मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| अध्याय पहिला श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - अध्याय पहिला प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ अध्याय पहिला Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । सर्वाधीशा नमोस्तुते ॥१॥श्रीकुलदेवतायै नमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । श्रीनर्मदादेव्यै नमः । गंगामाते नमोस्तुते ॥२॥श्रीअक्कलकोट-निवासी । परब्रह्म श्रीस्वामींसी । शतावधि प्रणिपातांसी । करित असे दास हा ॥३॥लावोनि भक्तिचे निरांजन । सत्प्रेमाची पुष्पे वाहुन । प्रार्थना हा धूप जाळुन । चरणकमलां पूजितो ॥४॥सद्गुरुंचे ध्यान धरुन । दिव्य स्वरुपा करि वंदन । याचितो मी देइगा ज्ञान । अखंड नाम स्मरणाचे ॥५॥ श्रीस्वामींचे दिव्य चरित्र । वर्णावया कोण पात्र । काया-वाचा-मने अपात्र । मी तो असे सर्वथा ॥६॥परंतु इच्छा एक महान । गावी स्वामींची कथा गहन । गाता ऐकता पातके जाण । भस्म होतील सर्वही ॥७॥पर्वत मुंगिने उचलावा । समुद्र टिटविने आटवावा । वेद अप्रबुद्धे म्हणावा । कैसे असे शक्य हे ॥८॥विचार येतां कापरे भरते । लेखणी ती गळोनि पडते । चरित्र कैसे माझिया हाते । होईल देवा संपूर्ण ॥९॥मिळाला वाटे मला शाप । गतजन्मीं मी करिता पाप । हरावया तो शापताप । चरित्र गावे स्वामींचे ॥१०॥कृपेविना तुझ्या देवा । कैसा हेतू साध्य व्हावा । चरित्र-ग्रंथ गोड व्हावा । यास्तव द्यावे वरदान ॥११॥चरित्र-सागर उल्लंघाया । सामर्थ्य द्यावे स्वामिराया । लोटांगणे घालुनी पायां । प्रार्थितो मी तुम्हासी ॥१२॥जन्मोजन्मीं आपुले नाते । जडो ऐसे मज वाटते । यास्तव पदरज मस्तकाते । लावितो मी सदैव ॥१३॥शब्दस्फूर्ती, कल्पनास्फूर्ती-। देउनीं करणे ग्रंथपूर्ती । मनीं धरियली तुझी मूर्ती । विलंब आता न करावा ॥१४॥मातापितयांसी वंदितो । पूर्वजांचे स्मरण करितो । आशीर्वाद असो म्हणतो । पुण्यकर्मा साधावया ॥१५॥नमितो श्रीसदगुरुचरणां । निवारावे सर्व विघ्ना । श्रीस्वामींचे गुणगायना । सत्स्फूर्ती द्या मजलागी ॥१६॥शनिदेवादी नवग्रहांसी । शरण जाउनी प्रार्थितो त्यांसी । साह्य द्यावे या समयासी । ग्रथंलेखन करावया ॥१७॥रामानंद मज लाभले । पाश्चात्त्यविद्याविभूषित भले । अध्यात्ममागीं श्रेष्ठ ठरले । स्वामी कृपा अपूर्व ॥१८॥तेतों असती माझे गुरु । संसारसागरींचे तारु । अथवा गमती कल्पतरु । सदैव माझे मनास ॥१९॥रामानंद अति प्रेमळ । शिष्योन्नतीची त्यां तळमळ । मार्गदर्शना वेळोवेळ । निज शिष्यांप्रति करिताती ॥२०॥परम पावन ते गुरुचरण । करोनिया मस्तकी धारण । प्रार्थितो मी कर जोडुन । द्यावे सद्यश ग्रंथासी ॥२१॥आता प्रार्थना श्रोतियांसी । भक्त, बांधव, सज्जनांसी । सावचित्त व्हा परिसायासी । पावन चरित्र स्वामींचे ॥२२॥जन्ममृत्युच्या अतीत । स्वामी स्वयंभू हो निश्चित । प्रकट झाले अकस्मात । अक्कलकोटीं वृक्षातळीं ॥२३॥मूर्ति अत्यंत तेजस्वी । बघतां वाटे जणु गभस्ती । मानवरुपे महीवरती । दर्शन द्याया अवतरले ॥२४॥ऐका, ऐका श्रोतेजन । स्वामी असती तरी कोण । पूर्वकथेचे झालिया ज्ञान । हर्ष पावाल मानसीं ॥२५॥गुरुचरित्रीं नृसिंहसरस्वती । परमपूज्य ते दत्तमूर्ती । गाणगापुराहुनी शैल्यपर्वती । जाण्याप्रती निघाले ॥२६॥शैल्यपर्वताचे परिसरांत । येतां रम्य कर्दलीवनांत । विचार करुनी मानसांत । गुप्त वनीं जाहले ॥२७॥वनिची शोभा वर्णवे न । पक्षिगायनें हरपे भान । अमृत निर्झर कड्यांवरुन । उड्या टाकोने धावती ॥२८॥छाया दाटली अरण्यांत । हरिणशावके क्रीडा करित । पसरुनी पिसारे रत्नखचित ! मयूर नाचती हर्षाने ॥२९॥इंद्रधनूतिल रंगांनी । लज्जित व्हावे आपुल्या मनीं । ऐशी फुलपांखरे ती वनीं । विहरत होती सर्वत्र ॥३०॥पुष्पलतांनी वृक्ष भरले । मधु चाखितां भ्रमर रमले । कोकिळगायन वनीं चाले । वनश्री ऐशी रमणीय ॥३१॥लहानमोठे जलाशय । दिसती जणू स्फटिकमय । वनदेवींची दर्पणसोय । केली गमे जगदीशे ॥३२॥निळे, हिरवे मनोहर । पर्वत असती सभोवार । रत्नराशी रचिल्या थोर । कुबेरानी जणू की ॥३३॥भेदूनि गगना वृक्ष जाती । वार्यासंगे ते डोलती । नाना फुले गंध उधळती । सुगंधित झाले वन सारे ॥३४॥काय आणिक किति वर्णावे । सुरांगनांनीही भुलावे । स्वर्ग सोडुनी इथे यावे । ऐशी वनश्री अपूर्व ॥३५॥बहुत वर्षे जाहल्यावरी । अवचित घटना घडली खरी । मनोहर अशा त्या कांतावरीं । रम्य प्रभाती एकदा ॥३६॥गाती प्रभाती अति सुस्वर । विहंग बैसोनिया तरुवर । अवचित येई तिथे वनचर । थोर परशूस घेउनीं ॥३७॥वृक्ष वल्लरी वेष्टीत भला । बघुनी नर तो आनंन्दला । शाखोपशाखा तोडण्या सजला । कुठार घेउनी चढला वरी ॥३८॥शाखा तोडिता फार थकला । करिचा परशू गळोनि पडला । तळिचे वारुळा भेदोनि गेला । खोल अंतर्भागि तो ॥३९॥अहाहा घडले नवल थोर । अंतरीं प्रगटे ध्वनि ॐकार । ऐकता घाबरे तो वनचर । उतरे खाली त्वरेने ॥४०॥बघोनि मुनिची ध्यानस्थ मूर्ती । घाव मांडीवरती । पाहोनी बसे पाचावरती-। धारण रडू लागला-॥४१॥आता ऋषी हे शापितील । क्रोधाग्नीने जाळितील । नेत्र आक्रांदिता लाल-। झाले लोळे धरनीवरी ॥४२॥हाय मी पातक केले घोर । घायाळ केला मुनी थोर । घोर नरकीं मी जाणार । करु आता कैसे तरी ॥४३॥यमदूत नरकीं लोटितील । आसुडे मज फोडितील । तिथे येउनी सोडवील । ऐसा समर्थ कोण असे ॥४४॥काय माझी ही कर्मदशा । इथे नेमका आलो कसा । रडू लागला तो ढसढसा । कोण मातें रक्षील कीं ॥४५॥ थरथर कापे भिल्लकाया । क्षमा करावी पामरा या । वाचवा मज हो मुनिवर्या । दग्ध मातें न करावे ॥४६॥भिल्ल रडे तो धायधाय ! तोंचि इकडे जाहले काय । स्वामी उघडुनी नेत्रद्वय । प्रसन्न वदने विलोकिती ॥४७॥भिल्ल धरी प्रभुचे पाय । क्षमा असावी चुकलो माय । वाणी प्रगटे अमूतमय । न भ्यावे तूं मजलागी ॥४८॥अभय मिळता हर्ष झाला । कवटाळिले प्रभुपदांला । कर जोडुनी तयां वदला । उद्धरावे मजलागी ॥४९॥स्वामी तयाचे मस्तकावर । ठेवुनी आपुला पवित्र कर । वदती तया रे भिल्लवर । चिंता आता न करि गा ॥५०॥न करि कुणाचा घातपात । चौर्यकर्मी नसावे रत । द्रव्य असावे कष्टार्जित । आजन्म ऐसे वागावे ॥५१॥मिळता तया आशीर्वाद । झाला पामर तो सद्गद । अश्रूंनी न्हाणिले ते श्रीपद । वदे झालो कृतार्थ मी ॥५२॥ऐशी लाभावी कृतार्थता । सकल लोकांसी सर्वथा । यास्तव भजणे स्वामिनाथा । मनोभार्वे अहर्निश ॥५३॥इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥५४॥॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 11, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP