|
पु. १ काथ्या , वाक , अंबाडी , ताग इत्यादी झाडांच्या सालीचे लांब तंतू . २ ( राजा . ) केळ , अंबाडी , भेंडी इ० कांच्या सालींची किंवा तंतूची वळलेली दोरी . ३ ( ल . ) नासलेले दही ; गूळ इ० मधील तार , तार येण्याची अवस्था ; चिकटण . [ सं . दोरक ; प्रा . दे . दोर ; हिं . दोर ; फ्रेंजि . दोरी ] दगडाचे दोर काढणारा - वि . युक्तिवान ; उद्योगी . दोरक - पु . १ शिवण्याचा दोरा . २ दोर अर्थ १ पहा . दोरखंड ; दोरी . [ सं . ] ०कस पु. १ गाडी , मोट इ० नां बांधावयाचा दोर ; नाडा ; चर्हाट . २ बारीक दोरी . - न . एकत्र बांधलेल्या पुष्कळशा दोर्या . ०खंड न. १ जाड दोर ; सोल . २ दोराचा तुकडा . ३ कालाचा ( केळीच्या गाभ्याचा ) तंतु . ०खंडे नअव . गलबताचे दोर ; जाड दोर . ०गुंडा पु. सालीचे किंवा दोरीचे भेंडोळे ( शाकारण्याच्य कामी उपयोगी ). दोरडे न . ( को . ) १ जाड किंवा मोठा दोर ; दोरखंड . २ ( निंदार्थी ) दोराचा तुकडा ( वाईट , निरुपयोगी दोरासंबंधी योजतात ). दोरणी स्त्री . दोरी . दोरत्व न . दोरपणा ; दोर असण्याची स्थिति . दोरत्व दृष्टि अचळ झाले । - सिसं ९ . ९७ . दोरवा पु . १ अंगांत उभ्या जाड रेघा असलेला कपडा ; कापडाचा एक प्रकार . २ ( कों . ) तडा ; चीर ; भेग ; दगड इ० कांमध्ये असणारा दोरा . दोरा पु . १ सूत ( शिवण्याचे ); वळीव , पिळदार सूत . २ तडा , भेग . दोरव अर्थ २ पहा . ३ ( ल . ) लहान झरा ; झिरण . या विहिरीस तळ्याचे दोरे आहेत . ४ ( ल . ) जोड ; संबंध ; आप्तपणा ; धागादोरा . हे जर आमचे जातीचे असतील तर यांचा आमचा कांही तरी दोरा असेल . त्या दरबारांत आमचा कांही दोरा होता म्हणून जातांच पाय शिरकला . ५ ( ल . ) गुप्त कारस्थान . हळूच लावले सारे दोरे । - ऐपो २५१ . ६ नारुचा किडा ; तंतु ७ वृषणापासून शिश्नापर्यंतचे सूत्र . ८ ( पदार्थ इ० च्या ) शरीरास लागलेल्या किडीचा मार्ग ; किडीच्या संचाराची रेषा . ९ गोगलगाईसारख्या चिकट द्रव टाकणार्या प्राण्याची उमटलेली रेषा . १० एक प्रकारची बांगडी . दागिना . वेगळे निघतां घडीन दोरेचुडा । - तुगा २९५९ . ११ ( ना . ) पोटांतील आंतडी [ दोर ] ०वंजणे ( चांभारी धंदा ) दोरा , घासणे . [ वंजणे = चोपडणे ] दोरावणे अक्रि . १ दोरा रेषा , शिरा , तड असणे ( लांकूड , धोंडा , मोती इ० कांमध्ये ). २ दोराळ , चिकाळ होणे ; तंतु सुटणे ( नासलेला पदार्थ , तिंबलेली कणीक इ० मध्ये ). दोराळ वि . ( राजा . ) दोरमय ; तंतुमय . ( गरा , दही इ० ). दोरी स्त्री . १ बारीक दोर . २ जमीन मोजणीचे एक परिमाण . २० परतन . ८० किंवा १२० बिघे . ३ एक लहान मासा . ४ ( सोनारी - सुतारी धंदा ) इंचाचा एकअष्टमांश भाग ; सूत . [ दोर ] ०सैल - सोडणे - ढिली करणे - लगाम , ताबा , नियम इ० ढिला करणे ; स्वतंत्रता देणे . देणे - सोडणे - ढिली करणे - लगाम , ताबा , नियम इ० ढिला करणे ; स्वतंत्रता देणे . ०सूत क्रिवि . सरळ ; ओळंब्यात ; सरळ रेषेत . ( क्रि० जाणे ; असणे ). हा मार्ग येथून दोरीसूत पुण्यास जातो .
|