|
स्त्री. गुंतणें ; गुंता पहा . या सेताची गुत सिलक असेल त्याची किंमत ... - मसाप २ . १७७ . [ सं . ग्रथित ; प्रा . गुत्थ ] गुंतणुक , गुंतणूक - स्त्री . ( क्क . ) अडवणूक ; गुंतागुंत ; गोंधळाची , घोंटाळयाची स्थिति . [ गुंतणें ] गुतणें , गुंतणें - अक्रि . १ एकमेकांत गुरफटलें जाणें ( दोरा ); अडकणें . सूत सूतें गुंतलें । - ज्ञा १८ . १३०६ . २ गुरफटणें ; अडचणींत सांपडणें ; मोकळेपणा खुंटणें . ३ गुंग असणें ; गढून जाणें ; व्यापृत असणें ; अडकणें ( कामांत , उद्योगांत - मनुष्य , पशु , वस्तु , जागा ). यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके । - सारुह ४ . ४७ . ४ फसणें . [ सं . ग्रथन ] गुंतत बोलणें - अडखळत , घुटमळत बोलणें ; अडखळणें . गुंतलें - न . गुंता ; गुंतागुंत ; गुंताड , गुंताडा . तुटे बंधमोक्षाचें गुंतलें एथ । - माझा १८ . ३१९ . गुतवळ , गुंतवळ - स्त्री . १ केंस विंचरतांना गळालेल्या केसांचा ( गुंतवळांचा ) गुंजडा , समुदाय . २ ( अव . प्रयोग ) ( ल . ) तुरळक , थोडे वाढणारे खुंट . - पु . १ डोकीच्या केसांतून गळलेला केस ; गुंतवळी पैकीं केस . २ गुंतागुंत ( केंस , दोरी इ० ची ). गुतविणें - उक्रि . ( ल . व शब्दश : ) गुरफाटणें ; गोंवणें ; अडकविणें .
|