भाग २ - लीळा ३४१ ते ३५०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा ३४१ : पींपळगांवीं अग्नीष्टीके माहादेवो पाठका भेटि
मग गोसावी तेथौनि पीपळवाडीए बीजें केलें : अग्नीष्टिकेसि वस्ति जाली : बाइसीं इंद्रभटांकरवी तेल आणवीलें : मग वाति लाविली : दीस माळवलेया उपरि रात्रीं कपाटौनि माहादेवो पाठक गांवांतु जात होते : तवं अग्नीष्टिकेसि वाति देखीली : तेंहीं ह्मणीतलें : ‘आजि येथ वाति काइसी : पां’ : ह्मणौनि साउमे आले : टेंक वेंधलें : पाउटणियां दोनि वेंधतां : पोटीं धाप न माए : धावत आले : तवं गोसावीयांतें देखीले : जवळि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : जवळि बैसले : ‘पूर्वी तुम्हा एथचें दरिसन आथि’ : ‘हो जी’ : ‘कोणे ठाइं’ : ‘जी जी : भोगनाराएणीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तैं आपण किंचीत होते या’ : ‘हो जी : तैं आंग कृश्य होतें : हो जी’ : ‘तरि एसणी पुष्टी काइसी पां’ : ‘जी जी : गोसावीयां पासौनि : जी जी : तै लागौनि उन न साहे’ : आणि स्तिति जाली : भोगीली : भंगली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसें एथौनि तुह्मां एसणें गोमटें आति : तरि एथीचेया दरिसना न या तें काइ’ : ‘जी जी : कवणें ठाइं असति : ऐसें जाणिजे ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें एथ असे : मां प्रतिष्ठान प्रांतीं’ : तवं वेशीराखा बोबाइला : गोसावी तेयासि पाठवणी दीधली : निगाले : मग तराळे बोळाउनि घातले : तेथ वस्ती जाली : ॥

लीळा ३४२ बाबूळवनीं माहादेवो पाठकाचा उपाहारू
तेथ गोसावीयासि उदयाचा पुजावस्वरू : उदेयांचि माहादेवो पाठक आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांसि तैं उपाहारालागि वीनवीलें : ‘जी जी : आजीचा दीसू राहावें : मी उपाहार गोसावीयालागि आणिन’ : गोसावी वीनती स्विकरीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें आतांचि निगालें : मागिला कडौनि बाबूळवना आणा’ : ‘हो कां जी : एकादे माणूस राहावावें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया राहा गा’ : मग गोसावी बाबूळवनासि बीजें केलें : तेथ आसन : तवं उपाहारू घेउनि आले : मग गोसावीयांसि पुजावखर : भक्तजनासहीत आरोगण : गुळळा : वीडा : ब्रह्मनाथीं पहुड : ॥

लीळा ३४३ : सवीता नागनाथीं वस्ति
गोसावीयांसि उपहुड : मग गोसावी सवीतेयासि बीजें केलें : माहादेवो पाठक गांवा गेले : गोसावीयांसि नागनाथीं चौकीं आसन : बाइसीं इंद्रभटातें तेल आणूं पाठवीलें : गोसावी बाहिरि बीजें केलें : दारवंठाचीये उतरिले सोडीयेवरि आसन : तवं इंद्रबा तेल घेउनि आले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया : गांवांतु वार्ता काइ’ : ‘जी जी : कांहीं नाहीं जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘वार्ता कैसी नाहीं : राज्यांतर जालें : रामदेवो रावो राजीं बैसला : आमणदेवो खालि उतरीला : देवगीरी पालटीलीं : हा नव्हे लोकू पळतु असे : जा : वार्ता शोधा’ : (परशरामबास) ‘तुमचे गावीं सोइरे असति : आणि : वार्ता कैसी नेणां’ : (रामेश्र्वरबास) मग ते गेले : तें शोधिलें : मग गोसावीयां पुढें सांघितलें : ‘साच जी : लोकु घरां वेंघौनि पाहत असे’ : मग गोसावीयांसि वस्ति जाली : रात्रीचा पुजावस्वर : व्याळी जाली : वीडा जाला : पहुड : पश्र्चात पाहारीं परीश्रया बीजें केलें : रवणीये वरि गुळळा : तांबोळ प्रत्येजीलें : चरणक्षाळण जालें : चौकीं पुजावसर जाला : मग गोसावी जोगेश्र्वरीं बीजें केलें : ॥

लीळा ३४४ : जोगेश्र्वरीं अवस्थान : स्थानप्रशंसा
गोसावी जोगेश्र्वरीचेया देउळा बीजें केलें : गुंफेसि अवस्थान : (शोधु) मासू एकू : उदीयांचि देउळा बीजें केलें : भितरि देउळ अवलोकीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘कैसें सदीपस्थान एथ जो अनुष्ठान करी : तेया अनुष्ठानसिधि होइल’ : ॥

लीळा ३४५ : उमाइ अवडळां भेटि
उमाइसें आणि अवडळभट : गोसावीचेया दरिसना निगालीं : एकें पेणेनिं मागिली कडौनि : तियें येतें असति : तीयें प्रतिष्ठानासि आली : तेथ लखुबाइसें भेटलीं : तेयांतें पूसीलें : ‘गोसावी कवणी ठाइं राज्य करीत असति’ : तेंही ह्मणितलें : ‘पींपळवाडीये : गोसावी कालि बीजें केलें : मि बोळवीत गेलिये होतीये’ : तैसीचि पींपळवाडिये आली : माहादेवो पाठकांतें पुसीलें : तेंही ह्मणीतलें : ‘गोसावीयांसि बाबूळवनीं आरोगण : ब्रह्मनाथीं पहुड : मग गोसावी सवीतेयांसि बीजें केले : हें नव्हे : आतांचि मीं बोळउनि आलां’ : तीये दीसीं तीयें भागलीं : न टकेचि : मग तीयें पींपळवाडीसि राहीलीं : उदेयांचि सवितेयासि आलीं : नागनाथीचेया गुरुवातें पूसीलें : तथा : राणा गुरुवें सांघीतलें : ‘एथ गोसांवीयांसि वस्ति जाली : एथ गुळळा केला : हें नव्हे : गोसावी आताचि बीजें केलें’ : तेथ उमाइसीं पाहीलें तवं तांबोळ सांडीलें : देखीले : उमाइसीं फोडी वेंचूनि प्रसादु घेतला : तथा घेतलीया : ऐसीया सुगंधा आणि सुपारिमळा : ‘भक्तजन कवणें ठाइ जाला’ स : ‘ना : सोंडीयेवरि’ : ॥  मग तैसीचि तीयें जोगेश्र्वरिसि आलीं : तवं भक्तजन गुंफा चोखट करीत असति : देउळाचीए पडीसाळेएसि आसन : उतराभिमुखू : तेथ उमाइसासि अवडळभटांसि दरीसन जालें : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसलीं : मग गोसावीयां पुढें मागील अवघेंचि सांघीतलें : ‘जी जी : मीयां सुरंगा आणि सुपरिमळा फोडी देखिलिया : ह्मणे ऐसीया जी : या फोडी : तीया आमुचीया गोसावीयांचियां’ : गोसावी मानिलें : बाइसीं ह्मणीतलें : ‘बाबा : मासोपवासीन कैसी भावाळ’ : ॥

लीळा ३४६ : तथा पाणिभातु ह्मणीयें
गोसावी उमाइसातें ह्मणीतलें : ‘मासोपवासीये हो : मासोपवासियें जीये होती : तियें देवद्वारी सडा घालीति : सडा संमार्जन चौक रंगमाळीका सूति : निवेदु गुळभेली दाखवीति : तरि तुह्मी एथ मासादीसां पाणीभातु करा : माहात्मे भातु आणिति : (शोधु) भिक्षा करीती : पाणी आणिती’ : ॥ तेंहीं ह्मणीतलें : ‘हो का जी’ : मग बाइसां सांघातें उमाइसें काउळगांवासि भिक्षे जाति : चोखट भातु वेगळा घेति : एरी भिक्षा वेगळी घेति : मग बीढारा एति : माहात्मे भिक्षा करूनि येति : तो चोखटु भातु घेति : मग तें भातु धुति : तिन वेळ : उदकामध्यें चुभळवीति : मग नवां मडकां घालीति : पाणि घालिति : तोंड गुडौनि ठेविति : उदेयाचि एकी झोळीए : भातु निथळत ठेविति : नितळ पाणीं तें वाघारिती : दाट भातवणी त्याची कढी करीति : गोसावी विहरणीहुनि बीजें करीति : पुजावस्वर होए : ताट होए : पहिलें पाणिभाताचा तुपभातु : आणि कढी : ऐसी आरोगण होए : मग पाणिभातु : कालण : ऐसी आरोगण होए : मग पाणिभातु कालउनि : ऐसी आरोगण होए : ऐसी कीतीएक दीस आरोगण ॥

लीळा ३४७ : तथा ढीडरें सुगरणि प्रशंसा
ऐसी कीतीएक दी : आरोगण दीधली : मग एकुदीस : उमाइसीं ह्मणीतलें : ‘नीच कैसा गोसावीयांसि पाणिभातुचि आरोगणा : कांहीं अनारिसें नाहीं’ : ह्मणौनि जोंधळे आपजवीलें : ऐसि आपजवीलीया : सोंडीयेवरि वाटीलें : बाइसातें वेसरू मागीतला : मग सींपणें करूनि ठेविलें : ‘भीडे नाहीं तरि आतां काइसेयावरि करूं’ : ह्मणौनि चिपा मेळवीलीया : तीथरी केली : वरि चीप ठेवीली : तेलाचा बोळा दीधला : ढीडरें घातलें : तें उचडुं बैसलीं : तवं मोडलें : मग नावेक दुख करूं लागलीं : दुसरा बोळा दीधला : ढीडरें घातलें : तवं तें उचडलें : आणि हरिखेली : ऐसीं अवघीचि ढीडरीं केलीं : गोसावी वीहरणीहुनि बीजें केलें : पुजावस्वर : ताट केलें : तेथ ढीडरें वोळगवीलें : तें गोसावी अवलोकीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : मासोपवासीयें सुगरियें असति : तुमचेया उपयोगा जाति ऐसीं असति’ : तवं उमाइसीं ह्मणीतलें : ‘ढीडरें काइसे जी : यें एसोले ह्मणीजेति’ : ‘बाइ एसोले काइ जी : ऐसी घालुनि करिजति : तीयें एसोलें : उडीदां जोन्हळेयाची तीयें ढीडरीं ॥’ :

लीळा ३४८ : तथा सारस्वतकाळ प्रशंसा
एकुदीस : उमाइसें आणि अवडळभट : साजेया लिंगाचिए देउळीए निजैली होतीं : गोसावी परिश्रयो सारूनि उदीयां तेथ बीजें केलें : तवं अवडळभट बैसले असति : उमाइसें निजलीं असति : येल्हंभटीं आसन घातलें : गोसावी आसनीं बैसले : येल्हंभटीं ह्मणीतलें : ‘उमै : उमै : उठि : गोसावी बीजें केलें असें’ : उमाइसें उठीली : यल्हंभटीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग उमाइसीं दंडवतें केलीं : श्रीचरणा लागली : ॥ मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : धायतवं खाइजे : पाहे तंव निजीजे’ : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥

लीळा ३४९ आउभेटि : अस्तीति
आउसें नींबाचीये वींझवासीनीसि धरणें बैसलीं : वींझवासोनी स्वप्न दाखवीलें : ‘गंगातीरा जाए : मग तेथ तुज परिसू सिधैल’ : तैसीचि तीये काउळगांवासि आलीं : उदेयांचि गोरक्ष फोकरिला : कुंभाराचिए शाळेसि पात्र बिढार ठेवीलें : डांगरा तेथ राखण ठेवीला : आपण गंगेचेया घाटासि हात पाय धुवावेया आलीं : एकू पावों धूतला : एकू धुवावा होता : तवं ब्राह्मणु धान्य मागौनि जोगेश्र्वरीकडौनि आला : तो भेटला : तेणें ह्मणीतलें : ‘हां आइ : तुह्मी काइ श्रीचांगदेवो राउळा गोसावीयांची’ : ‘है रे : श्रीचांगदेवोराऊळ ते कवण रे’ : ‘तें काइ तुम्हीं नेणां’ : ‘नेणें रे’ : मग तेंहीं गोसावीयांचे गुणवीसेख सांघीतलें : ‘तरि तुह्मीं गोसावीयाचेया दरिसना जा’ : ‘है रे : कवणें ठाइं असति’ : ‘ना : जोगेश्वरी असति’ : ‘जोगेश्वरी तें कवण रे’ : ‘ना : पैल रूख दीसत असति ते’ : ‘तरि कवणी वाटां जाइजे’ : ‘ना थडिया जाइजे’ : तैसीचि निगालीं : तियें जोगेश्र्वरीसि आलीं : दारवठां उमाइसातें पुसीलें : ‘है रे : पुरुषासि कैसा अवस्वरू असे’ : तेहीं ह्मणीतलें : ‘आरोगण होतु असे’ : तैसींचि जोगेश्र्वरीचिय सोंडीयेवरि बैसलीं : राणेनसीं गोष्टी करूं लागलीं : मग उमाइसीं ह्मणीतलें : ‘जोगिण कैसी चर्बट : गोसावीयांसि दरिसन होए तरि निकें’: तवं गोसावीयांसि गुळळा : आरोगण : वीडा : फोडी वोळगवीलीया : गोसावी मागिली पटिसाळे बीजें केलें : तेथ वेढे करीत असति : बाइसें वीडिया करूनि देतें असति : तवं आउसें दोन्ही देउळां माझारूनि गोसावीयांतें पाहातें असति : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आउदेवी : काइ पाहिजत असिजे’ : ‘जी जी : गोसावीयांतें पाहातें असति’ : ‘ऐसेया येउनि पाहीजतु’ : मग साउमीं आलीं : गोसावीयांतें पाहातें असति : मग गोसावी भितरि बीजें केलें : ओटेयावरि बीजें केलें : आउसीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : पुढां बैसलीं : गोसावी अवलोकीलीं : आणि आउसां स्तिति जाली : करणें सींगणि नादु : यें पांचै करणें प्रकटलीं : अंतरक्ष आसन उडे : नावेत स्तीति भोगीली : भंगली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : आतां बिढारा जाल ना’ : आउसीं ह्मणीतलें : ‘‘पृथ्वी पर्यटन केलें : उकरडा पूंजे भुरू कीसितां जन्म गेलें : स्वप्नीं वींझया ह्मणीतलें : ‘तुं गंगातिरा जाए : मग तुज परिसू सीधैल’ : तो मज परिसू सीधला : आतां कें जाये जी : आतां या चरणाचि पासि बीढार’’: मग गोसावी तेयांतें बीढार पूसीलें : तेंहीं सांघीतलें : मग गोसावी मंडळिकातें मात्रा आणुं धाडिले : नाथोबा मात्रा घेउनि आले : सरिसे डांगोरेश : आउसीं गोसावीया पुढां मात्रा ठेवीली : सीक्षा केली : गोसावी श्रीकरीं मात्रा प्रसादु केला : अवघेया भक्तजनांसि प्रसादु दीधला : डांगरेसासि दीधलें : उमाइसा प्रसादु देत होतें : तियें नेघति : आउसीं ह्मणीतलें : ‘है रे : या श्रीचरणाचां प्रसादें : तुझें आझूनि न फीटे रे’ : गोसावी तेयासि आंवळा दीधला : मग गोसावी श्रीकरें मात्रा सोडीली : तवं दाम सा निगाले : गहुं निगाले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : हे एथीचेया उपयोगा निया’ : देवतें निगालीं : जोगला देवि : रिरिय पितळेची निगाली : तितरिया महुवाचा कृष्णेया नकों सांडुं : हा मज वाट दाखवी’ : गोसावी सांडवीला : तीयचिय मात्रे गहुं : जोंधळे : ऐसे होते : तेयाचां भक्तजनाचा ठाइं उपाहारू केला : गोसावी आपुलेनि श्रीकरें तेयांचिया कानिचिया मूद्रा फेडीलिया : बाइसा करवि दोनि वस्त्रें आणवीलीं : ब्राह्मणी माहात्मी केली : बाइसी गोसावीया पुरता उपाहारू निफजवीला : यरांची दीवसीं केलीं : तेल आणवीलें : गोसावीयांसि सपरिवारीं आरोगण : गुळळा : वीडा : ॥

लीळा ३५० : तथा व्यापारें गंगादृष्टांत कथन
एकुदीस : आउसीं तांदूळा आंतुली आक्षेता हातु घालुनि घेतलीया : दायांबायें ह्मणीतलें : ‘कैसी जोगीण तांदुळां आंतुली अक्षेता हातु घालुनि घेतीए’ : ‘है रे : एथही असतां तुझें न फीटे’ : दाइंबातें सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘गौतमें गंगा आणिली : तें उदक नीगौनि गेलें : कीं : हाडगुदेलेया पापां पूरश्चरण करि : तरि यें एथीचेया जवळिका : काइ एक होईल : काइ आउवेसि इतुलेंहीं नाहीं’ : (हे लीळा : रामेश्र्वरबास) ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP