एकदा निश्चय झालेल्या पुरुषांस उदासीन दशेमध्यें देखील भासणारा जो वासनानंद त्याचीही उपेक्षा करुन मुख्य जो ब्रह्मनंद तिकडेच त्यांचे लक्ष्य असते. ॥१२१॥
ज्याप्रमाणें जिंचे सर्वचित्त परपुरुषाकडे लागलें आहे अशी व्यभिचारिणी स्त्री गृहकृत्यांत निमग्न असतांहि आंतुन त्या परसंगरसायनाचा आस्वाद घेत असते. ॥१२२॥
त्याप्रमाणें ज्य धीर पुरुषास एकदां परब्रह्मचा निश्चय होऊन विश्रांती मिळाली, तो व्यवहार करीत असतांहि आंतुन नित्य त्याच स्वाद घेत असतो. ॥१२३॥
एथें धीर म्हणून जो शब्द आहे त्याचा अर्थ असा कीं इंद्रियें मनास विषयाकडे ओढींत असूनही ब्रह्मनंद चाखण्याच्या इच्छेनें सर्व इंद्रियांचा तिरस्कार करुन जो पुरुषात्या तत्वाचेंच चितन करितों तो धीर समजावा. ॥१२४॥
आणि विश्रांती शब्दाचा अर्थ असा कीं जसा एखादा ओझें वाहणारा मनुष्य ओझें टाकुन विश्रांति पावतो, त्याप्रमाणें संसारातील व्यापारांचा त्याग झाला असतां जो हलकेपणा वाटतो तीच एथें विश्रांति. ॥१२५॥
याप्रमाणें परम विश्रांति पावलेला पुरुष औदासिन्य दशेप्रमाणें सूख दुःख दर्शचेठायींही त्या मुख्यानंदाकडेसच लक्ष्य देऊन असतो. ॥१२६॥
ज्याप्रमाणें अग्नीमधे शीघ्र प्रवेश करण्याची इच्छा झाली असतां सती जाण्यार्या स्त्रीचें अलंकाराविषयीं वैरस्य होतें त्याप्रमणें धीर पुरुषास ब्रह्मनुसंधानाला विरोध न करणार्याविषयीं वैरस्य होतें त्याप्रमाणें धीर पुरुषास ब्रह्मनुसंधानाला विरोध न करणार्याविषयसूखाविषयीं विरसता प्राप्त होते. ॥१२७॥
जें सूख ब्रह्मनंदाला विरोधी नाही. अशा सूखाच्या वेळी तत्त्ववेत्याची बुद्धि कावळ्याच्या दृष्टीप्रमाणें एकदां त्या सूखाकडे आणि एकदां ब्रह्मनंदाकडें अशा येरझारा करीत असतें. ॥१२८॥
कावळ्याच्या दृष्टीच्या असा स्वभाव आहे कीं, ती एकदां डावीकडे व एकदां उजवीकडे येत; कारण मनूष्याप्रमाणें त्याला दोन बुबुळें नाहींत तत्त्ववेत्याची बुद्धिही अशीच दोन आनंदामध्ये येरझारा घालते. ॥१२९॥
ज्याप्रमाणें दुभाषी दोन्हींही भाषा जाणतो, त्याप्रमाणें तत्त्ववेत्ता लौकिक व वैदिक म्हणजे विषयानंद आणि ब्रह्मनंद या दोहींचाहीं अनुभव घेतो. ॥१३०॥
एखादें दुःख प्राप्त झालें असतां अशा पुरुषाच्या मनांत उद्वेग होत नाहीं असे नाहीं, कारण तो धर्माचा आहे परंतु अज्ञान्यास जसा होतो तसा त्यास होत नाहीं कारण त्याची दृष्टी आतां दोन्हीं बाजूंकडें असते ज्याप्रमाणें नदींत कमरे इतक्या पाण्यांत उभा राहिलेल्या मनुष्यास शीत व उष्ण या दोहींचा अनुभव येतो त्याप्रमाणें यांची दृष्टी दोहींकडे असते. ॥१३१॥
याप्रमाणें जागृतीत तत्त्ववेत्याला ब्रह्मसूख सदा सर्वदां भासतें तसेंच त्या वासनेपासून उप्तन्न होणार्या स्वप्नातहीं भासतें. ॥१३२॥
केवळ सूखच भासतें असें नाहीं. जशी आनंदवासना असते. तशी अविद्या वासनाही असते; त्यामुळे त्यापासून उप्तन्न होणार्या स्वप्नांत देखील मुढाप्रमाणें यालाहीं सूखदुःखें भासतात. ॥१३३॥
एथवर ब्रह्मनंद प्रकरणामध्यें योग्यास प्रत्यक्ष होणारा जो ब्रह्मनंद तो या प्रथमाध्यायीं आह्मीं सांगितला. ॥१३४॥