हें स्वप्रकाश सूखच ब्रह्म आहे अशाविषयीं "ब्रह्म विज्ञानमानंदम " ह्मणजे ज्ञानरुप आनंदच ब्रह्म आहे असं वाजसनीय शाखेंत ह्मटले आहे. ॥६१॥
हा जो सूखज्ञानाचा अनुभव आम्हीं सांगितला तो विज्ञानामय शब्दवाक्य जीवाला आहे अशी कोनी शंका घेऊ नये. कारण त्या अज्ञानांतच विज्ञानामय आणि मनोमय हे दोघेही लीन होतात. त्यांची जी विलयावस्था तीच निद्रा आणि तेंच अज्ञान, ॥६२॥
ज्याप्रमाणें उष्णतेच्या संयोगाने पातळ झालेलें तुप पुनः घट्ट होतें त्याप्रमाणें जागाऋत्खप्नावस्थेंतील भोगप्रद कर्माचा क्षय झाला असतां, लीन झालेलें अंतःकरण पुनः कर्मवशात जागृत होऊन विज्ञानमय होतें या विलीनावस्थेलाच आनंदमय असें नांव दिलें आहे. ॥६३॥
ह्मणजे निद्रेच्या पुर्वक्षणीं जी वृत्ति बाहेरचें जग सोडुन स्वरुपाकडे वळण्यानें स्वरुपसूखांत निमग्न होऊन लीन होते. या अवस्थेला आनंदमय कोश ह्मणतात. ॥६४॥
असा हा अंतर्मुखवृत्तीचा परिणामरुप आनंदमय कोश त्यावेळी ब्रह्मसूखाचा उपभोग घेतो. त्या कांळीं त्यासूखानें बिबित अशा अज्ञानवृत्ती असतात, त्यामुळे भोग घडतो. ॥६५॥
त्या अज्ञानवृत्ति सूक्ष्म ह्मणजे अस्पष्ट आहेत आणि बुद्धिवृति त्यापेक्षां स्पष्ट आहेत असं वेदांतसिद्धांतपरागत पुरुष ह्मणतात. ॥६६॥
ही गोष्ट मांडुक्य तापनीयादि श्रुतीमध्ये स्पष्ट करुन सांगितली आहे तेथें असें ह्मटलें आहे की आनंदमय हा भोक्ता आहे, आणि ब्रहमनंद हें त्यांचे भोग्य आहे. ॥६७॥
मांडुक्य श्रुतींतील "प्रज्ञानघनैव आनदमयः " इत्यादि वाक्याचा अर्थ असा कीं विज्ञानमय वाच्य जीव सूषुप्तिमध्यें स्वरुपाशी ऐक्य पावुन आनंदमय होऊनचैतन्य प्रतिबिंबत वृत्तीच्या योगानें तेथील ब्रह्मनंदाचा भोग घेतो. ॥६८॥
ऐक्य पावतो म्हणून जें वर म्हटलें त्याला अर्थ असा कीं पुर्वी जो विज्ञामय आदिकरुन रुपांनी युक्त होतो. तोच आतां पुष्कळ तांदुळांच्या पिठाप्रमाणे त्या सर्व रुपाच्या लयाशी एक्यें पावतो. ॥६९॥
ज्याप्रमाणें थंड देशांत पाणी घट्ट होतें तसें घटादिक ज्या बुद्धि वृत्ति ज्यांस प्रज्ञान असें ह्मणतात त्या सूषुप्तीत घट्ट होतात. तेव्हा तो चिदुपाशीं ऐक्य पावतो. ॥७०॥
ज्याला वेदांत शास्त्रांत प्रज्ञानघन साक्षी असें ह्मटलें असें ह्मटलें त्यालाच बाकीचे साधरण लोक व ताकिंकादिक पडित दुःखाभाव असं ह्मणतात. कारण निद्रेंत सर्व दुःखवृत्तीचा लोप होतो. ॥७१॥
या आनंदभोगाला अज्ञान प्रतिबिंबित चैतन्य साधन आहे अशी एकदां ज्याची रुचि घेतली आहे. असे जें ब्रह्म सूख तें सोडुन देऊन जीव बाहेर येतो त्याला कारण त्याचें कर्मच. ॥७२॥
पुर्व जन्मी केलेल्या कर्मामुळेंच पुनः जागा होतो असे जागृतीस कर्मच कारण आहे; असेम कैवल्य शखेंत ह्मटलें आहे. ॥७३॥
मनुष्य जागा झाल्यानंतर कांहीं वेळपर्यंत निद्रेंत भोगिलेल्या ब्रह्मनंदाचा ठासा असतो. ही एक आनंद भोगल्याची खुणच आहे. कारण त्यावेळीं हातरुणावर पडलेला अस्ता मनामध्यें कोनचाही विषय नसतां सूखी असतो. ॥७४॥
तो तसाच सूखानें स्वस्थ पडुन राहता परंतु कर्माहीकरुन प्रेरीत होत्साता नानाप्रकारची दुःखें मनांत येऊन हळुहळू त्यास ब्रह्मनंदाची विस्मृति पडते. ॥७५॥
निद्रेच्या पुर्वी व तिच्या अंती कांहीं वेळ ब्रह्मनंदाविषयींची प्रीति असलेली मनुष्यास दृष्टीस पडते. कारण पुर्वी तो आनंद भोगण्याकरितां मृदु शय्यादि साधनांचा प्रयत्न व अंतीं हांतरुण सोडुन उठण्याचा कंटाळा, ह्म दोन गोष्टीवरुन हें सिद्ध होतें. तेव्हा या निद्रेंत ब्रह्मनंदाविषयींची प्रीति असलेली मनुष्यास दृष्टीस पडते कारण पुर्वी तो आनंद भोगण्याकरितां मृदु शय्यादि साधनांचा प्रयत्न व अंतीं हातंरुन सोडुन उठण्याचा कंटाळा ह्म दोन गोष्टीवरुन हें सिद्ध होतें तेव्हा या निद्रेंत ब्रह्मनंद आहे याविषयीं सूज्ञास संशय कधी येईल काय ? ॥७६॥
याजवर असा एक पुर्वपक्ष आहे कीं, सूषुप्तीच्या आदि अंतीच्या तृष्णी स्थितीत ब्रह्मनंद भासतो असें जर मानलें तर कांहीं खटपट न करितां मनूष्यास मोक्षप्राप्ति होईल; मग गूरु आणि शास्त्र यांची गरज काय ? ॥७७॥
खरें आहे परंतु ब्रह्मचे ज्ञान जर होईल तर तेवढ्यानेंच ते कृतार्थ होतील पण गूरुशास्त्राचें सहाय्यावांचून तें ज्ञानच होत नाहीं. ॥७८॥
तुमच्या सांगण्यावरुनच तेंच ब्रह्म असें आम्हांस समजलें असून आम्हांस कृतार्थता कां वाटत नाहीं ? असा प्रश्न आमच्यावरील उत्तरावर कोनी करीत असेल तर त्या प्रश्न करणार्या मनुष्यासारख्या कोनी एका तत्त्वज्ञ म्हनुन घेणारीची एक गोष्ट आह्मी सांगतों. ॥७९॥
कोणी एका राजानें वर्तमानापत्नांत अशी जाहिरात दिली की जो कोणी चार वेद जाणत असेल त्यास हजार रुपयांचें बक्षीस दिलें जाईल, ही जाहिरात वाचून कोणी एकभट्ट ब्राह्मण राजाकदे येऊन म्हणाला वेद चार आहेत. हे मी पक्कें जाणतो. तर जाहीर केलेलें बक्षीस मला देण्याची आज्ञा व्हावी. ॥८०॥