मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|लीळा चरित्र|पूर्वार्ध|भाग २| लीळा ३३१ ते ३४० भाग २ लीळा १९९ ते २१० लीळा २११ ते २२० लीळा २२१ ते २३० लीळा २३१ ते २४० लीळा २४१ ते २५० लीळा २५१ ते २६० लीळा २६१ ते २७० लीळा २७१ ते २८० लीळा २८१ ते २९० लीळा २९१ ते ३०० लीळा ३०१ ते ३१० लीळा ३११ ते ३२० लीळा ३२१ ते ३३० लीळा ३३१ ते ३४० लीळा ३४१ ते ३५० लीळा ३५१ ते ३५८ भाग २ - लीळा ३३१ ते ३४० प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे. Tags : chakradhara swamilila charitraचक्रधर स्वामीलीळा चरित्र लीळा ३३१ ते ३४० Translation - भाषांतर लीळा ३३१ : लाखाइसां राणाइसां भेटि : क्षेमालिंगन एकुदीस : गोसावीयाचेया दरिसना लाखाइसें राणाइसें आली : गोसावी लाखाइसासि क्षेमालिंगन दीधलें : राणाइसांसि नेदीतीचि : तेंहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : मग तीये रात्रीं व माहालक्षीमीचिया देउळासि गेलीं : तेथ लाखाइसें निजैलीं असति : राणाइसें दुख करीतें बैसलीं असति : तवं गोसावीया पस्यांत पाहारीं बीजें केलें : तेथ पटिसाळेवरि बैसलीं असति : सर्वज्ञें ह्मणीतले : ‘राणाइ : बाइ : वर्तत : असे : इया’ : ह्मणौनि दोन्हीं श्रीकर पसरूनि क्षेमालिंगन दीधलें : क्षेमालिंगन देवों सरलें : तवं लाखाइसें उठीलीं : ‘हें काइ राणाइ : गोसावी बीजें केलें : तरि सांघसि ना : मातें उठविसीचि ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : हे आतांचि आले’ : मग गोसावी तैसेंचि बीढारा बीजें केलें : ॥लीळा ३३२ : ब्राह्मणाचा दधीभातु आरोगणएकु दीस : गोसावीयांचेया दरिसना ब्राह्मणु एकु आला : दधीभातु आणिला : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : बैसलें : मग आरोगणेलागि विनवीलें : गोसावी वीनवणी स्विकारीली : दधीभातु वाढीला : आलें वीसरलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ऐसेनि दधीभातेसीं : आलें कां होए’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘जी : असे : मी विसरलां जी’ : मग आलें वोळगवीलें : आरोगण : गुळळा : ब्राह्मणु निगाला : ॥लीळा ३३३ : नवगावीं उपाहारू : ॥ रात्रीं इंद्रभय प्रश्नुएकुदीस : गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : आसनीं उपवीष्ट जाले : तेया उपरि गोसावी बाहीरि आंगणा बीजें केलें : तव चांदीणें पडत होतें : पासि इंद्रभट होते : गोसावीयां चांदीणें अवलोकीलें : सर्वज्ञं ह्मणीतलें : ‘कैसें चांदणें निर्मळ शुभ्र’:॥ गोसावी इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इतुलेयां वेळां ग्रामांतर किजैल : तरि भियानां कीं’ : इंद्रभटीं ह्मणीतलें : ‘जी जी : गोसावीयांपासि असतां : कैसें भीउनि जी’ : ‘जा : बाइसां करवि आइत करवा’ : मग बाइसीं आइत केली : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : विंझुगा वोहळीं : इंद्रबाचिया खांदावरि श्रीकरू घातला : श्रीकरें पोटीं बोंबीयपासि दाटीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रेया एथौनि तैसोनि तैसें गा’ : तेंहीं ह्मणीतलें : ‘जी जी : एथे देहाची माणुसें मारिजती’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भियाना’ : मग तैसाचि चंद्रु मावळला : इंद्रभट भेवों लागले : थरथरां कापति : गोसावी आपेगावीं ऐलींकडे वोहोळ पातले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भीयाना’ : ॥लीळा ३३४ : श्वानध्वनि अभयदानमग मांउगांवी सूनीं भुंकीनलीं : ते वोहळ गोसावी पातले : वोहळांतु बीजें केलें : तवं इंद्रभट सावेया भेवों लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘भीया ना उगेचि या’ : ॥लीळा ३३५ : नी:कळंकीं वस्तितैसेंचि गोसावी निकळंकासि बीजें केलें : तवं वाति जाति होती : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ वाति आंबूथा : डोइचें तुप घाला’ : बाइसें पुढां गेलीं : वाति आंबूथीली : डोचें तुप घातलें : ॥ गोसावीयांसि वोटेयावरि शयनासन रचीलें : गोसांवीयांसि आसन : बाइसीं चरणक्षाळण केलें : गुळळा : वीडा : पहुड : ॥लीळा ३३६ : प्रातःकाळीं इंद्रभटा सीक्षापणगोसावी पश्र्चांत पाहारीं परीश्रया बीजें केलें : परिश्रयो सारूनि आले : चौकीं आसन : तेव्हळिचि दंतध्वन : उदीयांचि इंद्रभट गंगेसि गेले : संध्या करूनि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘इंद्रया : देवतेसि नमस्कारू केला कीं नाहीं’ : ‘जी जी वीसरला : जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘पोरें हो : आपुला माहात्मा न विसरा देखों’ : ‘जी जी : तें गोसावीयांचें त्यां कैसे वीसरौनि’ : ॥लीळा ३३७ : मंडळिका तिथवारूमग गोसावीयांसि चौकीं पुजावस्वरू जाला : अवघे भक्तजन गंगे गेले होते : ते संध्या करूं करूं आले : परि टिळे न लवीतिचि : गोसावीयांपासि बैसले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मंडळिका : तुह्मी निच या अवघेया टिळा उगाळुनि दीयावा : येथ तीथवारु जाणवावा’ : ऐसा वीधि वीहीला : ॥ मग तेंहीं टिळा उगाळिला : एरि आवघां टिळे लावीले : गोसावीयां पूढां : तिथवारू जाणविला : मग ते दीसवडि तैसेंचि करीति : ॥लीळा ३३८ : वडवाळिये अवधुताचें भिक्षान्न आरोगणमग तीये दीसीं वडवाळिये ऐलीकडे : निंबायासि गोसावी उभे राहीले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘अवधुता : मढीएची खापरी : नगरीं भीक्षा कां कीजे ना’ : ‘हो जी’ : मग नावेक पुढारें बीजें केले : मग ह्मणीतलें : ‘अवधुता : ब्राह्मण ब्राह्मण असति’ : ‘जी जी : तें मी जाणत असे’ : मग ते तैसेचि भिक्षे गेले : आपुलें आवरण केलें : मढीयेचें पात्र घेतलें : मग नगरामध्यें भिक्षा करूं निगाले : तवं गोसावी मळेयासि बीजें केलें : मळां आसन : गोसावीयांसि पुजावस्वर : तवं अवधुत भिक्षा करूनि आले : गोसावीयां पुढां पात्र ठेवीलें : गोसावी अवलोकिलें : भिक्षेसि आंबीलभातु : दीवसी : भाकरि : तरि लोणसणें : ऐसें आलें होतें : तें गोसावी अवलोकिलें : मग ह्मणीतलें : ‘अवधुता मिठ असे’ : ‘ना जी : मीं मागों विसरलां : जी जी : आतां आणुं जाइन’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘तें तेव्हळिसीचि मागिजे कीं’ : मग गोसावी इंद्रभटातें ह्मणीतलें : ‘इंद्रेया आपुली उंडी : उगुमुगु कां साराना’ : मग ते गंगेसि गेले : गंगेचां काठीं देउळ होतें : गोसावी इंद्रबातें ह्मणीतलें : ‘उगुमुगु’ : ह्मणौनि भिक्षान्नाचिया हेतु पुसिलें : मग बाइसीं पदार्थुं निवडुं आदरिला : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : कोरके नको : निवडुं कालवा’ : मग बाइसीं बहीरवासावरि काला केला : मिठ घातलें : मग आवघे वाटे केले : गोसावीयांसि अर्धवाटा ताटीं वोळगवीला : अर्ध ठेवीला : अवघेया भक्तजनां वांटे दीधले : प्रसादु केला : अवघेया प्रसादु दीधला : आधीं प्रसादु घेतला : मग जेउं लागले : इंद्रभट प्रसादें घांसू घोळती : मग जेवीति : जेवीत प्रसादु सरला : मग उगेचि होते : गोसावी पालमांडें तेयाकडे घातलें : मग पालमांडा घासु घोळिति : मग जेवीति : ऐसी गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : पहुड : उपहुड : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥लीळा ३३९ : मार्गी गोपाळभोजन दाखवणें मार्गी बीजें करीतां गोसावी तें सेत पावलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हें तुम्हां एथौनि गोपाळभोजन दाखवीजैल : कोळवी कुसंबी : ते चणेन घोळुनि आणा’ : मग शेतीं आसन : तेंहीं घोळुनि आणिली : गोसावीयांसि एका मांडखुंतीएवरि आसन : एकु श्रीचरणू उकडू पुढें केला : सोडीला : डावीए श्रीकरीं काला : उजवीए श्रीकरीचीया आंगुळाचिया संदीं कुसुंबीये तीखीयेचे ढेंसे धरिले : आंगुठेनि घांसु घेति : तैसाचि कुसंबीय : तीखीयचा घांसू घेति : आणि गोपाळाचेनि आनुकारें : च्यारी दीसा पाहाति : ऐसी गोसावीयांसि आरोगण : गुळळा : वीडा : आणि गोसावी तेथौनि बीजें केलें :॥लीळा ३४० : पैठणीं त्रीपुरुखीं काको कपाट देउनि व्रतीतेथौनि गोसावीयांसि पैठणीं त्रीपुरुखीं वस्ती जाली : गोसावी रात्रीं बीजें केलें : तवं देउळीची वाति जाति होती : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : वाति आंबूथा : डोइचें तुप घाला’ : मग बाइसें भितरि गेली : वाति आंबूथीली : डोइचें तुप घातलें : गोसावीयांसि आसन : काको भितरि होते : कांबळेनिसीं : तो वातां कांबळा सीरकला : तें कवाड पडीलें : तें काकोसीं मुर्च्छा आली : ‘काकोवरि कवाड पडिले’ : ह्मणौनि भक्तजन धाविनलें : गोसावी तेथ बीजें केले : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ बटो दुखवलेति : सावेया दुखवलेति’ : वेळां दों ह्मणीतलें : गोसावी तेयाची पाठि श्रीकरें स्परिशीली : तेयाचें दुख होते ते निवर्तलें : ॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP