मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|लीळा चरित्र|पूर्वार्ध|भाग २| लीळा २९१ ते ३०० भाग २ लीळा १९९ ते २१० लीळा २११ ते २२० लीळा २२१ ते २३० लीळा २३१ ते २४० लीळा २४१ ते २५० लीळा २५१ ते २६० लीळा २६१ ते २७० लीळा २७१ ते २८० लीळा २८१ ते २९० लीळा २९१ ते ३०० लीळा ३०१ ते ३१० लीळा ३११ ते ३२० लीळा ३२१ ते ३३० लीळा ३३१ ते ३४० लीळा ३४१ ते ३५० लीळा ३५१ ते ३५८ भाग २ - लीळा २९१ ते ३०० प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे. Tags : chakradhara swamilila charitraचक्रधर स्वामीलीळा चरित्र लीळा २९१ ते ३०० Translation - भाषांतर लीळा २९१ : नांदौरीं आदीतीं अवस्थानमग गोसावी नांदौरा बीजें केलें : आदीत्यीं अवस्थान : दीस अठरा जालें : पीवळदरडी मांडौ घालवीला : तेथ वीहरणा बीजें केलें : ॥लीळा २९२ : सामको पुत्रत्व : ॥ आरोगण सामकोचा पुत्रू सरला होता : तो त्यांसि करजाळां स्वप्नीं आला : ते ह्मणति : ‘बाइ : मज जेउं सूवो कां’ : तीहीं ह्मणीतलें : ‘काइ जेउं सूंरे बा’ : ‘ना : दहीं भातु जेउं सू’ : मग ते साडेगावां आलीं : आबौसां पुढें सांघीतलें : आबैसीं ह्मणीतलें : ‘गोसावीयांसि आरोगणा दे : इतुलेनि गोसावीयांजवळि नांदौरा आलीं : उपाहारू आणिला : गोसावी वीहरणौनि बी केलें : भेटि जालि : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागली : मग आरोगणे लागि विनवीलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : तरि तुमचेया पूत्रा होआवें’ : तीहीं ह्मंणीतलें : ‘हें काइ जी : असें कैसें’ : ‘कां पां : तुमचेन पूत्रें तुमतें स्वप्नीं जेउं मागीतलें : तुह्मीं यांसि जेउं सूत असा : तरि हें तुमचें पुत्र होइल कीं’ : मग गोसावीयांसि ताट केलें : दधिभातु उन्हें तापला आला : तो वोळगवीतिचि ना : आरोगण करीतां गोसावी पूसीलें : ‘जी जी : दधिभातु उन्हें तापला : तो कीं नासीला जी’ : सर्वज्ञें ह्मणीतले : ‘बाइ : आणा’ : तेहीं वाढीला : गोसावी प्रसादु केला : (शोधु) नांदौरीं सामको : उमाइ : पटिसाळे चरणक्षाळण : वीहरणौनि उपाहारू : ॥लीळा २९३ : काळदासभटां मधमोदवाटकाळदासभट पिवळदरडी निवांत बैसले असति : तेथ गोसावी बीजें केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ भटो कवणी ठाइं असा’ : ‘जी जी : सूखमनेचां मुखीं असों : सूखमुनेचा पोटीं’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘सूखमना मुखींचीं कार्ये : त्यें काइ ऐसीं : त्यें ऐसीं होआवीं कीं’ : तीहीं म्हणीतलें : ‘जी जी : त्यें कांहीं देखों ना’ : ‘तरि कैसे असा सूखमनेचां मुखी’ : ‘ना जी : नसति’ : ‘तरि कैसे सूखमनें मुखीं असे’ : तैसेचि स्तीति भंगली : उठीले : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले ॥लीळा २९४ : तथा पैशून्यकाळदासभटांचि लेंकि हातरीती नी ते धाकूटी : ते पासि आले : ते बाइसासि कांहीं ह्मणीयें व्यापारू करूं लागति : बाइसें तेयांसि कांहीं ह्मणियें देति : मग बाइसें ह्मणति : ‘बटीकी : बाबा निके : बाबापासि असावें : बाबाची सेवा करावी : बाबापासौनि कांही गोमटें होइल’ : ऐसें बाइसीं ह्मणीतलें : मग तेंही काळदासभटा पुढां सांघीतलें : तेंहीं ह्मणीतलें : ‘कां राहावीति ना : देखीलिसि तरूणि धारी : तरि राहाविति ना : या माहात्मेयाचे तें ऐसेंचि कीं’ : पैशून्य बोलों लागले : पैशून्य बोलति जवं जवं तवं तवं स्तीति होए : सूखचि होए : मग स्तीति भंगली : उदीयांचि गोसावीयाचेया दरिसनां आले : गोसावीयासि गुळळा होत असे : जवळीकें इंद्रभट असति : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : आणि ‘इंद्रभटो : आमचे गोसावी साक्षात श्रीकृष्ण चक्रवर्ति : आराधीतां मूक्ति : कां वीरोधीतां मूक्ति’ : इंद्रभटीं गोसावीयां पुढें सांघीतलें : गोसावी उगेचि होते : ॥लीळा २९५ : राणाइ पीते दधिभातराणाइसें आणि राणाइसाचे पीते गोसावीयांचेया दरिसनांसि आलिं : उपाहारू आणिला : गोसावीयांसि पीवळदरडी आसन : भेटि जाली : दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : गोसावीयांसि आरोगणेलागि वीनवीलें : मग गोसावी बीढारा बीजें केलें : गोसावीयांसि पूजावस्वर जाला : बाइसीं ताट केलें : दधीभातु वाढीला : आरोगण जाली : ॥लीळा २९६ : नंदेश्र्वरीं दादेया भेटिएकुदीसीं गोसावी नंदेश्र्वरा बीजें केलें : तवं दादा एकू तेथ रांगवळी भरित होता : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘काइ भटो : रंगमाळिका भरित असा’ : ‘जी जी’ : मग भेटि जाली : श्रीचरणा लागले : तेथ गोसावीयांसि आसन : ॥ (हे लीळा : रामेश्र्वरबास)लीळा २९७ : गेउरवावीएसि जोगेश्र्वरीसि वसति : पीसाचीका प्रतिमग तेथौनि गोसावी गेउरवाविए बीजें केलें : जोगेश्र्वरी वसति जाली : गोसावीयांसि चरणक्षाळण : पटिसाळे उजवेयाकडे आसन : पुजा अवस्वरू : भितरिली चौकीं उदेयाचां पुजा अवस्वर जाला : गोसावी : आंगीं टोपरें लेउनि : आसनीं उपवीष्ट असति : तव पीसी एकि आली : हातीं वनें : भितरि गेली : देवतेचिए डोइए वरि वनें ठेविलें : दीवेयाचेनि तेलें आपुलें तोंड पुसीलें : डोइ उजु केली : कोळसेयाचें काजळ केलें : तें काजळ डोळां सूंदलें : देवतें सेंदूर कपाळीं लावीलें : निर्मालु डोइए खोवीला : आणि एसी मूरकैजे : खोलइजे : मग ह्मणीतलें : ‘देवव्हो : मीं तुमतें बोळवीत एइन : देया पोतें’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘द्या : बाइ : पोतें : जाडि वोपा’ : मग बाइसीं जाडि : पोतें : दीधलें : मग गोसावी बीजें केलें : पुढे पुढे चाले : आणि माघौती उभी राहे : नावेक क्षोभैजे : माघौती पुढे जाए : आणि उभी राहे : ऐसी अर्धी एक वाट आली : मग ह्मणीतलें : ‘देव व्हो : आतां मी नैएं : आपूले घेया पोतें : तें मियां तुमतें झांकवीलें : (तथा) चाळवीलें कीं’ : ‘तें जाणीजैल कीं’ : मग भक्तजनीं मात्रा घेतली : ‘देव व्हो : आतां मीं जाइन’ : गोसावी अनोज्ञा दीधली : ॥लीळा २९८ : पींपळगांवीं आरोगणबारसीचां दीसीं : गोसावी पींपळगावां बीजें केलें : मलां पींपळातळि आसन : बाइसें मुख्य करूनि सकळे भक्तजनें बारसीची भीक्षा करूनि आलीं : बाइसीं गोसावीयांसि पुजावसर केला : गोसावीयांसि आरोगण : भक्तजना जेवणें जालीं : गोसावीयांसि गुळला : वीडा : मग गोसावी तेथौनि बीजें केलें : ॥लीळा २९९ : धाबां आरोगण : उपाध्यां डोणि पाहों धाडणेंमग गोसावी खांबगावां आले : धाबां पहुड : उपहुड : तवं दोणि न रिगे : मग गोसावी उपाध्यातें ह्मणीतलें : ‘बटिका : दोणि पाहा जा’ गेले : ‘जी जी : दोनि पैलाडि गेली’ : मग गोसावीयांसि तेथ आरोगण : गुळळा : वीडा : पुडुती सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बटिका : दोणि पाहा जा’ : मग उपाध्ये गेले : ते टेकावरि बैसोनि देनि रिगतां पाहाति होते : दोनि रिगाली : इतुलेनि सांघों आले : गोसावीयां पुढां सांघो आले : मग गोसावी बीजें केलें : गोसावी दोनि बैसले : भक्तजनें बैसलीं : तेहीं दोनि आवलिली : मध्यें पातली : आणि तेंहीं तागा घालौनि नावेक मध्यें दोनि राहावीली : मग थडीए लावीली : मग दोणि वरूनि उतरले : आवघीं भक्तजनें उतरलीं : गोसावी तेयांसि उचीतां आले : गोसावी बाइसा पासौनि पूंडवाटूवा मागितला : पुडवाटुवा आपुलेनि श्रीकरें तेयांचिए वोंटीए झाडौनि रिचवीला : ॥लीळा ३०० : ताएश्र्वरीं आसन : पानेश्र्वरीं वसतिमग गोसावी तायेश्वरा बीजें केलें : चौकीं नावेक आसन : तैसेंचि गोसावी नादेयाचेया साजेया कडौनि पानेश्र्वरां बीजें केलें : चौकाचां नृत्यकोणीं वोटा : तेथ वस्ति जाली : बाइसीं रात्रीचां पुजावसर जाला : मग बाइसीं तांदुळ वेळीले : दुध आणिलें : मग गोसावीयातें व्याळियेलागि वीनवीलें : गोसावीयासि व्याळियचि प्रवृत्ति नाहीं : मग बाइसीं भातांतु दुध घातलें : ताकाचें बोट लावीलें : दहीं करंबा केला : मग रात्रीं वोटेयावरि पहुड ॥ N/A References : N/A Last Updated : June 27, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP