|
( सना . ) तृतीयपुरुषवाचक अथवा दर्शक - संबंधी सर्वनाम ; तो , ती , ते ; हे मूळचे संस्कृत सर्वनाम आहे . याचा मराठीत समासांत उपयोग होतो व यापुढे शब्द जोडताना संधि नियमानुसार याची काही ठिकाणी तत , तन व तल अशी रुपे होतात . उदा० तत्पुरुष ; तन्मय ; तद + लीन = तल्लीन [ सं . ] तदंत - क्रिवि . पूर्णपणे निखालस ; अजीबात ; समूळ ; सर्वथा ; सर्वांशी ; अगदी [ सं . तत + अंत = शेवट ] तदनंतर - क्रिवि . त्यानंतर ; मग ; ते झाल्यावर . [ सं . तत + अनंतर = नंतर ] तद्गुण - रुप - सार - क्रिवि . त्याप्रमाणे ; त्यासारखे . [ सं . तद + अनुगुण - रुप - सार ] तदपि - क्रिवि . तरी सुद्धा ; तत्रापि ; तथापि . [ तत + अपि ] तदाकार - वि . त्या आकाराचा ; त्या रुपाचा ; तद्रूप . [ सं . तत + आकार ] तदीय - वि त्याचा ; तिचा ; तत्संबंधी ; त्याविषयी . तदुत्तर - क्रिवि . त्यापुढे ; त्यानंतर ; तदनंतर . [ सं . तत + सं . उत्तर = पुढे , पुडील ] तदुपरी , तदुपरांत , तदुपरांतिक - क्रिवि . तेथून ; तेथपासून ; त्यावेळेपासून पुढे ; तेव्हांपासून . [ सं . तत + उपरी - उपरांत - उपरांतिक = नंतर , पुढे ] तद्देशी , तद्देशीय - वि . १ त्या देशाचा ; त्या देशांतील . २ ( ल . ) परदेशीय . ३ पुरभय्या परदेशी [ सं . तत + देशी ] तद्भव - वि . १ त्यापासून झालेला , होणारा . २ ( व्या . ) प्राकृत - देशी ( धात्वादेश , धातु , शब्द इ० ). उदा० सं . रक्षा शब्दापासून झालेला राख शब्द तद्भव आहे . [ तत + सं . भू = होणे ]
|