावानंदी विचार करुन सांगतो पार्वतीलापार्वती भरतार नाही सुखाचा जीव जाईल लाखाचापार्वती सांगते नंदीला भरताराच्या पायात देहप्राण गेलातरी हरकत नाही या वेळेलाअसे सांगताना नंदीने डावा गुडघा टेकलाउजवे शिंग वारुळाला लाविलेवारुळातून पार्वतीचे तप उतरलेआणि नंदीबरोबर इंद्राला गेलेसर्व देवांचे डोळे दिपून गेलेतेहतीस कोटी देवांनी विचार केलाअशी रंभा गरत पाहिजे आपल्यालानंदीने सांगितले त्या पार्वतीलाहार घेऊन शोधून काढा शंकरालापार्वतीने हातात हार घेतलातेहतीस कोटी देवांत लागली हिंडायलाभोळा देव शंकर दिसेना तिलासभेच्या लांब दूर पल्ल्यालाशंकराला पाहिले त्या वेळेलाकोणची खूण होता भोळ्या शंकरालापायावरची पद्म ओळखली त्या वेळेलापद्म ओळखून हार घातला शंकराला N/A References : संग्राहिका: सौ. शशिकला पाटील Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP