|
पुस्त्री . बदल पहा . पालट ; फेर ; फरक ; अंतर . ( क्रि० करणें ). मनाचा पालट , फेर . ( क्रि० घेणें ). आपल्या वचनापासून फिरणें ; माघार ; उलट . ( क्रि० खाणें ). - वि . उलट ; भलतें . इकडून ऐवज पावला असतां बदल गोष्ट सांगितल्यास ऐवज माघारा घ्यावा . - ख ११ . ५६६० . - शअ . करितां ; बदला ; विनिमयानें . जागीं ; ऐवजी . पागोट्याबदल हा शेला देतो . कारणें ; साठीं . अध्ययनाबदल त्या गावांत राहणें प्राप्त आहे . मुळें . पावसाबद्दल हत्ती , घोडे , उंटें बहुत मेलीं . - मराचिथोशा ६२ . [ अर . बदल ] ०देणें सक्रि . मोबदला देणें ; खर्चाकरितां देणें . बदल देणें वतनांत लोकांनीं . - वाड - शाछ १ . बदल , बदलावण , बदलाचें लग्न न . साटेलोटें ; दोन घराण्यांनीं परस्परांच्या घरीं मुली देणें व त्यांच्या करणें . ०खातर शअ . साठीं ; कारणें ; मुळें . ०मुशारा पु. रोख , ऐनजिनसी , जमिनीच्या रुपानें सरकारी नोकरांस दिलेला पगार , वेतन , मुशारा . बदलणें सक्रि पालटणें ; फेरफार करणें . फिरविणें ; परतणें ; वेगळें बनविणें . एक सोडून दुसरें घेणें . बदलूनबदलून , अदलून बदलून - क्रिवि . आलटून पालटून . बदलणें - अक्रि . ( सामान्यत : व ल . ) बदल होणें . उलटणें ; बंड करणें . नाकबूल जाणें . परत फिरणें ( प्रतिज्ञेपासून , कृत्यापासून ). बदलून , उलटून , फिरुन पडणें - अंगावर येणें ; प्रतिकूल होणें . बदला - पु . बदलून घेण्याकरितां परत केलेलें नाणें . सूड ; फेड ; उट्टें ; प्रतिक्रिया . ( क्रि० घेणें ). मुशारा ; वेतन . एकाच्या ऐवजीं दुसरें घेणें . रोख्याची किंमत वाढेल या अपेक्षेनें बैल नें तो खरेदी केला असतां पटावटीच्या वेळीं व्यवहार पुढें ढकलण्यासाठीं द्याव्या लागणार्या व्याजाचा दर . - वा . गो . काळेकृत व्यापारी उलाढाली . - शअ . करितां ; जागीं ; कारणें . बदलाबदल , ली - स्त्री . विनिमय ; अदलाबदल ; उलटापालट बदला मुबादला - पु . चलन , पैसे बदलणें ; सराफी . बदलाई - स्त्री . उलटापालट . ०करणें बदलाईस येणें - माघार घेणें ; परत फिरणें ( कामापासून ). प्रतिकूल होणें ; नाकबूल करणें ( हक्क इ० ). बदली - पुस्त्री . बदलणें ; फिरवणूक ; पालट ( संत्रीपाहारा , संरक्षक , सैन्याची टोळी इ० चा ). तात्पुरती सुटका करण्यासाठीं दिलेला मनुष्य , टोळी . बदल्या ; एकाबद्दल दुसरा दिलेला मनुष्य . दुसर्या स्थळीं नेमणूक . मोबदला ; विनिमय [ हिं . ]
|