Dictionaries | References

गोसाई

   
Script: Devanagari
See also:  गोसामी

गोसाई     

 पु. ( ना . ) १ पावसाळयांत दिसणारा एक ठहान किडा . याची वरची बाजू लाल मखमालीसारखी असते . मृगांतील किडा . २ बाजरीवरील एक किडा .
 पु. १ ज्यानें सांसारिक इ० सुखांचा त्याग केला असा योगी , यांचीं वस्त्रें भगवीं असतात , यांपैकीं कांहीं मुंडण करतात . २ ( ल . ) घरदार , बायकापोरें यांच्या विरहित माणूस ; फटिंग . ३ हरिदास . ४ ( जुना पत्रव्यवहार ) सन्मानदर्शक एक पदवी . ५ मालक , धनी . मुषकारूढ गणेश गोसावी । - वेसीस्व ६ . ४२ . ६ वाजविण्याची मातीची चिमणी ; भुरकट रंगाची चिमणी ( पाखरूं ); ७ तव्यास वर राख लावून त्यावर केलेली भाकर , गाकर . ८ केळीची एक जात . गोसा , मडा , सावडा - पु . ( निंदार्थी ) गोसावी . गोसामपण - न . गोसाव्याचा धर्म , चाल , रीत . गोसावीण - स्त्री . धनीण ; मालकीण . पैं जीवाचे कसों उतरलीं । ते दासी कीं गोसांवीण झाली । - ज्ञा १८ . ९१२ . गोसावीपण - न . प्रभुत्व . जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें । - ज्ञा १८ . २२ . [ सं . गोस्वामी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP