मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| सप्ताहाची फलश्रुती श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - सप्ताहाची फलश्रुती प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ सप्ताहाची फलश्रुती Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मी नृसिंहाय नमः । समर्थ स्वामी नमोस्तुते ॥१॥प्रातःकर्मे आवरोनी । सर्वारंभी देव पूजुनी । धूप नैवेद्य दाखवोनी । आरती करावी प्रेमाने ॥२॥कुलदैवता प्रार्थुनी मनीं । मातापितादी त्या वंदुनी । सद्गुरुसी शरण रिघुनी । ग्रंथ आदरे वंदावा ॥३॥गुरुकथामृत वाचण्याचा । सप्ताह व्हावा पूण साचा । लाभ होवो प्रभुकृपेचा । मनीं करावा संकल्प ॥४॥उच्चासनीं श्रीसमर्थाची । मूर्ति ठेवोनिया साची । फळे, फुले अर्पुनी तिची प्रार्थना करणे मनोभावें ॥५॥तुपाचे लावुनी निरांजन । सौभाग्य द्रव्ये-समर्पून । धूप दीपादी ओवाळुन । साष्टांग नमने वंदावे ॥६॥अध्याय वाचिता नित्य तीन । सातवे दिनीं सहज पूर्ण । सप्ताह होतो हे जाणुन । ग्रंथ वाचणे अत्यादरे ॥७॥सप्ताह साजरा करा यासी । वेळ नसला जरि कुणासी एका तरी अध्यायासी । नित्य नेमे वाचावे ॥८॥समर्थचरणीं ठेवुनी मन । ग्रंथाचे जो करि वाचन । तयावरी श्रीसमर्थ जाण । कृपा करतील सर्वथा ॥९॥निर्बुद्धासी ज्ञानप्राप्ती । निर्धना ये सधन स्थिती । ऐशी असे ग्रंथमहती । यास्तव करणे पारायणे ॥१०॥निपुत्रिकांसी पुत्रप्राप्ति । स्वामीपदी ठेवुनी भक्ती-। वाचिता पोथी ये प्रचिती ऐसे महत्त्व ग्रंथाचे ॥११॥अनारोग्य ते जाई लया । ग्रथावर्तनी गोडी जया । अनुभव याचा की घ्यावया । सप्ताह करणे वरचेवरी ॥१२॥शत्रुत्वाचा व्हावया नाश । समर्थचरिताचा हव्यास-। धरोनि करणे सप्ताहास । गुरुकथामृत ग्रंथाचा ॥१३॥नानाविध ते विकल्प येती रात्रंदिन ते मना छळिती । नष्ट कराया विकल्पमती । गुरुकथामृत वाचावे ॥१४॥चिंता इंगळी अति विषार । डसता घाबरे जीव फार । गुरुकथामृत उपाय थोर । नित्य वाचनी ठेवावा ॥१५॥पिशाच्चबाधा अपस्मार । रोग करिती जे जर्जर । सकल पीडांचा परिहार । गुरुकथामृत करित असे ॥१६॥स्वामीसमर्थ अलौकिक । दुष्टांसि वाटे सदा धाक । गुरुकथामृत वाचिता एक भक्ता रक्षील सर्वथा ॥१७॥अश्रद्ध वृत्ती नसावी ती । श्रद्धा खरीही कार्यशक्ती । इच्छिल्याची होत प्राप्ती । श्रद्धा असणे आवश्यक ॥१८॥धनी धरेचा झालो जरी । विसर आपुला न पडो तरी । शिर ठेवोनि चरणांवरी । प्रार्थितो तुज योगेश्वरा ॥१९॥मज मतिमंदा दिली स्फूर्ती । म्हणोनि झाली ग्रंथपूर्ती । उपकार देवा वर्णू किती । शब्द होताति पांगुळे ॥२०॥साष्टांगे नमितो समर्थासी । संत, सज्जन भाविकांसी । गुरुकथामृत वाचील त्यासी । नमन माझे साष्टांगे ॥२१॥ऐशी असे ही फलश्रुती । स्वामीचरणी ठेवुनी मती । गुरुकथमृत ग्रंथाप्रती । वाचिती तयां तो कल्पद्रुम ॥२२॥संतजनहो ही लेखणी । समर्थचरनीं मी अर्पुनी प्रेमादरे सर्वास नमुनी ग्रंथपूर्ती करीत असे ॥२३॥॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP