Dictionaries | References

भोंवंडी

   
Script: Devanagari
See also:  भडी , भवं , भवंड , भोंवंड , भोवंड , भोवंडी

भोंवंडी     

 स्त्री. भोंवळ ; घेरी ; चक्कर . ( क्रि० येणें ; जाणें ). भोवंडी दाटली संपूर्ण । - मुआदि ३१ . १३९ . [ भोवणें ]
०जिरविणें   रग ; गुर्मी जिरविणें , नक्षा उतरविणें . भोवंडणें सक्रि .
फिरविणें ; गरगर फिरविणें . वृक्ष भोंवडून सत्राणें । - मुआदि ३७ . ३० .
( ल . ) इकडून तिकडे चालण्यास , धावण्यास लावणें . घोड्यानें मला पाठीमागून चार कोस भोवंडलें तेव्हां सांपडला .
( गुरें इ० ) हांकलून देणें ; उधळून लावणें . भोवडा सकळ आवणांतूनि । - निगा ९८ . भोंवडी दुकान - न . ( गो . ) फिरतें दुकान . भोंवंडावणी - स्त्री . ( गो . ) मिरवणूक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP