Dictionaries | References

रांप

   
Script: Devanagari
See also:  राप

रांप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rāpa or rāmpa m The principle or property of astringency: also the astringent and austere juice or sap of certain fruits and plants. v चढ, ये, बस. 2 Laxly. The water in which young Areca-nut or other astringent thing has been boiled. 3 f or रांपेचा पाऊस m Raininess or continuing rain. v घाल, बस, पड, लाग, चाल, & जिर, विर, मोड.

रांप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The principle of astringency.

रांप     

 पु. १ तुरटपणा ; विशिष्ट फुलांचा व वनस्पतींचा तुरट आणि आंबट रस . ( क्रि० चढणें ; येणें ; बसणें ). २ कोवळी सुपारी किंवा एखादा तुरट पदार्थ ज्यांत शिजविला आहे असें पाणी ; फल , पुष्प इ० कांच्या द्रवाच्या अंगीं असलेला काळा इ० रंग . सुपारीचा रांप धोतरावर पडला तर धोतर खराब होईल . रापणें , रांपणें - अक्रि . १ हवेवर उघडें ठेविल्यामुळें किंवा लोखंडाशीं संबंध झाल्यामुळें काळें होणें ( तुरट किंवा आंबट फळ , भाजी - पाला ). काळवटणें . २ छानदार छटा येणें ; रंगणें . तया अनुरागाचेया चोळे । रापें इंद्रियांचें मैळें । - भाए ७९६ . ३ चांगल्या रीतीनें भिनणें , मिसळला जाणें , मुरणें ( मसाल्यानें खार , क्षारांनीं खत इ० ). ४ अढीच्या उष्णतेमुळें गुणविशिष्ट आणि स्वादिष्ट होणें ( आंबे इ० ). ५ आंत खोल भिनणें व छटा येणें ( खार , मीठ , क्षार , रंग ). ६ सर्व अंग व्यापणें ; सर्व शरीरावर परिणाम होणें ( ताप , उपदेश इ० आजार , विश किंवा दुसरें रोगकारक द्रव्य , औषध यांचा ). ७ असा विकार भोगणें ( अंग , शरीर यांनीं ). ८ सर्वत्र पसरणें व विश्वासास पात्र होणें ( आवई , बात्मी ). ९ पूर्ण , सतेज , टवटवीत , जिवट दिसणें ( पूर्वीं कृश व निस्तेज असलेला मनुष्य ). १० व्यापणें ; व्यापणें व ताब्यांत , कबज्यांत घेणें . फौजेने किंवा परचक्रानें मुलूक रांपला . गवतानें शेत रांपलें . ११ ( ल . ) परिचित , चांगला माहितगार होणें . [ राप ]
 पु. ( बे . ) घराची बाजू किंवा पडवी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP