Dictionaries | References

कडता

   
Script: Devanagari
See also:  कर्ता

कडता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
given in selling certain articles, e. g. 1½ sher per maund of oil, of तूप, or of गूळ. कांटा is a deduction made, in favor of the अडत्या, from the आखें or half पल्ला, e. g. of 5 sher per आखें of तूप or of गूळ, 3½ sher per आखें of oil. In some parts कडता is an excess of 10½ sher per पल्ला of weight, and कांटा is a surplus of 2½ sher, total 13; which, added to 120, the nominal amount of a पल्ला, constitute a पक्का पल्ला. In yet other districts there are other differences of the quantities of both कडता & कांटा.

कडता     

वि.  ( ना .) ऊन ; गरम ; कढत पहा . ०कडता - क्रिवि . गरमारम ; कढतकढत ; ऊनऊन . ( कढणें )
 पु. ( चाळीस शेरांचा ) वजनी , एक मण जिन्नस विकला असतां त्याच्यावर द्यावयाचा वर्ताळा ( उदा० तूप , गूळ , तेल यांच्या दर मणामागें १॥ शेर कडता मिळतो .
 पु. ( व .) उट्टें ; वचपा . ' या अपमानाचा कर्ता काढल्याविना मी राहणारा नाहीं '
 पु. वचपा . कामाच्या दगदगीमुळें जितके जितके दिवस बायकोशीम मनमोकळेपणानें गप्पाविनोदकरतां आला नाहीं त्याचा कडता काढावयाचा .' - साह्या सप्टें १९३८ .
०कांटा  पु. अडत्याला अर्ध्या पल्ल्यावर किंवा एक आख्यावर जो वर्ताळा मिळतो तो . काहीं ठिकाणीं हा कडता दर वजनी पल्ल्यास १०॥ शेर असतो आणि कांटा २॥ शेर असतो . मिळून १३ शेर , हे कच्च्या पल्ल्याच्या १२० शेरांत मिळविले म्हणजे १३३ शेरांचा पक्का पल्ला होतो . दुसर्‍या कांहीं ठिकाणीं कांटा व कडता यांचें प्रमाण निरनिराळें आढळतें . पुण्यांत गूळ वजन करतांना १ मणाच्यापुढें ढेपेंचें वजन भरल्यास मणामागें चार शेरप्रमाणें कडता ( वजन ) कमी करतात . ( का . कडत = छाट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP