-
Price. 2 Worth or value, lit. fig. In that accommodation of this sense indicated by such words as Importance, consequence, significance, moment, weight, estimation, regard, consideration &c. numerous words are in constant use: e. g. कथा, केवा, लेखा, पाड, किम्मत, मजकूर, मदार, मामलत, मुजाखा, बिशात, बखा, प्राप्ति, प्राज्ञा. Neg. con. or, if interrogative, with neg. implication.
-
स्त्री. १ मोल ; मूल्य ; बदल द्रव्य ; भाव ; दर . २ ( शब्दश ;) योग्यता ; महत्त्व ; पर्वा . ' फिर्यादीची आम्ही कांहीं एक किंमत समजत नाहीं .' - विक्षिप्त ३ . १६५ . ' प्रक्षेपकाचें हें एक मत म्हणुन तरी त्याची कांहीं तरी किंमत असणारच . ' - मसाप २ . २ . १२८ पुढील शब्दाहि प्रश्नार्थक किंवा निषेधार्थक वाक्यांत याच अर्थी वापरतात - कथा ; केवा ; लेखा ; पाड ; प्राप्ति ; प्राज्ञा ; बखा ; बिशांत ; मजकुर , मदार , मामलत , मुदाखा . ( अर . कीमत ) ( वाप्र .)
-
०चुकावणें सक्रि . मोल चुकतें करणें , देणें , भागविणें . सामाशब्द -
-
०कापणी स्त्री. दुसर्यापेक्षां आपण स्वस्त देतो असें एक व्यापार्यानें दुसर्यासंबंधानें सांगणें ; भाव बिघडविणें . - के ३ . १२ . २९ .
Site Search
Input language: