|
वि. १ ओबडधोबड ; चमत्कारिक ; वेडेविद्रें ; कर्णकटु ( भाषण , कामधंदा , बोली ). २ राकट ; कठोर ; विद्रुप ; विशोभित ; रानटी ; राक्षसी ( रीत , वहिवाट , वर्तणूक , स्वरूप , अंग ). ३ मूर्ख ; रानवट ; अडाणी ( माणूस ) ४ हट्टी ; दुराग्रही . [ का . हेंगसू = स्त्री ] म्ह० हेंगाडा कुणबी दुणा राबे धन्याला खर्च फार लागे . हेंगडतट्टू - पु . हेंगाड - डा माणूस . हेंगडमेंगड , हेंगडुमेंगड , हेंगडुमेंगडु , हेंगडा मेंगडा - स्त्रीन . १ किरकोळ ; क्षुल्लक माल , वस्तु . २ बडबड ; गप्पा . - वि . १ हलका ; क्षुद्र ; घाणेरडा ; मळकट ; क्षुल्लक . ( वस्तु , प्राणी , दागिना ). २ अडाणी ; रानटी ; खेडवळ ; राकट ; ओबडधोबड . ३ विसंगत ; असंबध्द ( भाषण ). - क्रिवि . विसंगतपणें .
|