-
स्त्री. १ पोतें ; कोथळा ; थैला ; गोणी ( गोणपाटाची केलेली , दाणे सांठविण्याची ). २ ( ल . ) ओझें ; संकट ; भार ( काम , काळजी यांचा ). [ सं . का . गोणी ; हिं . गोण ; तुल० प्रा . दे . गोण - णी = बैल ] म्ह० गाढवाचे गोणीस खंडीची तूट . गोणता - पु . गोणताटाचा किंवा ताडांच्या पात्यांचा विणलेला बैलावर लादण्याचा गोण , पोतें .
-
०ताट न. १ तागाचें , गोणाचें कापड ; गोणपट ; तरटा . २ गोणी पहा . घरीं गोणताटें मूठ होतें । तें विकिलें त्वरित वाणियासी . गोणती - स्त्री . ( राजा . ) गोणताटाची लहान पिशवी . गोणतें , गोणटें - न . ( खा . व . ) गोण ; पोतें ; वाटवें . गोणपट , गोणपाट - पुन . तरट . गोणताट पहा . [ का . गोणी + सं . पट ]
-
ना. गोणता , गोणा , गोणी , थैला , पोते , बारदान , बोरी , मोठी पिशवी .
-
गोण काळ्याचें आणि दूध गवळ्याचें (खराब)
Site Search
Input language: