|
पु. १ तुरटपणा ; विशिष्ट फुलांचा व वनस्पतींचा तुरट आणि आंबट रस . ( क्रि० चढणें ; येणें ; बसणें ). २ कोवळी सुपारी किंवा एखादा तुरट पदार्थ ज्यांत शिजविला आहे असें पाणी ; फल , पुष्प इ० कांच्या द्रवाच्या अंगीं असलेला काळा इ० रंग . सुपारीचा रांप धोतरावर पडला तर धोतर खराब होईल . रापणें , रांपणें - अक्रि . १ हवेवर उघडें ठेविल्यामुळें किंवा लोखंडाशीं संबंध झाल्यामुळें काळें होणें ( तुरट किंवा आंबट फळ , भाजी - पाला ). काळवटणें . २ छानदार छटा येणें ; रंगणें . तया अनुरागाचेया चोळे । रापें इंद्रियांचें मैळें । - भाए ७९६ . ३ चांगल्या रीतीनें भिनणें , मिसळला जाणें , मुरणें ( मसाल्यानें खार , क्षारांनीं खत इ० ). ४ अढीच्या उष्णतेमुळें गुणविशिष्ट आणि स्वादिष्ट होणें ( आंबे इ० ). ५ आंत खोल भिनणें व छटा येणें ( खार , मीठ , क्षार , रंग ). ६ सर्व अंग व्यापणें ; सर्व शरीरावर परिणाम होणें ( ताप , उपदेश इ० आजार , विश किंवा दुसरें रोगकारक द्रव्य , औषध यांचा ). ७ असा विकार भोगणें ( अंग , शरीर यांनीं ). ८ सर्वत्र पसरणें व विश्वासास पात्र होणें ( आवई , बात्मी ). ९ पूर्ण , सतेज , टवटवीत , जिवट दिसणें ( पूर्वीं कृश व निस्तेज असलेला मनुष्य ). १० व्यापणें ; व्यापणें व ताब्यांत , कबज्यांत घेणें . फौजेने किंवा परचक्रानें मुलूक रांपला . गवतानें शेत रांपलें . ११ ( ल . ) परिचित , चांगला माहितगार होणें . [ राप ] पु. ( बे . ) घराची बाजू किंवा पडवी .
|