-
पु. माड , पोफळ , सुरमाड वगैरेचा कापूर केलेला पाण्याचा पन्हळ .
-
पु. १ चोपणीनें जमीन इ० ठोकण्याची , टणक करण्याची क्रिया ; चोपणी . २ ठोक ; मार . ( क्रि० घेणें ; देणें ; मारणें ; काढणें ; बसणें ). ३ विणकराच्या फणीचा शेवटचा भाग , बाजू . या ठिकाणीं दांते बारीक व जवळजवळ असतात . ४ दंड ; काठी ; चोब पहा . - पुस्त्री . १ ( ल . ) जरब ; दाब ; नियमन ; नियंत्रण ; निग्रह ; शासन . ( क्रि० करणें ; देणें ; बसणें ). २ ( अभ्यासामुळें , प्राविण्यामुळें मनाला लागलेली ) संवय ; परिपाठ ; राबता ; ( क्रि० लागणें ) चोप लाऊन मनाप्रति वेगेंत सर्व नीट पढली अनुरागें । - शशिसेना ७२ . ( कवि जगन्नाथ शके १६६९ राजवाडे ग्रंथमाला . ) - स्त्री . १ ( ताड , माड , सुरमाड इ० कांच्या सोटाची ) उभी चिरफळी ; सोपट ; लांब फाळी . २ ( व . ० काळजी ; चिंता ; खबरदारी म्ह० ( व . ) ज्याची त्याला चोप नाहीं , शेण पुंजिला झोंप नाहीं . = मालक स्वत : बेफिकीर , पण तिर्हाइतालाच त्याची काळजी अधिक . ३ ( व . ) चौघडा वाजवावयाची बारीक व लहान काठी ; ढोलकें नगारा वाजविण्याचें टिपरें , टिपरी . नगार्यास दोन चोपा लागतात . ४ ( व . ) ( घाम इ० कांचा ) ओलावा . घामाची चोप आली म्हणजे ताप उतरेल . [ चोपणें . फा . चोब ] ( वाप्र . )
-
०धरणें १ ( जमीन , गच्ची इ० ) सपाट , साफ होऊन एका पातळींत येणें . २ ( मनुष्य ) शिस्तीचा , वक्तशीर , व्यवस्थित , गंभीर , शांत बनणें ; ताळयावर येणें .
-
ना. कणिक तिंबणे , ठोक , धुलाई , पाठ मऊ करणे , पिटाई , फटके ( मारणे ), फोडून काढणे , मार , मारपीट , मारहाण .
Site Search
Input language: