Dictionaries | References

मिरवण

   
Script: Devanagari
See also:  मिरवणी , मिरवणीं , मिरवणूक

मिरवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Slow majestic march; proceeding with solemnity and state, or with parade and pomp; walking in procession. v निघ. See the verb.

मिरवण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Slow, majestic march; walking in procession.

मिरवण     

 स्त्री. थाटानें पुष्कळशा जमावानें सावकाश जाणें ; छबीना ; दिंडी ; वरात ; स्वारी . ( क्रि० निघणें ). झाली संभ्रमे मिरवण । - वेसीस्व ७ . १०६ . [ का . मेरवणगे , मिरवणें ; का . म्यरोण ; द्राविडी . मेरे ; अरमीर , अमीर , मिहीर ] मिरवणी - स्त्री .
अलंकार ; सुशोभित करण्याची वस्तु . पै जळशयना चिया अवगणिया । कां मत्स्यकूर्म इया मिरवणिया । - ज्ञा ११ . ८४ .
प्रसिद्धि . सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । - अमृ १ . ५४ . मिरवणें - अक्रि .
वाद्यादिसहित शहरांतून समारंभपूर्वक सावकाश जाणें ; भपका दाखवीत जाणें .
छानछोकीनें फिरणें ; डौलानें जाणें .
( ल . ) धिंड काढली जाणें .
शोभणें . तेंचि कृष्णाचें श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवत । - एरुस्व १ . ५४ .
बोलणें .
क्रीडा करणें ; खळणें .
डौल दाखविणें ; डौलानें फिरणें . मिरवा मिरवणें - डौलानें दिमाख दाखवीत हिंडणें . मिरविणें - सक्रि . मिरवणूक काढणें ; थाटानें फिरवीत नेणें . प्रतिष्ठा , डौल , तेज , विद्या , गुण , ज्ञान , शहाणपण मिरविणें , मिरविणें - प्रतिष्ठा डौल इ० चें निरर्थक प्रदर्शन मांडणें ; पोकळ देखावा दाखविणें ; खोटा आविर्भाव करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP