Dictionaries | References ल लेंकरुं Script: Devanagari See also: लेकरुं Meaning Related Words लेंकरुं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मूल , बालक , बाळ . ( पुत्र किंवा कन्या या अर्थी . ) तरी सकृप बाप तूं म्हणसि नायके लेकरुं । - केका ९२ . लेकरालेकरीं , लेंकुरालेंकुरी - क्रिवि .वाडवडिलांपासून ( चालत असलेले वतन , हक्क , इ० ); मुलापासून त्याच्या मुलाकडे अशा क्रमाने ; वंशपरंपरेने .मुलांत ; मुलांशी ; मुलांमध्ये इ० [ लेकरुं द्वि . ]०बाळ लेकरेबाळे - न . एव . अव . मुलेबाळे ; लहान मुले ; मुलेबिले ; कुटुंबातील लहानमोठी मुले ( सामान्यत्वे करुन . ) लेंकुरडा - वि . लहानसा ; पोरकट . न्हाण आले शोभेना अंगाचा बांधा लेकुरडा । - प्रला ९९ . लेकुरछंद - पु .मुलांत मिसळण्याचा छंद , हौस , आवड , मुलाचा शोक ; लहान मुलांसारखे वागण्याचा स्वभाव . अरे तूं एवढा मोठा झालास तरी लेकुरछंद टाकीत नाहीस .पोरकटपणाचा नाद ; बालिश हट्ट . आईबापावांचून मुलाचे लेंकुरछंद दुसरा कोण पुरवील ? लेंकुरपण - पणा - नपु .बाल्यावस्था ; शैशावस्था .पोरपणा ; बालिशता . लेंकुरवा - वि . ( राजा . ) पोरकट ; बालिश ; लहानसा . लेकुरवाला - ळा - वि .मुलेबाळे असलेला . लेकुरवाळी बाईल म्हणते आतां याला झोंका । - मध्व .ज्याला आडवे कोंब किंवा बारीक फाटे आहेत असे ( हळकुंड ). लेंकुरसमजूत - स्त्री . पोरबुद्धि ; लहान मुलाचे ज्ञान . लेंकुरस्वभाव - पु . पोरस्वभाव ; बालिशपणा ; लहान मुलाचा स्वभाव . [ लेंकरुं + स्वभाव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP