Dictionaries | References ऐ ऐलाडी Script: Devanagari See also: ऐल , ऐला , ऐलाड , ऐली Meaning Related Words ऐलाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अलीकडचा ; अलीकडला . उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ॥ - ज्ञा १८ . २५५ . पाहेचि ना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐल तीरा । - एभा २८ . ३२५ . क्रिविया बाजूला ; अलीकडे . प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । - ज्ञा ६ . १९१ .आधीं ; अगोदर ; पूर्वी . तेवि तो उडुनाथ । केवल श्रीकृष्णप्रीत्यर्थ । सांडूनि काळ नियत । ऐलाडचि उदैला ॥ - रास १ . १०७ . [ सं . आदिम ; प्रा . आइल्ल ] ऐलकांठ , ऐलतीर , ऐलथड - पु . न . स्त्री . अलीकडचा कांठ ; जवळचा कांठ ; पैलथडी याच्या उलट . शोभा समुद्र हेलावे पोटीं । चक्षू पोहणार उठाउठी । ऐलकांठीं चुबकले ॥ - मुसभा २ . ७७ . असो आतां त्या अवसरीं । क्षीरसागरीच्या ऐलतीरी । बध्दांजलि करुनि निर्धारी । सुरवर उभे ठाकले ॥ - ह २ . ६० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP