Dictionaries | References म मानभाववीण Script: Devanagari See also: मानभाव Meaning Related Words मानभाववीण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .हिंदूंतील एक पंथ व त्यांपैकीं व्यक्ति . हा पंथ चक्रधरस्वामी यानें स्थापिला . हे भिक्षेवर निर्वाह करितात , काळीं किंवा भगवीं वस्त्रें नेसतात व श्रीकृष्णाची भक्ति करितात , महानुभाव पहा . मानभाव बाई । आम्हा भिक्षा वाडा कांहीं । - भज ४१ .( ल . ) मनांत कपट ठेवून बाहेरुन गोड बोलणारा ; लुच्चा . परंतु अशा निर्मल अंतःकरणाच्या पुरुषासहि चकविणारे मानभाव ह्या पृथ्वींत आहेत . - टि १ . ३८७ . [ सं . महानुभाव ] म्ह० करणें कसाबाचें बोलणें मानभावाचें . मानभावाची ऊ - स्त्री . ( ऊ पकडली असतां मानभाव तिला मारीतहि नाहीं अथवा जाऊंहि देत नाहीं यावरुन ) दुःखदायक , अवघड स्थितींत सांपडलेला मनुष्य . मानभावाची बायको - स्त्री .भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करणारी ( व ह्यामुळें आपल्या नवर्यास खर्चांत न आणणारी ) स्त्री .( ल . ) बिनखर्ची उपयोगी पडणारा व नफा करुन देणारा मनुष्य , पशु , पदार्थ इ०मानभावी वि. मानभावांच्या पंथासंबंधीं . ( भाषण , आचार इ० ). मानभावी कावा , मत पुन . मानभावी लोकांच्या सारखा कावेबाजपणा ; कपटाचे डावपेंच . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP