मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| आरती पहिली श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - आरती पहिली प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ आरती पहिली Translation - भाषांतर (चाल-सुखकर्ता........)जयदेव जयदेव जय स्वामीराया ।अक्कलकोटनिवासी स्वामी यतिवर्या ॥धृ॥तप्त सुवर्णापरि बा दिव्य तुझी कांती । सरळ नासिका शोभे, नेत्र हिरे गमती । दिव्य तुझे दर्शन दे सुजनां विश्रांती । दुर्जन बघता तुजसी अष्ट दिशा पळती ॥जयदेव जयदेव.....अक्कलकोट...... ॥धृ॥१॥गंध केशरी शोभे तव निटिलावरती । कर्णकुंडलासम ती रुद्राक्षे डुलती ।माला रुद्राक्षांची कंठी विलसे ती ।ध्यान मनोहर ऐसे बघता जन रमती ।जयदेव जयदेव.....अक्क्लकोट..... ॥धृ॥२॥प्रसन्न मुखचंद्राचे तव दर्शन घडतां ।शतजन्मांचे वाटे सार्थक होय अता ।अजानुबाहू मूर्ती दिव्य तुझी बघता ।हर्ष न माये ह्रदयीं, पद वंदन करिता ।जयदेव....अक्क्लकोट.... ॥धृ॥३॥प्रसाद तव करिचा कीं लाभावा म्हणुन ।अधिर जाहला आहे देवा भक्तगण ।प्रेमभरे करिती तव आरति आर्तजन ।दीनदयाळा सकलां द्या आशिर्वचन ।जयदेव जयदेव....अक्कलकोट.... ॥धृ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP