Dictionaries | References

लपणे

   
Script: Devanagari

लपणे

लपणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  कुणाला दिसू नये म्हणून एखाद्या गोष्टीच्या आड जाणे   Ex. पोलिसांना बघून चोर झाडीत लपला
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
asmলুকাই যোৱা
kasژوٗرِ روزُن
sanविटपान्तरितस् स्था
urdچھپنا , اوجھل ہونا , لکنا , لکانا , پردہ کرنا
 verb  दृष्टीआड होणे   Ex. सूर्य ढगांमध्ये लपला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:

लपणे

 अ.क्रि.  वांकणे ; खचणे ; कचणे ( तुळई , वांसा , खांब ). [ लप ]
 अ.क्रि.  दडणे ; छपून , गुप्त राहणे . [ सं . लुप ] लपगि - स्त्री . लपण्याची इच्छा . लपगि धरुनि एके पर्वती तो निघाला । - कृष्णकौतुक १३ . अकक २ . २६ . लपंछपं , लपनछपन - न . लप्पं छप्पं पहा . लपंडाई - - स्त्रीपु .
   लपण्याचा व शोधून काढण्याचा खेळ ; हा खेळ वात्सायन कालींहि होता .
   ( ल . ) तोंड चुकविणे ; उघडबोलणे ; गुप्तपणा .
   ( ल . ) काळे ; कपट ; लबाडी ; छद्मी ; चोरटी कृत्ये . ( क्रि० करणे ; खेळणे ). [ लपणे + डाव ] लपण - स्त्री .
   लपण्याची ; दडण्याची जागा ; आसरा ; आडोसा . आपभये पळतां यासी । लपणी मिळाली भ्रमापासी । - एभा १३ . १५ .
   स्वतःस लपविणे ; दडणे . ( क्रि० धरणे ; घेणे ; करणे ; साधणे ).
   रहस्य ; खुबी . या ब्रह्मविद्येच्या लपणी । - दा ७ . ७ . ५७ . [ लपणे ] लपणाछिपणी , लपणाशिपणी - स्त्री . ( ना . ) लपंडावाचा खेळ . लपणीचपणी - स्त्री . लंपडाव खेळ . - तुगा . लपविणे - सक्रि . दडविणे ; छपविणे ; दुसर्‍यास न दिसूं देणे . लपविणेदडविणे ही क्रियापदे अर्थाने कांहीशी भिन्न आहेत . दडविणे पहा . लपीथपी - पुस्त्री . लपंडावाचा खेळ . नभ तुजमाजी खेळे । लपीथपी । - ज्ञा १४ . ९ . [ प्रा . ] लपूनछपून , लपतछपत - क्रिवि .
   चोरुन ; गुप्तपणाने ( वर्तन करणे ).
   गुप्तपणाने ; उघडीक न होईल असे ; दडून ( असणे , राहणे ). [ लपणे + छपणे ] लप्पंछप्पं - न .
   लपंडाव .
   शेखीचे बोलणे ; अप्रासंगिक , टाळाटाळीचे भाषण ; लबाडीचे , मूर्खपणाचे दिलेले कारण , निमित्त , सबब इ० ( क्रि० लावणे ; मांडणे ; करणे ). [ लपणे + छपणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP