अंगाईगीते - निरोप

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


निरोप
बाळाचे हाती गुळगुळ काठी
बाळू रं मेंढरापाठी
हाकलली मेंढरं जाऊंदे वाटं
ब ब ब बोरीचे काटं
निरोप धाडावा बाबासला
बाबा रं बिगीनशी येवा
निरोप धाडावा आईसला
आई गं बिगीनशी येवा

निरोप
बाळाच्या हातात गुळगुळीत काठी
बाळू गेला आहे मेंढरांच्या पाठी
हाकललेली मेंढरे सरळ जातात वाटेने
पण....बापरे! इथे तर टोचताहेत
ब....ब....बोरीचे काटे.
बाबांना निरोप पाठवा-लवकर ये
आईला निरोप पाठवा-लवकर ये

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP