आता ‘‘शूकदोषनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी संागितले आहे ॥१ -२॥
३ ) वास्त्यायनादि कामशास्त्र प्रवर्तकांनी सांगितलेला विधी सोडून भलत्याच रीतीने इंद्रियवृद्धि करण्याविषयी शूकादिकांचे (शेवाळाचे वगैरे ) अपायकारक लेप वगैरे करणार्या पुरुषांना अठरा प्रकारचे शूकदोष नावाचे रोग होतात ते असे - १ सर्पपिका , २ अष्टीलिका , ३ ग्रथित , ४ कुंभिका , ५ अलजी , ६ मृदित , ७ संमूढपिडका , ८ अवमंथ , ९ पुष्करिका , १० स्पर्शहानि , ११ उत्तमा , १२ शतपोनक , १३ त्वक्पाक , १४ शोफितार्बुद , १५ मासार्बुद , १६ मांसपाक ,१७ विद्रधि , आणि १८ तिलकालक असे अठरा प्रकारचे शुकदोषव्याधि होतात .
शूक शेवाळे (शेवाळ ) ह्याचा अन्यथा प्रयोग केल्याने पांढर्या शिरसाच्या आकाराच्या पुटकुळ्या कफरक्तदोषाने इंद्रियावर उत्पन्न होतात त्याला ‘‘सर्षपिका ’’ असे म्हणतात .
विषारी शूकाचा दुरुपयोग केल्याने वातप्रकोपाने कठीण अशी पुळी इंद्रियावर होते तिला ‘‘अष्ठीलिका ’’ म्हणतात .
शूकाचे वरचेवर लेप करण्याने लिंगावर गाठी उदभवतात त्यांना ‘‘ग्रथित ’’ म्हणतात .
जांभळाच्या बी एवढी रक्तपित्तापासून एक गाठ होते तिला ‘‘कुंभिका ’’ म्हणतात . ही काळसर असते .
प्रमेहपीडकापैकी जी अलजी त्या लक्षणांनी युक्त होणारी शूकदोषजन्य जी पुळी तिला ‘‘अलजी ’’ म्हणतात .
शूक लेप लाऊन अतिशय दाबल्याने (रगडल्याने ) वातप्रकोप होऊन लिंग सुजते त्याला ‘मृदित ’ असे म्हणतात .
शूक लेप करून हाताने लिंग अतिशय चोळवटल्याने तोंउ नसणारी एक पुळी होते तिला ‘‘संमूढपिटिका ’’ म्हणतात .
शूकजन्य कफरक्तदोषाने लिंगावर लांबट व मध्ये भेग पडलेल्या अशा पुष्कळ पुळ्या होतात . त्या वेदनायुक्त असून त्यांच्यामुळे अंगावर शहारे येतात , त्यांना ‘‘अवमंथक ’’ असे म्हणतात .
शूकजन्यरक्तपित्त दोषाने अनेक बारीक पुटकुळ्यांनी युक्त अशी कमळातील गुच्छासारखी जी गांठ होते तिला ‘‘पुष्करिका ’’ असे म्हणतात .
शूकलेपाने रक्त दूषित झाले असता इंद्रियाच्या त्वचेला स्पर्श कळत नाही , त्या विकाराला ‘‘स्पर्शहानी ’’ म्हणतात .
शूक लेपाचा अतिरेक केल्याने लिंगावर रक्तपित्तप्रकोपाने तांबड्या व उडीद अथवा मुगासारख्या पुळ्या होतात , त्यांना ‘‘उत्तमा ’’ असे म्हणतात .
शुकदोषाने लिंगावर वायु व रक्त ह्यांच्या प्रकोपाने चाळणीप्रमाणे बारीक छिद्रे पडतात , त्या व्याधीला ‘‘शतपोनिक ’’ म्हणतात ,
शुक्रदोषाने रक्त व पित्त प्रकुपित झाले असता लिंगावरील त्वचा पिकते . त्याला ‘त्वक्पाक ’ असे म्हणतात . ह्याच्यायोगाने ज्वर व दाह ही लक्षणे होतात .
ज्याचे इंद्रिय काळ्या व तांबड्य़ा फुटकुळ्य़ांनी पीडित होते व ज्या ठिकाणी व्रण होतो त्या ठिकाणी अतिशय ठणका असतो , त्याला ‘‘शोणितार्बुद ’’ असे म्हणतात . हे शुक्रदोषजन्य रक्तदोषाने होते .
शूकदूषित मांसदोषाने इंद्रियावर जे अर्बुद (आवाळु ) होते त्याला ‘‘मांसर्बुद ’’ असे म्हणतात .
शूकदोषाने ज्याच्या शिस्नापासून दूषित मांस गळते व त्यामुळे सर्व प्रकारच्या वेदना होतात त्या त्रिदोषजन्यव्याधीला ‘मांसपाक ’ असे म्हणतात .
शूकदोषजन्य त्रिदोषंच्या प्रकोपाने लिंगावर विद्रधि (करट ) उत्पन्न होते , त्याची लक्षणे बाह्यविद्रधिप्रमाणे असतात .
काळ्या अथवा चित्रविचित्र रंगाच्या विषारी जळवांचा किंवा विषयुक्त इतर शुकांचा लेप केल्याने सर्व लिंग पिकते व काही दिवसांनी त्यातून कुजट मांस गळू लागते ह्या त्रिदोषजन्यव्याधीला ‘तिलकालक ’ असे म्हणतात .
ह्यापैकी मांसार्बुद , मांसपाक , विद्रधि व तिलकालक हे व्याधि बरे होत नाहीत , म्हणजे असाध्य आहेत ॥४ -१४॥