-
न. १ मिरच्या कुटून केलेली भुकटी . २ मिरच्यांची चटणी . ३ इतर मसाला घालून केलेले मिरकूड ; कूट . ४ ( कु . ) मसाला . - वि . १ तीव्र ; जलाल ; तोंड भाजण्यासारखे ( मसाला , मिरी ). २ ( ल . ) कडक ; भयंकर ; प्रखर ( उष्णता - सूर्याची अथवा अग्नीची ). ३ तीक्ष्ण ; अणकुचीदार ( धार , टोंक , हत्यार इ० ). कवणे लोहे तिखटे । हा ऋतुराओ निवटे । - शिशु ८४२ . ४ चलाख ; कुशाग्र ; सिद्ध ; शीघ्रग्राही ( मनुष्य अथवा त्याची ग्रहणशक्ति ; कान , नाक इ० इंद्रिये ). गाढवाचे नाक व कान फार तिखट असतात . - मराठी ३ पुस्तक पृ . ११० . ( १८७३ ) ५ कडक ; वेधक ; छद्मी ( भाषण इ० ). ६ ( राजा . ) मधुरता ; मिष्टता . कलमी आंब्यापेक्षां हा आंबा तिखट लागतो . ७ उग्र ( स्वभाव , माणूस ). [ सं . तीक्ष्ण ; प्रा . तिख्त ] ( वाप्र . ) - तिखट - जाळ - आग - अतिशय तिखट .
-
०मीठ सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).
-
लावून सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).
-
वि. उग्र , कडक , जहाल ;
Site Search
Input language: