Dictionaries | References

झटकारा

   
Script: Devanagari
See also:  झटका

झटकारा     

 पु. १ ( काठी इ० कांचा ) तडाखा ; फटकारा ; रट्टा ; आघात . २ हिसका ; हिसडा ( हातानें , पायानें मारलेला ). हातानें मारिन झटका । - संग्रामगीतें ४७ . ३ ( वेदनेचा , दु : खाचा ) आवेग ; कळ ; लहर ; आंचका ; तिडीक ; चमक ; करक . ४ ( वार्‍याचा ) वेग ; झपाटा ; सपाटा ; सोंसाटा . ५ ( राग , वारा , संताप इ० काचा ). फणकारा ; झणकारा . ६ झपाटा ( भूत , पिशाच्च इ० कांचा ). ७ झोंका ; पाय मागेंपुढें होणें ( नृत्यांतील ). ८ ( हाताचा , शरीराचा ) हेलकावा ; हेलावा ; झोंक ; झोल . ९ ( शास्त्राचा ) झपाटा ; फटकारा ; फेर ; मंडळ . १० वस्त्राचा शेवटाचा फटका ; फटकारा . ( क्रि० मारणें ; देणें ; बसणें ). ११ ( धान्य इ० सुपांत घालून किंवा पंख्यानें ) फटकण्याची क्रिया ; झडपण ; पाखडणें . ( क्रि० देणें ). १२ ( एखादा पदार्थ दुसर्‍यावर आदळल्यानें लागलेला ) धक्का ; ढुसणी ; आघात ; ( पडतांना लागलेला ) ठोका ; मार . ( क्रि० लागणें ). १३ ( उन्हाची ) झळ ; तिरीप . १४ ( रोग , जरीमरी , सांथ इ० कांचा ) घाला ; सपाटा ; धाड ( तापाचा पित्तविकार ). १५ ( पिकांवर पडणारा ) तांबेरा , मेकाडा . १६ ( व्यापारांतील ) तोटा ; धक्का ; ठोकर . ( क्रि० लागणें ; बसणें ; मारणें ). वरील सर्व अर्थी झटकारा शब्दापेक्षां झटका याचाच जास्त उपयोग रूढ आहे . [ घ्व . झट ; हिं . झटका ] सामाशब्द -
०फटका  पु. १ सर्व अर्थी झटका पहा . २ ( पावसाची ) जोराची झड ; झडी ; वादळी पाऊस . ३ जोराचा सपाटा ; दाब ; जोर ; झोल ; तडाखा . ४ तगादा ; नेट ; लकडा ( एखाद्या कामाचा , धंद्याचा ). [ झटका + फटका ] झटकारणें - उक्रि . १ झटकणें ; झाडणें . २ हिसडणें ; ओढणें . ३ झिडकारणें ; तिरस्कारणें ; धिक्कारणें . [ झटकारा ] झटक्यापटक्यांत - क्रिवि . एका झटक्यांत ; क्षणार्धात ; झटदिशीं ; झटक्यासरशीं . [ झटक + पटक ] झटक्यासरशीं , झटक्यासरसा - क्रिवि . १ फटक्यासरशीं ; फटकारा लागतांच ; तडाखा बसतांच . २ एका हिसक्यासरशीं ; एकदम ओढतांच . ३ एका उडीसरशीं , उसळी सरशी - सरसा . ४ जोरानें ; चपलतेनें ; झटकन . ५ ( रागाच्या संतापाच्या ) फणक्यानें ; फणकार्‍यानें ; झणकार्‍यानें . ६ एका आंचक्यांत ; एकदम ; एकाएकीं ( प्राण जाणें , मरून पडणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP