Dictionaries | References

६४

   { चौसष्ट }
Script: Devanagari

६४     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चौसठ, चौसठ

६४     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चौसष्ट, चौसष्ट

६४     

Sanket Kosh | Marathi  Marathi
चौसष्ट कला   
(अ) चौदा विद्या आणि चौसष्ट कला अशी प्राचीन परंपरी आहे. या चौसष्ट कला कोणत्या यासंबंधीं मतैक्य नाहीं. श्रीमद्भागवत शुक्रनीति व वात्सायन कामसूत्रें वगैरे निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळ्या याद्या आढळतात. शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथांत या चौसष्ट कलांचा नामनिर्देश असा आहेः - १ इतिहास, २ आगम, ३ काव्य, ४ अलंकार, ५ नाटक, ६ गायकत्व, ७ कवित्व, ८ कामशास्त्र, ९ दूरोदर (द्यूत), १० देशभाषालिपिज्ञान, ११ लिपिकर्म, १२ वाचन, १३ गणक, १४ व्यवहार, १५ स्वरशास्त्र, १६ शाकुन, १७ सामुद्रिक, १८ रत्नशास्त्र, १९ गज - अश्वरथ - कौशल, २० मल्लशास्त्र, २१ सूपशास्त्र, २२ भूरुहदोहद (बागाइत), २३ गंधवाद, २४ धातुवाद, २५ रससंबंधीं खनिवाद, २६ बिलबाद, २७ अग्निसंस्तम्भ, २८ जलसंस्तम्भ, २९ वाचस्तम्भन, ३० वायुस्तम्भन, ३१ वशीकरण, ३२ आकर्षण, ३३ मोहन, ३४ विद्वेषण, ३५ उच्चाटन, ३६ मारण, ३७ कलावंचन, ३८ परकायप्रवेश, ३९ पादुकासिद्धि, ४० वाक्‌सिद्धि, ४१ गुटिकासिद्धि, ४२ ऐन्द्रजालिक, ४३ अंजन, ४४ परद्दष्टिवंचन, ४५ स्वरवंचन, ४६ मणिभूमिकर्म - जमिनीवर रत्नांची मण्यांची रचना करणें, ४७ मंत्र औषधींची सिद्धि, ४८ चोरकर्म, ४९ चित्रक्रिया, ५० लोहक्रिया, ५१ अश्मक्रिया, ५२ मृक्तिया, ५३ दारुक्रिया, ५४ वेणुक्रिया, ५५ चर्मक्रिया, ५६ अम्बरक्रिया, ५७ अद्दश्यकरण, ५८ दन्तिकरण, ५९ मृगयाविधि, ६० वाणिज्य, ६१ पाशुपाल्य, ६२ कृषि, ६३ आसवकर्म आणि ६४ लाव - कुक्कुट - मेषादि युद्धकारक कौशल. ([शिवतत्त्वरत्नाकर द्वितीय तरंग]). नखचित्रें ही पासष्टावी कला होय.

(आ) वात्सायन कामसूत्राच्या आधरें या चौसष्ट कलांचें वर्गीकरण असें आहेः -
वाङ्मयात्मक कला दहा - १ वाचन व पठन, २ शब्दकोशविद्या व पद्यरचना, ३ गूढकाव्यज्ञान, ४ समस्यापूर्ति, ५ न पाहिलेल्या वस्तु व अक्षरें ओंळखणें, ६ सांकेतिक भाषाज्ञान, ७ अनेक भाषाज्ञान, ८ कूट प्रश्न सोडविणें, ९ तोंडी कूट प्रश्न सोडविणें, १० नकला करणें ; गृह्यकला (घरगुती धंदे) तीन - ११ शिवणकला, १२ धनुष्य - बाण वगैरे करणें, १३ शय्या तयार करणें ;
पाकशास्त्रकला तीन - १४ विविध भोजनप्रकार, १५ विविध पाकरचना व १६ विविध पेयें ;
स्नान वेषभूषा वगैरे नऊ - १७ चंदनाची उटी, १८ अलंकार घालणें, १९ सुगंधी द्रव्यें तयार करणें, २० फुलांचे दागिने, २२१ पुष्पमाला बनविणें, २२ दांत वस्त्रें रंगविणें, २३ केशरचना, २४ शिरोवेष्टनप्रकार व २५ वस्त्रांतर करणें ;
हस्तव्यवसाय - कला नऊ - २६ नकाशा काढणें, २७ चित्रकला, २८ विविध द्दश्यें दाखविणें, २९ मूर्तिकला, ३० लाकडावरील खोदकाम, ३१ रांगोळ्या, ३२ पुष्पशय्या तयार करणें, ३३ दोर्‍याचीं कृत्रिम फुलें तयार करणें ; ३४ फुलांच्या गाडया तयार करणे ;
करमणुकीच्या कला अकरा - ३५ कारंजें तयार लावणें, ३९ पोपटांना शिकविणें, ४० विविध रीतींनीं एकच गोष्ट करणें, ४१ हातचलाखी, ४२ विविध खेळ, ४३ वशीकरण विद्या, ४४ विविध वेष धारण करणें, ४५ कूचुमारानें शिकविलेलीं जादू करणें ;
शास्त्रीय कला नऊ - ४६ सोनें वगैरेंत हिरे बसविणें, ४७ गृहशिल्प, ४८ सोनें वगैरे परीक्षा, ४९ विविध धातूंचें ज्ञान, ५० रत्नें रंगविणें, ५१ खाणी कोठें आहेत तें ओळखणें, ५२ बागबगीचा, ५३ धातूवरील कोरीव काम, ५४ मणि रत्नें वगैरेंना भोकें पाडणें ;
संगीत कला चार - ५५ गायन, ५६ वादन, ५७ जलतरंग, ५८ शरीर गोंदणें ;
शारीरिक व्यायाम कला चार - ५९ मुलांचे खेळ, ६० विविधव्यायामाचें ज्ञान, ६१ नृत्य आणि ६२ युद्धकलांचें ज्ञान ;
नाटयकला एक - ६३ अभिनय ;
शिष्टाचारकला एक - ६४ विविध शिष्टाचारांचें ज्ञान, (पुरुषार्थ वर्ष १० अंक ६)
जैन धर्मग्रंथांत ७२ कला मानिल्या आहेत. त्या ७२ अंकाखालीं पहा.
चौसष्ट तंत्रग्रंथ   
१ महामायाशंबर, २ योगिनीजालशंबर, ३ तत्तशंबरक, ४-११ भैरवाष्टक, ११२-१९ बहुरूपाष्टक, २० ज्ञान २१-२८ यमलाष्टक, २९ चंद्रज्ञान, ३० वासुकि, ३१ महासम्मोहन, ३२ महाच्छूश्म, ३३ महादेव, ३४ वाथु (ल ?) ल. ३५ नयोत्तर, ३६ ह्रद्‌मेद, ३७ मातृमेद, ३८ गुह्यतंत्र, ३९ कामिक, ४० कालपाद, ४१ कालसार, ४२ कुब्जिकामत, ४३ नयोत्तर, ४४ वीणू (णा) द्य, ४५ तोत्तल, ४६ तोत्तलोत्तर ४७ पंचामृत, ४८ रूपमेद, ४९ भूतोड्डामर, ५० कुलसार, ५१ कुलोद्दीश, ५२ कुलचूडामणि, ५३ सर्वज्ञानोत्तर, ५४ महापिशामत, ५५ महालक्ष्मीमत, ५६ सिद्धयोगीश्वरमत, ५७ कुरूपिकामत, ५८ रूपिकामत, ५९ सर्ववीरमत, ६० विमलामत, ६१ उत्तम, ६२ आरुणेश, ६३ मोहनेश आणि ६४ विशुद्धेश्वर. ([म. ज्ञा. को. वि. १४])
चौसष्ट प्राचीन भारतीय लिपि   
१ ब्राह्मी लिपि, २ खरोष्टी, ३ पुष्करसारी, ४ अंग, ५ वंग, ६ मगध, ७ मांगल्य, ८ मनुष्य, ९ अंगुलीय, १० शकरी, ११ ब्रह्मवल्ली, १२ द्राविड, १३ कनारि, १४ दक्षिण, १५ उग्र, १६ संख्या, १७ अनुकोम, १८ ऊर्ध्वधनु, १९ दरद, २० स्वास्य, २१ चीन, २२ हूण, २३ मध्याक्षरविस्तर, २४ पुष्प, २५ देव, २६ नाग २७ यक्ष, २८ गंधर्व, २९ किन्नर, ३० महोरग, ३१ असुर, ३२ गरुड, ३३ मृगचक्र, ३४ चक्र, ३५ वायुमरु, ३६ मौमदेव, ३७ अंतरिक्षदेव, ३८ उत्तरकुरूद्वीप, ३९ अपगौडादि, ४० पूर्वविदेह, ४१ उत्क्षेप, ४२ निक्षेप, ४४ प्रक्षेप ४५ सागर, ४६ बज्र, ४७ लेखप्रतिलेख, ४८ अनुद्रुत, ४९ शास्त्रवर्त, ५० गणावर्त, ५१ उत्क्षेपावर्त, ५२ विक्षेपावर्त, ५३ पादलिखित, ५४ द्विरुत्तरपद संधिलिखित, ५५ दशोत्तरपदलिखित, ५६ अध्याहरिणी, ५७ सर्वरुत्संग्रहणी, ५८ विद्यानुलोम, ५९ विमिश्रित, ६० ऋषितपस्तप्त, ६१ धरिणीप्रेक्षणा, ६२ सर्वोषधनिष्यन्द, ६३ सर्वसारसंग्रहणी आणि ६४ सर्वभूतऋदग्रहणी (ललितविस्त अ. १०)
या सर्व लिपी मूळ ब्राह्मी लिपीपासूनच निघाल्या आहेत असें म्हणतात. यांतील बरीचशीं नांवें कल्पित आहेत असें पंडित गौरीशंकर ओझा हे आपल्या"भारतीय प्राचीन लिपिमाला"ह्या ग्रंथांत म्हणतात.
चौसष्ट भैरव   
(अ) अष्टभैरव हे आठ दिशांचे रक्षक तर त्यांचे आठ गट हे दिवसाच्या आठ प्रहरांचे पहारेकरी होत. ते आठ गट असेः -
(१) असितांग - १ असितांग, २ विशालाक्ष, ३ मार्तण्ड, ४ मोदकप्रिय, ५ स्वच्छंन्द, ६ विघ्नसंतुष्ट, ७ खेचर व ८ सचराचर.
(२) रुरु - १ रुरु, २ क्रोडदंष्ट्र, ३ जटाधर, ४ विश्वरूप, ५ विरूपाक्ष, ६ नानारूपधर, ७ पर किंवा महाकाय व ८ वज्रहस्त.
(३) चंड - १ चंड, २ प्रलयांतक, ३ भूमिकंप, ४ नीलकंठ ५ कुटिल, ६ मंत्रनायक, ७ रुद्र व ८ पितामह.
(५) उन्मत्त - १ बटु - क - नायक, २ शंकर, ३ भूत - वेताळ, ४ त्रिनेत्र, ५ त्रिपुरांतक, ६ वरद, ७ पर्वतवास, व ८ शुभ्रवर्ण,
(६) कापाल - १ कपाल, २ शशिभूषण, ३ हस्तिचर्मांबरधर, ४ योगीश, ५ ब्रह्मराक्षस, ६ सर्वज्ञ, ७ सर्वदेवेश, व सर्वगतह्रदिस्थित.
(७) भीषण - १ भीषण, २ भयहर, ३ सर्वज्ञ, ४ कालाग्नि, ५ महारौद्र, ६ दक्षिण, ७ मुखर व ८ अस्थिर.
(८) संहार - १ संहार, २ अतिरिक्तांग, ३ कालाग्नि, ४ प्रियंकर, ५ घोरनाद, ६ विशालाक्ष, ६ पार्वती, ७ दुर्गा, ८ कात्यायनी, ९ महादेवी, १० चंद्रघंटा, ११ महाविद्या, १२ महातपा, १३ भ्रामरी, १४ सावित्री, १५ ब्रह्मवादिनी, १६ मद्रकाली, १७ विशालाक्षी, १८ रुद्राणी, १९ कृष्णपिंगला, २० अग्निज्वाला, २१ रौद्रमुखी, २२ कालरात्रि, २३ तपस्विनी, २४ मेघस्वना, २५ सहस्त्राक्षी, २६ विष्णुप्रिया, २७ जलोदरी, २८ महोदरी, २९ मुक्तकेशी, ३० घोररूपा, ३१ महाबला, ३२ श्रुति, ३३ स्मृति, ३४ धृति, ३५ तुष्टि, ३६ पुष्टि, ३७ मेधा, ३८ विद्या, ३९ लक्ष्मी, ४० सरस्वती, ४१ अपर्णा, ४२ अंबिका, ४३ योगिनी, ४४ डाकिनी, ४५ शाकिनी, ४६ हारिणी, ४७ हाकिनी, ४८ लाकिनी, ४९ त्रिदशेश्वरी, ५० महाषष्टि, ५१ सर्वमंगला, ५२ लज्जा, ५३ कौशिकी, ५४ ब्रह्मणी, ५५ ऐन्द्री, ५६ नारसिंही, ५७ वाराही, ५८ चामुंडा, ५९ शिवदूती, ६० महामाया, ६१ मातृका, ६२ कार्तिकी, ६३ विनायकी आणि ६४ कामाक्षी, कोठें कोठें निरनिराळीं नांवें आढळतात.
(तत्त्व - निज - विवेक) या चौशष्ट योगिनींचें प्राचीन मंदिर नर्मदा व बावन गंगा यांचे संगमस्थानीं डोंगरावर भेडाघाटजवळ आहे.

(आ) १ ब्रह्माणी, २ कौमारी, ३ वाराही, ४ शांकरी, ५ इंद्राणी, ६ कंकाली, ७ कराली, ८ महाकाली, ९ काली, १० चामुंडा, ११ ज्वालामुखी, १२ कामाक्षी, १३ कमालिनी, १४ भद्रकालीं, १५ दुर्गा, १६ अंबिका, १७ ललिता, १८ गौरी, १९ सुमंगला, २० रोहिणी, २१ कपिला, २२ मूलकरा, २३ कुंडलिनी, २४ त्रिपुरा, २५ कुरुकुल्ला, २६ भैरवी, २७ भद्रा, २८ चंद्रावदना, २९ नारसिंही, ३० निरंजना, ३१ हेमकांति, ३२ प्रेतासना, ३३ ईशानी, ३४ वैश्वानरी, ३५ विष्णवी, ३६ वैनायकी, ३७ हरिसिद्धि, ३८ सरस्वती, ३९ तोतला, ४० गंभीरा, ४१ शंखिनी, ४२ पद‌मिनी, ४३ चित्रिणी, ४४ वारुणी, ४५ नारायणी, ४६ सुनंदी, ४७ यमभगिनी, ४८ सूर्यपुत्री, ४९ शीतला, ५० कृष्णवाराही, ५१ रक्ताक्षी, ५२ कालरात्री, ५३ आकाशी, ५४ वेष्टनी, ५५ विजया, ५६ जया, ५७ धूम्रावती, ५८ वागीश्वरी, ५९ कात्यायनी, ६० अग्निहोत्री, ६२ चक्रेश्वरी, ६२ महाविद्या, ६३ ईश्वरी आणि ६४ बहिश्वरी - बहुचराजी. ([सौंदर्य लहरी])

Related Words

६४   64   lxiv   sixty-four   सालपापड   उव्हाला   कामंदकी   उशनसी   कडवळीया   पी पाण्याचा नेम   सन्यपात   अटोफळी   अहादी   आकर्षक्रीडा   गुरळा   गुराळा   गुराळी   खाराईत   उनिदिया   क्षेवणें   सावोत्रा   वानवटे   सुरधु   रियाती   रीयाती   मंडूकी   मुदयेगिरी   नजरेंत धरणें   चवसट   नुमंडे   तुरुकहांडी   सगबहीण   उदग्रह   स्फुल्लिंग   पिंडाण   फड उलगडणें   तेढीबाकी   तेढेंबाके   नेआहा   डोण्या   वेपथणें   मस्तक फिरुं लागणें   आपले हित करावें, दुसर्‍याचें केले म्हणावें   आंत होणें   अप्रयोजिक   कांडोळणें   उन्निद्रा   उभराभरी   इकराम   कमर सोडणें   चउकडे   हमाणी   हमानी   हमीण   हमेणी   बिजन   भाट्या   मांडी मोडणें   जबा   जबे   वीष   वृद्धक्षत्र पौरव   सजावार   बुलंदशहर   २०६   अडसांगड   गाडणें   गुरळी   कडाणी   अलगट   कोलवणें   चउथरा   चऊक   चऊत   चऊथ   प्राणांची सांडणी करणें   स्फुलिंग   हमिणी   हमिनी   जैत्य   मांदुस   मांदुसी   मांदुसें   मांदूस   मांदूसी   मांदूसें   मुजाईक   मुजाहीक   मोकल   त्राहाटक   धोडी   चाउरी   चाऊरी   ताटंक   अद्रिका   तवई   अडसांगडी   अपवर्तन   कफण   घवघवणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP