Dictionaries | References ज जाहागीर Script: Devanagari See also: जाहगिरी , जाहगीर , जाहागिरी Meaning Related Words जाहागीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सरकारांतून मिळालेली जमिनीची अथवा वसुलाची इनाम किंवा धर्मादाय म्हणून देणगी ही सरकारी लष्कराच्या खर्चासाठीं किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या पोषणासाठीं दिलेली असते . ही इनामासारखी अगदींच करविरहित नसते ; जायदाद ; इनामजमीन . २ मोंगलांनीं चार आणे मराठयांस दिल्यावर त्यांचे गावांत अगर परगण्यांत जे बारा आणे राहतात ते . ३ देवादिकांच्या नेमणुकीच्या खर्चाबद्दल गांव देतात ती . ४ ( सामा . ) पेन्शन तनखा . [ फा . जाएगीर , जागीर ] म्ह० चार खुंट जाहागीर = चार म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे . यांची जाहागीर म्हणजे पृथ्वीवर हवें तिकडे भिक्षा मागण्याची मोकळीक . ( ल . ) भिक्षावृत्ति ; भिक्षांदेही .०अमल पु. १ सरदेशमुखी आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . २ मोकासा आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . ३ मराठयांची चौथाई व आणखी चौथा हिस्सा ( फौजदारीसाठीं ) वजा केल्यानंतर राहणार्या वसुलाचा विशिष्ट भाग मोंगल सरकार कांहीं जहागिरदारांकडून घेई तो .०दार पु. जहागीर असलेला , मिळालेला इसम ; सरदार ; इनामदार . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP