मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| अध्याय अठरावा श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - अध्याय अठरावा प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ अध्याय अठरावा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । प्रल्हादाय नमोस्तुते ॥१॥गताध्यायीं वाचिले आपण । समोर येता आर्त यवन । समाधिसुख तया देउन । चकित केले योगेश्वरे ॥२॥श्रीपादभट्ट शास्त्रीसी । जावया सांगती काशीसी । शिरसावंद्य त्या आज्ञेसी । मानुनी केले गमन तये ॥३॥तिकडे जाताचि द्विजवर्य । लेखिती तुच्छ सर्व । विद्यामदे पंडितां गर्व-। अनिवार जाहला होता की ॥४॥अंतरीं श्रीपाद उदासले । वाटे येणे व्यर्थ केले । तेथले पंडित भुजंग गमल । गर्वोक्तिविषे भयंकर ॥५॥नको वाटले राहणे तयां वाटले जावे परतोनिया । मिळणार काय ते शिकावया । वैतागले ते अत्यंत ॥६॥जाणुनी तयांची अंतःस्थिती । काशींत यती प्रकट होती । भक्तरक्षणा उडि घालिती । भक्ताभिमानी योगेश्वर ॥७॥पंडितांचा ज्ञान-गर्व । भक्ताकरवी हरविला सर्व । शास्त्रीबुवांसी शरण सर्व-। जाउनी म्हणती क्षमा असो ॥८॥कार्य होता पावले गुप्त । वैराग्यपूर्ण ते अनासक्त । भक्ताकाजा प्रकटले फक्त । समर्थ ऐसे कनवाळू ॥९॥समर्थासी वंदुनी आता । सिद्ध होऊ वाचण्याकरितां । वाचता, ऐकता हरती व्यथा । कथा अत्यंत मनोहर ॥१०॥राज्य असता इंग्रजांचे । एक सरकारी बडे साचे-। अधिकारी ते प्रज्ञापुरीचे । नांव तयांचे बंबगार्डन ॥११॥प्रशस्त ऐशा बंगल्यांत । गावाबाहेर । अति सुखात । नोकर-चाकर बहुत असत । कुटुंबवत्सल होते ते ॥१२॥ वृत्तिने होते अति उदार । गरिबां करिती साह्य थोर । वाणी तयांची गोड फार । लोकप्रिय ते प्रज्ञापुरीं ॥१३॥निज उद्यानीं सहज फिरता । विखार पायांस ते डसता । दंशभार्गी स्वये चिरता । रक्त भळभळा वाहतसे ॥१४॥जखम जाहली ती विषारी । दुःख भोगिले तये भारी । वदले तयासी कोणीतरी । श्रीस्वामींसी शरण रिघा ॥१५॥पाण्यापरी खर्चिला पैसा । गुण येईना हवा तैसा । दुर्दैवाचा पडे फासा । म्हणे सुटावे कैसे तरी ॥१६॥येवोनि अत्यंत काकूळती-। विनंती करी एकास ती । तुमच्या स्वामींस सांगा स्थिती । नष्ट करा ही महाव्यथा ॥१७॥स्वामींस सांगावया जाता । समर्थ त्यासी वदती स्वता । सायबा सांगा सोड चिंता । सांगतो तो उपाय करी ॥१८॥कडुनिंबाचे घेउनी खोड । उगाळोनी लेप जाड-। लाविताची दिसेल गोड । परिणाम त्याचा सत्वरी की ॥१९॥त्वरित कारिता हा उपाय । आश्चर्य घडले पहा काय । दोन दिवशीं तो अपाय-। नष्ट जाहला सर्वस्वी ॥२०॥हर्ष अत्यंत तया झाला । म्हणे दर्शना जाणे मला । वंदितो त्यां महात्म्याला । दुःख जेणे निवारिले ॥२१॥गाडी-घोडा नको काही । चालत येतो तिथे पायीं । दर्शन होता पडॆ पायी । सर्व सांडुनी अभिमान ॥२२॥ गुलाबांचा हार घाली । फळे-मिठाई ती अर्पिली । संकटीं जाहला तुम्ही वाली । ऋणी आपुला नित्य असे ॥२३॥ बंबसाहेब जाहला दास । स्वामींवरी दृढ विश्वास । स्वामिदर्शनां त्यां उल्हास । सदासर्वदा वाट तसे ॥२४॥समर्थाचे सामर्थ्य थोर । कथा असती त्या अपार । त्यांतील एक ऐकता फार-। वाटेल आनंद चित्तासी ॥२५॥अक्क्लकोटीं मुका पोर । भिक्षा मागुनी भरी उदर । यतिदर्शनी ओढ फार-। होती अत्यंत त्याजला ॥२६॥सांज सकाळीं मध्यान्हकाळीं । येइ दर्शना वेळीं-अवेळीं । येता सहर्ष वाजवी टाळी । नाचे समोर स्वामीच्या ॥२७॥नांव मन्याबा असे त्याचे । खुणा करोनी कथी साचे । प्रेम त्यावरी समर्थाचे । वाटे सर्वासि आश्चर्य ॥२८॥नभीं देखता मेघ थोर । नाचे जैसा वनीं मोर । स्वामीसं बघता मुका पोर । थयथया लागे नाचाया ॥२९॥स्वामींस वाटे अति कौतुक । बघती त्याकडे सहेतुक । बोल बोलरे शब्द एक । स्वामी तयासी खूणाविती ॥३०॥खूणा करोनी श्रींस सांगे । देव मजला वाचा न दे । दया मजवरी करावी गे । साश्रु नयने नमिले पदां ॥३१॥ ह्रदयीं द्रवले दयाघन। कानें सांगती शब्द दोन । श्रीगुरुदेव दत्त म्हणुन । सांगती त्या भजन करी ॥३२॥लोक हासले पहा जेव्हा । महदाश्चर्य घडे तेव्हा । मुक्या मुखीं प्रकटले तेव्हा । शब्द गुरुदेव दत्त हे ॥३३॥माधवाची कृपा होता । मुक्यासि येई वाचाळता । योगेश्वरांची अशी सत्ता । प्रख्यात आहे सुभाषित ॥३४॥ऐसे सामर्थ्य स्वामींचे । प्रत्यया आले जनां साचे । वर्णू जाता गुण तयांचे । शतमुखांचा शेष शिणे ॥३५॥वाचू आता अद्भुत कथा । महाशास्त्री काशींत होता । बहिरेशास्त्री ’ वदे जनता । होते अत्यंत विद्वान ॥३६॥न्याय-नीती अनुसरोन । नित्य जीवनीं धर्माचरण । लोक त्यासी आदरे करुन-। नमस्कारिती सप्रेमे ॥३७॥वाराणशीचे मान्यवंत । प्रसिद्ध होते ते धनवंत । सर्व होते यथास्थित । परंतु नव्हते संतान त्या ॥३८॥नागबलीदी सर्व करुन । अखेर जाहले त्या संतान । पुत्र जाहला प्राप्त म्हणुन । पेढे वाटिले सर्वासी ॥३९॥सुलक्षणा हा पुत्र दिसत । पत्रिका याची करा त्वरित । भविष्य पाहू की समस्त । प्रेमानंदे भार्या वदे ॥४०॥ज्योतिषशास्त्रांत निष्णात । पंडित वसे वाराणशींत । अति उत्साहे त्याम दावित । जातक याचे वर्तवावे ॥४१॥ज्योतिषी लक्षिता ती पत्रिका । जाहला तयाचा चेहरा फिका । म्हणे आताम विचारु नका । पुढे पाहू केव्हातरी ॥४२॥निर्विद्य अथवा विपन्नता । होणार जे ते सांगा आता । वृथा लाविता मना चिंता । सांगाचे मातें असेल ते ॥४३॥तयाचा होताचि निरुपाय-। सांगण्या विना ना उपाय । म्हणे अर्भका असे भय । होणार अत्यंत अल्पायुषी ॥४४॥हायरे दैवा ऐसे कसे । बालके मातें दिधले असे । आता पुढे मी करु कैसे । उपाय सांगा काहीतई ॥४५॥गंगाकिनारी घाटावरी-। असे साधू त्या विचारी । कृपा केलिया तुम्हांवरी । उपाय काही सांगेल ॥४६॥निराशेमधीं दिसे आशा । दया करी गा हे जगदीशा । मिळो मजला मार्ग ऐसा-। जेणे चिंता नाश पावे ॥४७॥साधूस भेटता दंडवत । कर जोडूनी नम्र होत । म्हणे ऐकणे मनोगत-। माझे आपण महामुनी ॥४८॥दुःख आपुले वदा काय । असल्या सांगतो मी उपाय । घ्यावी न आपण मनीं हाय । मुक्तपणे ते सांगावे ॥४९॥पंडिता येतसे गहिंवरुन । दैवे लाभला पुत्र छान । अल्पायु तो असे म्हणून । ज्योतिषमार्तड सांगती ॥५०॥ऐकता गेले धैर्य खचुन । एकले म्हणे हे संतान । संकटी ऐशा रक्षील कोण । सांगा मातें महामुने ॥५१॥श्रवण करिता मुनी वदले । कलियुगीं या समर्थ असेल-। साधु-संत ते दुर्मीळ झाले-। आठवे महात्मा एक परी ॥५२॥अक्कलकोटीं त्वरित जावे । समर्थचरणीं सर्व भावे । शरण जावोनि विनवावे । ह्रदरोग आपुला हरावया ॥५३॥ते तो प्रत्यक्ष जगदीश्वर । सत्ता त्रिलोकीं असे थोर । त्यांचे समान अवनीवर । ज्ञात दुजे ना मज कोणी ॥५४॥क्षुधार्ता मिळता गोड अन्न । तृषार्ता मिळता शीत जीवन । मृतासि मिळता संजीवन । वार्ता तैसी ही पंडिता ॥५५॥हर्षातिरेके वंदोनिया । म्हणे दवडणे वेळ वाया । स्त्री-पुत्रासह निघे जाया । स्वामिदर्शना प्रज्ञापुरीं ॥५६॥नारायणराव हर्डीकर । प्रज्ञापुरीं जयांचे घर । पुत्र-पत्नीसह द्विजवर । गृहीं तयांचे उतरले हे ॥५७॥नित्य नेमे दर्शना जाती । गोष्ट काढण्या परि न धजती । जप-तप पारायणे करिती । गुरुचरित्र नी हरिनाम ॥५८॥दिवस तयांचे असे जात । चिंता परी ना व्यक्त करित । हर्डीकर त्यां धीर देत । योग्य समयीं पुसू तया ॥५९॥करुण घटना एक घडली । गुरुवारच्या प्रभात काळीं । गोड बालका मूर्च्छा आली । पडे धरणीस निःश्चेष्ट ॥६०॥माते फोडिला हंबरडा । शास्त्री जाहला पिसा-वेडा । काळें उघडिला जणू जबडा । वाटे बालका गिळायासी ॥६१॥बाळ ठेविला स्वामींपुढे । म्हणती तीळ द्या मला थोडे । तीळ-शर्करा तोंडी पडे-। स्वामिहस्ते बालकाच्या ॥६२॥अरे बालका ऊठ ऊठ । सकाळ झाली पहा नीट । खेळावयाचा रे परिपाठ । विसरलासि का तूं आजीं ॥६३॥हांक ऐकता यतिवराची । झोप उडाली जणू त्याची । आई, आई म्हणोनि साची । हांक मारिता भयग्रस्त ॥६४॥काळा काळा बुवा एक । ओढिता घाली मला धाक । रडला तरी मारीन खूप । म्हणोनि मारी मज धपाटा ॥६५॥हेचि बोवा आले तिथे । मला धरोनी एक होते । काळ्या बुवा मारिता लाथे । मला सोडोनि तो पळे ॥६६॥मातेस बाळे घातली मिठी । बोलती तेधवा जगत्पती । काळाचिये हाणुनी पाठी । बाळासि तुमच्या सोडविले ॥६७॥पुत्रासवे या निश्चिंत । असावे तुम्ही जीवनांत । ऐसे वदताच भगवंत । हर्षास त्यांच्या पार नुरे ॥६८॥मिठी घालोनी श्रीचरणा । स्फुंदता वदती जगजीवना । अघटित करणी करुणा घना । धन्य, धन्य हो विश्वेश्वरा ॥६९॥जन्मोजन्म आसरा द्यावा । आमुचे मागणे हेचि देवा । ठेवितो चरनी शुद्ध भावा । विकल्प बाधो न कल्पांती ॥७०॥मृतपुत्रा उठविता यती । अवघे जाहले कुंठित मती । पांडवकाळीं रुक्मिणी पती । जेवि उठविती परिक्षिता ॥७१॥आनंद जाहला सर्वत्र । गुणगान चाले मनीं मात्र । परतोनि जाता स्थलाप्रत । म्हणती यतिवर्य परमेश्वर ॥७२॥साधुनिंदा ही अनिष्ट-। केलिया येई की अरिष्ट । पुढिल कथा वाचणे इष्ट । स्पष्ट आपुल्या हितास्तव ॥७३॥मोगलाईत बीड गाव । तिथे नांदे श्रीमंतराव-। गुजराथी तो विप्रराव । नाम नारायण त्याचे ॥७४॥एके दिनीं यात्रिक एक । कर्मठ परी अतिभाविक । हिंडता लागली तया भूक । नारायणाचे ये गृहीं ॥७५॥नारायणाते नमस्कारुन । घालून बैसला स्थिरासन । कोण कोठचे हो आपण । प्रश्न नारायणे केला ॥७६॥तीर्थाटना जात असतो । देव-देवतार्चना करितो । पोथ्या, पुराणे यांत रमतो । सदा सेवितो संतांसी ॥७७॥देवतांची जागृत स्थाने-। पाहुनी पूजितो प्रसन्न मने । असार संसारांत रमणे । हे न वाटे उचित मला ॥७८॥करावा सदा संतसंग । नित्य गावे ते अभंग । सिद्ध महात्मे भेटता रंग-। येत असे निज जीवना ॥७९॥काल पाहिले सिद्ध पुरुष । साम्यर्थ्य त्यांचे अलौकिक । गमन त्रिलोकी हे विशेष । अवश्य जाणे दर्शनासी ॥८०॥उपहास करोनी नारायण । वृथा वर्णिता सिद्ध म्हणुन । पोटार्थी हे पुरुष असुन । नागविती की लोकांसी । ॥८१॥ध्यान ठेवोनि द्रव्यावरी । वर्तती हे दुराचारी । दर्शना येती जधी नारी । गोड भाषणे भुलवीती ॥८२॥संत-साधु हे थोतांड । अलिकडे माजले फार बंड । दिला पाहिजे उग्र दंड-। यांसी समस्त लोकांनी ॥८३॥संत कसले होते जंत । सावध असणे तुम्ही पंत । फसल्यावरी कराल खंत । यास्तव सारे सांगतसे । ॥८४॥पंढरपुरीं नी प्रज्ञापुरीं । लबाड लुच्ची मंडळी भारी । यांच्या रुपे अवतार धरी- म्हणे ईश्वर या लोकीं ॥८५॥यात्रिक वदे थांबवा निंदा । नका पडू हो अशा फंदा । प्रार्थितो मी तुम्हा बंदा-। संत साधुचा सुनिश्चये ॥८६॥तुम्ही यात्रिक भ्याड दिसता । खो, खो हांसे असे वदता । बोंब ठोकुनी अशा संतां । खुशाल सांगा उच्चस्वरे ॥८७॥दुःख वाटले यात्रिकासी । पाणी न पिणे या स्थलासी । त्यजोनि गेला त्या गृहासी । नमस्कार ना केला तये ॥८८॥नसे भोजन ना जलपान । यात्रिक गेलाही निघोन । उं: म्हणोनी नारायण । निघोनि गेला अंतर्गृहीं ॥८९॥तदनंतरी काळ जाता । प्रसंग उद्भवे पहा आता । स्त्रीचे तयाच्या दिव भरता-। प्रसूति वेदना होती ना ॥९०॥आज उद्या असे करिता । दिवस वरी फार जाता । उदरीं वेदना असह्य होता । व्योकूळली ती अत्यंत ॥९१॥असह्य कळा बघवती ना । घाम फुटला नारायणा । म्हणे धावरे दयाघना । सोडवि आतां लवलाही ॥९२॥उपाय करिती लोक नाना । परंतु कोणा यश येइना । सोसवती ना तिज यातना । प्राण जातसे की वाटे ॥९३॥नारायणाचा धीर सुटला । अखंड करी प्रार्थनेला । प्रमाद असला जरी घडला । क्षमा याचितो भगवंता ॥९४॥गाभण्या गायीस ताडियले । क्षुधित विप्रासि घालाविले । मुक्या मुलासी चटके दिले . केला पातके काय तरी ॥९५॥अल्पही ना मना शांती । तळमळ लागे जिवासी ती । तोंच आठवे तया चित्तीं । व्यर्थ निंदिले यतीश्वरा ॥९६॥देवाधिदेवा योगेश्वरा । प्रज्ञापुरीच्या सिद्धेश्वरा । साष्टांग वंदितो सर्वेश्वरा । अपराधांची क्षमा असो ॥९७॥करणार नाही कदा निंदा । संतमहंतांची गोविंदा । कर जोडूनी चरणारविंदा । शरण येउनीं प्रार्थितसे ॥९८॥अपराध माझे घाल पोटीं । ठेवू नकोरे मज हिंपुटी । पश्चात्तापे असे कष्टी । शरणागतासी अभय असो ॥९९॥पुत्र मातें जाहला जरी । आणीन तयातें प्रज्ञापुरीं । घालीन आपुल्या चरणांवरी । दक्षिणा पेढे अर्पीन ॥१००॥नवस बोलला नारायण । समर्थाचे करोनि स्मरण । जाता पुढे दिवस दोन । आनंदायी घटना घडे ॥१०१॥गुरुवारच्या उषःकालीं । पत्नीं तयाची प्रसूत झाली । पुत्ररत्ना ती प्रसवली । वार्ता पसरली सर्वत्र ॥१०२॥नारायणासी तदा वाटे । स्वर्ग उरला दोन बोटे । आकाश पदतलीं तया वाटे । हर्षसागर उचंबळला ॥१०३॥पतिपत्नीने बेत रचिला । पुत्रोत्सवाचा थाट केला । भाग्यरवी हा की उदेला । वदे सर्वास आनंदे ॥१०४॥केले तये मिष्टान्नासी । मित्रमंडळी भोजनासी । आग्रहे वाढी अन्न त्यांसी । थाटात करी समारंभ ॥१०५॥अत्यानंदी दिवस जात । धंद्यास उत्तम ये बरकत । नवसाचे त्या भान नुरत । जाहला ऐसा कृतघ्न तो ॥१०६॥दोन वर्ष जाहली जरी । नवस फेडणे न घडे तरी । वारंवार तयाचे घरीं । उग्र पीडा होय सुरु ॥१०७॥धंद्यांत येई नित्य खोट । आरोग्य त्याचे नसे नीट । सर्वासवे सदा कटकट । पुत्रही पडे आजारी ॥१०८॥पत्नी वदे तदा त्यांसी । फेडणे असे की नवसासी । स्वामींकडे प्रज्ञापुरीसी । येऊ जाउनि सत्वर ॥१०९॥पुढे जाहला तोइ भ्रमिष्ट । वागे बोले अति अनिष्ट । लोक बोलती हे न इष्ट । सत्वरी फेडणे नवसासी ॥११०॥मित्रमंडळी कुटुंबासी । घेवोनि जाती यतींपाशी । तत्क्षणी ब्रीद राखा निरंतर ॥११८॥इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥११९॥॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP