-
पु. १ तापा ; नदीतून पलीकडे जाण्यासाठी फळ्या , बाज इ० कास भोपळे , घागरी , पिपे इ० बांधून किंवा तीन चार तरांडी एकत्र बांधून करतात ते तरण्याचे साधन ; तक्त्यांची नाव ; तराफा ; तरी . तापा पहा . २ लांकडे नेण्याचे पाण्यावरील साधन . तापटी पहा . [ अर . ताइफा ]
-
पु. १ ( कलावंतीण व तिचे साजिंदे व वाद्ये यांचा सूर , सनई , संबळ इ० सहित वाजंत्र्यांचा एकत्र ) साज ; समुदाय ; फड ; चक्री ; मेळ ; संच ; टोळी . रात्री कंचन्यांचे ताफे बोलाऊन नाच , रागरंग , आतश्बाजी रोषनाई जाली . - रा ७ . २२५ . २ घोळका . तीस हजार फौज अदकोस पर्यंत ताफाचा ताफा एकदाच आरडाओरडा झाला . - भाब ६७ . ३ चिमण्यांची झुंड . [ अर . ताइफा ] ( एखाद्याचा ) ताफा बसणे - ( ल . ) ( एखाद्याचे ) घर बसणे , कुटुंबनाश होणे ; ( कर्तापुरुष मेल्यामुळे ) घरदार , कुटुंब मोडकळीस येणे .
-
ना. गट , फड , संच , साज ( वादकांचा ).
-
ताफा बसणें
Site Search
Input language: