Dictionaries | References

ऐली

   
Script: Devanagari
See also:  ऐल , ऐला , ऐलाड , ऐलाडी

ऐली     

वि.  अलीकडचा ; अलीकडला . उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ॥ - ज्ञा १८ . २५५ . पाहेचि ना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐल तीरा । - एभा २८ . ३२५ . क्रिवि
या बाजूला ; अलीकडे . प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । - ज्ञा ६ . १९१ .
आधीं ; अगोदर ; पूर्वी . तेवि तो उडुनाथ । केवल श्रीकृष्णप्रीत्यर्थ । सांडूनि काळ नियत । ऐलाडचि उदैला ॥ - रास १ . १०७ . [ सं . आदिम ; प्रा . आइल्ल ] ऐलकांठ , ऐलतीर , ऐलथड - पु . न . स्त्री . अलीकडचा कांठ ; जवळचा कांठ ; पैलथडी याच्या उलट . शोभा समुद्र हेलावे पोटीं । चक्षू पोहणार उठाउठी । ऐलकांठीं चुबकले ॥ - मुसभा २ . ७७ . असो आतां त्या अवसरीं । क्षीरसागरीच्या ऐलतीरी । बध्दांजलि करुनि निर्धारी । सुरवर उभे ठाकले ॥ - ह २ . ६० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP