कुलदैवत - शिवा शिवा महादेवा
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पहिला तांदूळ महादेवा
काशी विश्वेश्वरासारखा बाप द्यावा
दुसरा तांदूळ महादेवा
कामधेनुसारखी माता द्यावी
तिसरा तांदूळ महादेवा
आपल्या चरणी ठाव द्यावा
चवथा तांदूळ महादेवा
सूर्यनारायणासारखा भ्रतार द्यावा
पाचवा तांदूळ महादेवा
पाची पांडवांसारखे पुत्र द्यावे
सहावा तांदूळ महादेवा
सावित्रीसारखे सौभाग्य द्यावे
सातवा तांदूळ महादेवा
सप्तऋषिसारखे बंधू द्यावे
आठवा तांदूळ महादेवा
अष्टभुजेचे दर्शन घडावे
नववा तांदूळ महादेवा
नऊ खण पृथ्वीचे राज्य घडावे
दहावा तांदूळ महादेवा
दहा वर्ष काशीवास घडावा
आकरावा तांदूळ महादेवा
आकरा कोटी सहस्त्र जप जपल्याचे पुण्य घडावे
बारावा तांदूळ महादेवा
नंदीवर बसून कैलासा जावा
शिवा शिवा महादेवा प्रयागनाथा उमानाथा
आपल्या चरणी स्नान करता
मज मुक्ति मिळेल आता
राजाच्या हाती सोन्याचं पान
दुबळ्याही हाती बेलाचं पान
माझी पूजा माणिक मोत्यासमान
N/A
References :
संग्राहिका: सौ. मंगला नावडीकर
Last Updated : October 17, 2012
TOP